व्याख्या.... मेंदूला खुराक 5 🎷
▬▬▬۩۞۩▬▬▬
🪷 आपल्या विज्ञान विषयक What's App समूहात सामील होण्यासाठी खालील लिंक ला स्पर्श करा.🙏
WhatsApp Group
Join Now
▬▬▬۩۞۩▬▬▬
🌼 या अगोदरच्या लेखात, व्याख्या... मेंदूला खुराक 1 ,2, 3, 4 साठीची लिंक 🔗 क्रमशः खाली 👇 दिली आहे.
- व्याख्या.. मेंदूला खुराक 1🎷
- व्याख्या... मेंदूला खुराक 2 🎷
- व्याख्या... मेंदूला खुराक 3 🎷
- व्याख्या... मेंदूला खुराक 4 🎷
श्राव्य ध्वनी:- 20 Hz ते 20,000 Hz वारंवारता असलेल्या ध्वनीला श्राव्य ध्वनी म्हणतात.
- अवश्राव्य ध्वनी:- 20 Hz पेक्षा कमी वारंवारता असलेल्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी म्हणतात.
- श्राव्यातीत ध्वनी:- 20,000 Hz पेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी म्हणतात.
- चुंबकसूची:- उत्तर आणि दक्षिण या दिशा दाखवण्यासाठी, मुक्तपणे फिरू शकणारी चुंबकत्व असलेल्या सुईला चुंबक सूची म्हणतात.
- अचुंबकीय पदार्थ:- चुंबकाचा परिणाम न होणाऱ्या पदार्थांना अचुंबकीय पदार्थ म्हणतात.
- चुंबकीय पदार्थ:- चुंबकाकडे आकर्षिल्या जाणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणतात.
- चुंबकीय क्षेत्र:- चुंबकाभवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय बल कार्य करते, त्या भागास चुंबकीय क्षेत्र म्हणतात.
- चुंबकीय बलरेषा:- चुंबकपट्टीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या अदृश्य रेषांना चुंबकीय बलरेषा असे म्हणतात.
- विद्युत चुंबक:- नरम लोखंडाच्या पट्टीतून विद्युत धारा पाठवली असता लोखंडामध्ये विद्युत धारा असेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात चुंबकत्व निर्माण होते या प्रकारच्या चुंबकास विद्युत चुंबक म्हणतात.
- दीर्घिका:- असंख्य तारे आणि त्यांच्या ग्रहमालिका यांच्या समूहास दीर्घिका असे म्हणतात.
- नक्षत्रे:- तारकांच्या आकृतीबंधांना नक्षत्रे म्हणतात.
- परिभ्रमण काळ:- ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास लागणाऱ्या वेळेला त्या ग्रहाचा परिभ्रमण काल म्हणतात.
- परिवलन:-प्रत्येक ग्रह त्याच्या अक्षाभोवती फिरत असतो या गतीला परिवलन म्हणतात.
- परिवलन काल:- ग्रहाला स्वतःच्या अक्षाभोवती एक परिवलन पूर्ण करण्यास लागणाऱ्या वेळेला परिवलन काल म्हणतात.
- तारा:- स्वयंप्रकाशित, हायड्रोजनच्या गोलाकार दाट ढगाला, तारा असे म्हणतात.
- उपग्रह:-ग्रहभोवत फिरणाऱ्या खगोलीय वस्तूला उपग्रह म्हणतात.
- लघुग्रह:- मंगळ व गुरु या ग्रहांच्या परिभ्रमण कक्षांच्या दरम्यान अनेक लहान लहान खगोली अवशेष फिरतात त्यांना लघुग्रह म्हणतात.
- अंतर्ग्रह:- पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेच्या आत असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात.
- अध: बिंदू:- जमिनीवर उभे राहिल्यास आपल्या पायाच्या अगदी बरोबर खाली असलेल्या खगोलावरील बिंदू म्हणजे अध:बिंदू होय.
- उर्ध्वबिंदू :- आपण जमिनीवर उभे असताना आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या खगोलावरील बिंदूला उर्धूबिंदू म्हणतात.
- मध्यमंडळ:- निरीक्षकाच्या उर्ध्वबिंदूतून आणि दोन्ही खगोलीय ध्रुवांमधून जाणाऱ्या अर्धवर्तुळास मध्यमंडळ म्हणतात.
- क्षितिज:- दूरवर पाहिल्यास आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्या रेषेला क्षितिज म्हणतात.
- जैविक विविधता:-पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे जैविक विविधता किंवा जैवविविधता होय.
- राखीव जैवविभाग:-ज्या भूभागावरील वन्य जीवन संरक्षित ठेवण्यात येते आणि तेथील स्थानिक लोकांना त्यांचे दैनंदिन व्यवहार व उद्योग चालू ठेवण्यास परवानगी असते अशा क्षेत्रांना राखीव जैवविभाग असे म्हणतात.
