व्याख्या...... मेंदूला खुराक 3 🎷
📯 या अगोदरच्या लेखात, व्याख्या... मेंदूला खुराक 1 साठीची लिंक 🔗 खाली 👇 दिली आहे.
###&&&###
🧠 या अगोदरच्या लेखात, व्याख्या... मेंदूला खुराक 2 साठीची लिंक 🔗 खाली 👇 दिली आहे.
÷÷÷÷----÷÷÷÷
🔬 आपल्या विज्ञान विषयक माहितीसाठी खालील👇 What's App समूहात सामील व्हावे 🙏.🎷
WhatsApp Group
Join Now
चाल:- एखाद्या वस्तूने एक कालावधीत कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.
- त्वरण:- वेगांमधील वेळेच्या संदर्भात होणाऱ्या बदलाला तोरण म्हणतात. किंवा
- त्वरण:- वेग बदलाच्या दरास त्वरण म्हणतात.
- वेग:- विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर म्हणजे वेग.
- 1 न्यूटन:- एक किलोग्रॅम चे प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले आणि एक मीटर प्रति सेकंद वर्ग इतक्या त्वरणाने ओढले तर त्यासाठी लावलेल्या बलाला एक न्यूटन बल असे म्हणतात. किंवा
- 1 न्यूटन:- एक किलो ग्रॅम वस्तुमानात एक मीटर प्रतिसेकंद वर्ग त्वरण निर्माण करणाऱ्या बलास एक न्यूटन बल म्हणतात.
- एकसमान चाल:- जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल एकसमान असते.
- अंतर:- दोन बिंदूंच्या दरम्यान गतिमान असताना वस्तूने प्रत्यक्ष केलेले मार्गक्रमण म्हणजेच प्रत्यक्ष आक्रमलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर.
- विस्थापन:- गतिमानतेच्या आरंभबिंदूपासून अंतिम बिंदू पर्यंतचे सर्वात कमी अंतर म्हणजे विस्थापन.
- प्रतिकर्षण:- एकाच प्रकारचे प्रभार असलेल्या दोन कांड्या एकमेकींना दूर ढकलतात. याला प्रतिकर्षण म्हणतात.
- आकर्षण:- विरुद्ध प्रकारचे प्रभार असलेल्या कांड्या एकमेकांकडे ओढल्या जातात. यालाच आकर्षण म्हणतात.
- घर्षणविद्युत:- घर्षणामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत प्रभाराला घर्षणविद्युत म्हणतात.
- स्थितिक विद्युत:- घर्षण विद्युत चा प्रभार वस्तूवर घर्षण झालेल्या ठिकाणीच निर्माण होतो त्यामुळे या विद्युत प्रभाराला स्थितिक विद्युत असे म्हणतात.
- सुवर्णपत्र विद्युतदर्शी:- सुवर्णपत्रांचा वापर करून वस्तूवरील विद्युत प्रभार ओळखण्याच्या साधनाला/ उपकरणाला सुवर्णपत्र विद्युत दर्शी म्हणतात.
- तडीतरक्षक:- ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी जे उपकरण वापरतात त्याला तडीतरक्षक म्हणतात.
- पेशी:- सजीवांचा रचनात्मक, कार्यात्मक व मूलभूत घटक म्हणजे पेशी होय.
- पेशी अंगके:- पेशीत असणाऱ्या घटकांना पेशी अंगके म्हणतात.
- पेशीद्रव:- पेशी केंद्रकाव्यतिरिक्त असणारा द्रवभाग जो पेशीपटल आणि केंद्रक यादरम्यान आहे त्यास पेशीनंद्रव म्हणतात.
- आदिकेंद्रकी पेशी:- ज्या पेशी मध्ये सुस्पष्ट केंद्रक नसते त्यास आदिकेंद्रकी पेशी म्हणतात.
- दृश्यकेंद्रकी पेशी:- ज्या पेशी मध्ये केंद्रकपटल, केंद्रकी आणि केंद्रकद्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असते त्यास दृश्यकेंद्रक पेशी म्हणतात.
- सूक्ष्मजीव:- आपल्या सभोवताली सगळीकडे जे आहेत पण आपल्या डोळ्यांना जे सहज दिसत नाहीत आणि ज्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो अशा अत्यंत लहान सजीवांना सूक्ष्मजीव म्हणतात.
- प्रतिजैविके:- शरीरातील रोग जंतूंचा नाश करणाऱ्या व त्यांची वाढ रोखणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या औषधांना प्रतिजैविके असे म्हणतात.
- इंद्रियसंस्था:- समान पद्धतीचे कार्य करणाऱ्या शरीरातील इंद्रियांना एकत्रितरित्या केंद्रीयसंस्था म्हणतात.
- अस्थिबंध:- शरीरातील हाडे एकमेकांना ज्या बंधने जोडलेली असतात त्यास अस्थिबंध म्हणतात.
- स्नायू:- हाडावर असणाऱ्या मांसल भागास स्नायू म्हणतात.
- स्नायूबंध:- स्नायूंना हाडांशी घट्ट जोडणाऱ्या बंधास स्नायूबंध म्हणतात. (Tendons)
- ऐच्छिक स्नायू:- ज्या स्नायूंची हालचाल व विविध कार्य आपण आपल्या इच्छेनुसार करू शकतो अशा स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात.
- अनैच्छिक स्नायू:- शरीरातील काही जीवनावश्यक आंतरेंद्रिय आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात, अशा स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात.
- अस्थि स्नायू:- दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेल्या स्नायूंना अस्थि स्नायू असे म्हणतात.
- मृदू स्नायू:- शरीरातील ज्या ज्या आंतरेंद्रियांची हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असून अनैच्छिक असते अशा ठिकाणी आढळणाऱ्या स्नायूंना मृदू स्नायू म्हणतात.
- द्विशिरस्क स्नायू:- दंडामध्ये असलेल्या हाडाच्या वरच्या बाजूच्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू म्हणतात.(Biceps)
- त्रिशिरस्क स्नायू:- दंडामध्ये असलेल्या हाडाच्या खालच्या बाजूच्या स्नायूला त्रिशिरस्क स्नायू म्हणतात.(Triceps)
- Myology:- स्नायूंच्या अभ्यासाच्या शास्त्राला Myology म्हणतात.
- भौतिक बदल:- जे बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत तसेच राहतात, अशा बदलांना भौतिक बदल असे म्हणतात.
- रासायनिक बदल:- मूळ पदार्थांचे रूपांतर रासायनिक क्रिया होऊन नवीन व वेगळ्या गुणधर्मांच्या पदार्थात होते त्यावेळी त्याला रासायनिक बदल असे म्हणतात.
- नैसर्गिक बदल:- जे बदल निसर्गतःच घडून येतात त्यांना नैसर्गिक बदल असे म्हणतात.
- उपयुक्त बदल:- ज्यावेळी आपल्याला उपयोगी पडणारे बदल हवे असतात, त्यावेळी जे बदल करण्यात येतात त्यांना उपयुक्त बदल असे म्हणतात.
- हानिकारक बदल:- ज्या बदलांनी मानवास हानी पोहोचते किंवा जे बदल उपयुक्त नसतात त्या बदलांना हानिकारक बदल असे म्हणतात.
- सावकाश होणारे बदल:- जे बदल सावकाशपणे होत असतात, त्यांना सावकाश होणारे बदल असे म्हणतात.
- शीघ्र होणारे बदल:- जे बदल घडून येण्यासाठी कमी कालावधी लागतो, त्यास शीघ्र होणारे बदल म्हणतात.
- परिवर्तनीय बदल:- उलटसुलट क्रमाने पुन्हा पुन्हा होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल म्हणतात.
- अपरिवर्तनीय बदल:- जे झालेले बदल पुन्हा पूर्ववत करता येत नाहीत, त्यांना अपरिवर्तनीय बदल असे म्हणतात.
- आवर्ती बदल:-जे बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात, अशा बदलांना आवर्ती बदल म्हणतात.
- अनावर्ती बदल:- जे बदल घडल्यावर पुन्हा कधी होतील हे निश्चित सांगता येत नाही अशा बदलांना अनावर्ती बदल असे म्हणतात.
- क्षरण:- हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची वाफ यांच्या रासायनिक क्रियेमुळे पदार्थाचे गंजणे किंवा झीज यास क्षरण असे म्हणतात.
- गॅल्व्हनायझेशन:- लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावण्याच्या क्रियेला गॅल्वनायझेशन म्हणतात.
सुमधुर स्नेह वंदन।🙏
*ज्यादा बोझ लेकर चलने वाले
अक्सर डूब जाते हैं..*
*फिर चाहे वह बोझ..*
*क्रोध का हो,*
*बदले का हो,*
*या..*
*अभिमान का!!*
आपका हर दिन
मंगलमय और सुखमय हो।🙏*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा