मुख्य सामग्रीवर वगळा

व्याख्या..... मेंदूला खुराक 1 🎷


व्याख्या...... मेंदूला खुराक 1 🎷


आपल्या विज्ञान विषयक What's App समूहात सामील होण्यासाठी खालील 👇 🔗 लिंक ला स्पर्श करा 🙏

WhatsApp GroupJoin Now


 निव्वळ पाठांतर किंवा समजून घेऊन केलेले पाठांतर यात फरक पडतो. समजून घेऊन पाठांतर केल्यास तो अभ्यास ठरतो.आज आपण व्याख्या पाहणार आहोत. व्याख्या सराव व पाठांतराचा भाग असतात. आकृती, समीकरणे व वर्णन यावरून माहिती समजून घेऊन अभ्यास केला तर ... व्याख्या कायम स्मरणात राहतात.


  • प्रकाश संश्लेषण:- कार्बन डाय ऑक्साईड आणि पाणी यांच्यात सूर्यप्रकाश व हरितद्रव्य यांच्या मार्फत रासायनिक अभिक्रिया होऊन ग्लुकोज तयार होऊन ऑक्सिजन मुक्त होण्याच्या क्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात.
  • उत्प्रेरक:- ज्या पदार्थाच्या केवळ अल्प उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो पण त्या पदार्थात 
  • आदिमूळ:- बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ म्हणतात.
  • पर्णपत्र:- पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात.
  • पर्णाग्र:- पानाच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात.
  • परागीभवन (Pollination) : परागकण कुक्षीवर जाऊन पडण्याच्या क्रियेला 'परागीभवन' म्हणतात.
  • फलन (Fertilization) : अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होण्याच्या क्रियेला 'फलन' म्हणतात.
  •  आदिमूळ (Radicle): बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा भाग म्हणजे आदिमूळ. 
  •  अंकुर (Plumule): बी पासून जमिनीच्या वर वाढणारा भाग म्हणजे अंकुर.  
  • मूळ (Root): जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या अवयवाला मूळ म्हणतात.
  • सोटमूळ (Tap Root): जमिनीलगत जाडसर व पुढे निमुळते व टोकदार होणारे मूळ म्हणजे सोटमूळ. 
  • मूलरोम (Root Hair) : मूलरोम म्हणजे मुळांच्या टोकांच्या भागांवर असणारे केसासारखे धागे.
  • मूलटोपी (Root Cap) : मुळाच्या टोकाच्या भागात वाढ होत असते. या मुळाच्या टोकाला संरक्षित करण्यासाठी जे आवरण असते त्यास 'मूलटोपी ' म्हणतात.
  • पेर:- खोडावरच्या ज्या ठिकाणाहून पाने फुटतात, त्याला पेर (Node) म्हणतात. 
  • कांडे:- दोन क्रमवार पेरांतील अंतराला कांडे (Internode) म्हणतात.
  • मुकुल:- खोडाच्या अग्रभागाला मुकुल (Bud) असे म्हणतात.
  • पर्णधारा (Leaf Margin): पर्णपत्राची जी  कडा असते त्यास पर्णधारा म्हणतात. 
  • पर्णाग्र (Leaf Apex): पर्णपत्राचे पुढचे जे टोक असते त्यास पर्णाग्र म्हणतात.
  • पर्णतल (Leaf Base):- पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला जो भाग असतो त्यास पर्णतल म्हणतात.
  • उपपर्ण (Stipules):- पानांच्या पर्णतलापाशी असणारा जो छोटासा पानासारखा भाग असतो त्यास उपपर्ण म्हणतात.
  •  साधे पान:- ज्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते त्यास साधे पान म्हणतात.
  • संयुक्त पान:- ज्या पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये (Leafle विभागलेले असते त्यास संयुक्त पान म्हणतात.
  •  जाळीदार शिराविन्यास (Reticulate Venation):- ज्या पर्णपत्राच्या मध्यभागी एक जाड शीर (Vein) असल्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागांत विभागल्यासारखे दिसते व या मुख्य शिरेस उपशिरा फुटलेल्या असल्यामुळे त्यांचे जाळे तयार होते त्यास जाळीदार शिराविन्यास म्हणतात.  
  • समांतर शिराविन्यास (Parallel Venation) :- ज्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या सुरुवातीपासून ते थेट टोकापर्यंत एकमेकांस समांतर असतात त्यास समांतर शिराविन्यास म्हणतात. 
  •  परागीभवन (Pollination) : परागकण कुक्षीवर जाऊन पडण्याच्या क्रियेला 'परागीभवन' म्हणतात. 
  • फलन (Fertilization) : अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होण्याच्या क्रियेला 'फलन' म्हणतात. 
  • विद्राव्य :- जो पदार्थ पूर्णतः विरघळू शकतो त्याला विद्राव्य म्हणतात. 
  • द्राव्य:- जो पदार्थ विरघळतो, त्याला द्राव्य म्हणतात.
  • द्रावक:- ज्या पदार्थात द्राव्य विरघळते, त्याला द्रावक म्हणतात.
  • द्रावण:- द्राव्य हे द्रावकात जेव्हा संपूर्णपणे मिसळते, तेव्हा द्रावण तयार होते.
  • वातावरणीय दाब:- हवेमुळे पडणाऱ्या दाबाला वातावरणीय दाब म्हणतात.
  • प्रकाशाचे विकिरण:- प्रकाश किरणांचे सर्व दिशांना विखुरणे म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय.
  • वैश्विक द्रावक:- पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात, म्हणून त्याला वैश्विक द्रावक म्हणतात.
  • कुपोषण:- आहारातून सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत, तर होणाऱ्या स्थितीला कुपोषण असे म्हणतात.
  • पोषण:- पोषक द्रव्य शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात.
  • अन्नपदार्थ:- ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते त्या पदार्थांना अन्नपदार्थ म्हणतात.
  • बृहत् पोषकद्रव्य:- ज्या पोषकद्रव्यांची आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते त्यांना बृहत् पोषक द्रव्य म्हणतात.(कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ)
  • सूक्ष्म पोषकद्रव्ये:-  ज्या पोषकद्रव्यांची आपल्या शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता असते त्यांना सूक्ष्म पोषक द्रव्य म्हणतात.(खनिजे, क्षार व जीवनसत्वे)
  • स्वयंपोषी:- जे सजीव प्रकाश संश्लेषण क्रियेतून स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी असे म्हणतात.
  • परपोशी:- जे सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतात त्यांना परपोषी म्हणतात.
  • सहजीवी पोषण:-  सजीवांच्या निकट सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आधार इत्यादी साध्य करण्यासाठी जेव्हा दोन किंवा अधिक सजीव एकत्र येतात तेव्हा त्याला सहजीवी पोषण असे म्हणतात. 
  • अन्नग्रहण:- मुखावाटे अन्न शरीरात घेण्याचे क्येला अन्नग्रहण म्हणतात
  • पचन:- अन्नाचे साध्या विद्राव्य घटकात रूपांतर होण्याच्या क्रियेला पचन असे म्हणतात.
  • सात्मीकरण:- शरीरातील पेशी व ऊतीमध्ये अन्न घटकांचे वहन व पेशीतील तंतुकनिकेत ऊर्जा निर्मिती होण्याच्या क्रियेला सात्मीकरण  म्हणतात.
  • उत्सर्जन:- न पचलेले आणि न शोषलेले अन्नघटक गुदद्वारावाटे शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात.


🎻 यानंतर चा लेख व्याख्या... मेंदूला खुराक 2 ची लिंक 🔗 खाली 👇 दिली आहे.

व्याख्या... मेंदूला खुराक 2

 ----&&&----

🎸 यानंतर चा लेख व्याख्या... मेंदूला खुराक 3 ची लिंक 🔗 खाली 👇 दिली आहे.

   व्याख्या... मेंदूला खुराक 3🎷  

 :::::----::::

*हे सगळं येथेच राहणार आहे, 

तुमच्या असण्याने व 

नसण्याने या विश्वाला 

काहीच फरक पडत नाही.*

         *तुम्ही याचे मालक नसून

 तात्पुरते वाहक आहात

 याचं भान ठेवलं तर

 आयुष्य सोपं आहे...!!!*

  *आपला दिवस आनंदी जावो.*🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...