- बियाणे पेढ्या:-ज्या ठिकाणी स्थानिक प्रजातींचे वाण जपून व टिकवून ठेवण्यात येतात त्या ठिकाणास बियाणे पेढ्या म्हणतात.
- गुणसूत्र पेढ्या:-ज्या ठिकाणी स्थानिक प्रजातींची गुणसूत्रे जतन करून ठेवतात त्या ठिकाणाला गुणसूत्र पेढ्या म्हणतात.
- दाब:- एकक क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर लावलेल्या बलाला दाब म्हणतात.
- बल:- स्थिर वस्तू गतिमान करण्यासाठी, गतिमान वस्तु स्थिर करण्यासाठी, वस्तूच्या वेगात व चालीत बदल करण्यासाठी, तसेच वस्तूचे आकारमान व आकार यांत बदल करण्यासाठी ज्या भौतिक राशीची गरज असते त्यास बल असे म्हणतात.
- वातावरणाचा दाब:- पृथ्वीभोवती असलेल्या वातावरणाच्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.
- अणुअंक:- अणुमधिल इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक किंवा अणुक्रमांक म्हणतात.
- अणुवस्तुमानांक:- मूलद्रव्याच्या अणुतील केंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकूण संख्येला त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणतात.
- न्यूक्लियाॅन:-अणुच्या केंद्रकामध्ये एकत्रितपणे असलेल्या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना न्यूक्लियाॅन म्हणतात.
- संयुजा:- मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याच्या क्षमतेला संयोजना म्हणतात. किंवा
- मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात. किंवा
- द्वीक किंवा अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला संयुजा म्हणतात.
- अणू:- द्रव्य हे लहान कणांचे बनलेले असून या कणांना अणू म्हणतात.
- प्रोटॉन:-अणुकेंद्रकातील धनप्रभारित मूलकणांना प्रोटॉन म्हणतात.
- न्यूट्रॉन:-अणुकेंद्रकातील प्रभाररहित मूलकणांना न्यूट्रॉन म्हणतात.
- इलेक्ट्रॉन:-अणुकेंद्रकाभोवती विशिष्ट कक्षांमध्ये परिभ्रमण करणाऱ्या ऋण प्रभारित मूलकणांना इलेक्ट्रॉन म्हणतात.
- समस्थानिके:-ज्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये अणुक्रमांक सारखाच असून अणुवस्तुमानांक भिन्न असतो अशा अणूंना त्या मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात.
- अभिक्रियाकारक:- रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना अभिक्रियाकारक म्हणतात.
- उत्पादिते:-रासायनिक अभिक्रियेत तयार होणाऱ्या पदार्थांना उत्पादिते म्हणतात.
- रासायनिक अभिक्रिया:- अभिक्रियाकारकांपासून उत्पादिते मिळवताना होणाऱ्या प्रक्रियेला रासायनिक अभिक्रिया म्हणतात.
- रासायनिक समीकरण:- रासायनिक अभिक्रिया कशी होते ते दर्शवण्यासाठी संज्ञा व संयुगाची सूत्रे वापरू जे समीकरण मांडले जाते त्याला रासायनिक समीकरण म्हणतात.
- संयोग अभिक्रिया:- ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून केवळ एकच उत्पादित तयार होते त्या अभिक्रियेला संयोग अभिक्रिया म्हणतात.
- अपघटन अभिक्रिया:- ज्या अभिक्रियेत एका पदार्थाचे अपघट होऊन त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. किंवा
- ज्या रासायनिक अभिक्रियेत केवळ एकाच अभिक्रिया कारकापासून दोन किंवा दोन पेक्षा अधिक उत्पादिते मिळतात त्यास अपघटन अभिक्रिया म्हणतात.
- विस्थापन अभिक्रिया:- ज्या अभिक्रियेत एक घटक दुसऱ्या घटकाला विस्थापित करून वेगळे करतो त्या अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात. किंवा
- ज्या रासायनिक अभिक्रियेत जास्त क्रियाशील मूलद्रव्य कमी क्रियाशील मूलद्रव्याची जागा घेऊन नवीन पदार्थ तयार होतो त्यास विस्थापन अभिक्रिया म्हणतात.
- दुहेरी विस्थापन अभिक्रिया:- च्या रासायनिक अभिक्रियेत दोन अभिक्रिया कारकांच्या मूलकांच्या स्थानात अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होऊन एक अवक्षेप तयार होतो, त्यास दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणतात.
▬ ▬▬۩۞۩▬▬▬
🎸 सुमधुर स्नेह वंदन।🙏
जिनमें कुछ करने के इरादे होते हैं
वो बहानों से नही
मेहनती अंदाजों से लडते है।🥁
🌅आपका हर दिन मंगलमय और सुखमय हो।
▬▬▬▬۩۞۩▬▬▬
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा