व्याख्या...... मेंदूला खुराक 2 🎷
🌅 या अगोदरच्या लेखात, व्याख्या... मेंदूला खुराक 1 साठीची लिंक 🔗 खाली 👇 दिली आहे.
आपल्या विज्ञान विषयक माहितीसाठी खालील👇 What's App समूहात सामील व्हा🙏.🎷
WhatsApp Group
Join Now
- शाकाहारी प्राणी:- जे प्राणी केवळ वनस्पती, बिया, फळे, गवत यांचा अन्न म्हणून वापर करतात त्यांना शाकाहारी प्राणी असे म्हणतात.
- मांसाहारी प्राणी:- जे प्राणी इतर प्राण्यांच्या मांसाचा अन्न म्हणून स्वतःच्या आहारात समावेश करतात त्यांना मांसाहारी प्राणी म्हणतात.
- मिश्राहारी प्राणी:- जे प्राणी अन्नासाठी वनस्पती आणि प्राणी असे दोन्ही वर अवलंबून असतात त्यांना मिश्राहारी प्राणी म्हणतात.
- स्वच्छताकर्मी:- मृत प्राण्यांच्या शरीरापासून जे प्राणी स्वतःचे अन्न मिळवतात त्यांना स्वच्छताकर्मी असे म्हणतात.
- विघटक:- काही सूक्ष्मजीव हे मृत शरीरांच्या अवशेषांपासून तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून स्वतःचे अन्न मिळवतात त्यांना विघटक असे म्हणतात.
- परजीवी पोषण:- एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहून स्वतःचे पोषण प्राप्त करतो पण त्याला ठार मारत नाही त्याला परजीवी पोषण असे म्हणतात.
- बाह्यपरजीवी पोषण:- जर एखादा प्राणी इतर प्राण्यांच्या शरीराच्या पृष्ठभागावर राहून त्याचे रक्त शोषण त्याचा अन्न म्हणून वापर करत असेल तर त्याला बाह्य परजीवी पोषण म्हणतात.
- अंत:परजीवी पोषण:- जर एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात राहुन रक्तादरे अन्नाचे शोषण करत असेल तर त्याला अंत:परजीवी पोषण असे म्हणतात.
- अर्धपरजीवी वनस्पती:- बांडगुळ पूर्णपणे आधारक वनस्पतीवर अवलंबून नसते, ते आधारक वृक्षाकडून खनिज व पाणी शोषून घेतल्यावर स्वतःचे अन्न स्वतः बनू शकते म्हणून त्याला अर्धपरजीवी वनस्पती म्हणतात.
- पर्णरंध्रे:- पानावरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात.
- अन्नबिघाड:- अन्नपदार्थांचा नैसर्गिक रंग, चव, वास, पोत, दर्जा यामध्ये बदल होणे व त्यातील पोषकद्रव्यांच्या नाश होणे म्हणजेच अन्नबिघाड होय.
- संख्यात्मक अन्ननासाडी:- ज्या प्रक्रियेत मुठीने पेरणे, अयोग्य साठवण, अव्यवस्थित मळणी व वितरणाच्या चुकीच्या पद्धतीचा वापर केला जातो त्यास संख्यात्मक अन्न नासाडी म्हणतात
- अन्नरक्षण:- निर्जलीकरण, गोठणीकरण, धुरीकरण, परिरक्षकांचा वापर या क्रियेतून नाशवंत अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्नरक्षण होय.
- निर्जलीकरण:- शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात.
- पाश्चरीकरण:- ज्या पद्धतीत 80° C तापमानापर्यंत पंधरा मिनिटे तापवले जाते व नंतर ताबडतोब थंड केले जाते यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन दूध दीर्घकाळ टिकण्याच्या क्रियेला पाश्चरीकरण म्हणतात.
- गुणात्मक अन्न नसाडी:- अन्नाच्या गुणात किंवा दर्जात नाश होऊन घट होणे म्हणजे अन्नाची गुणात्मक नासाडी होय.
- अन्नभेसळ:- चांगल्या अन्नपदार्थात अशुद्ध आणि हानिकारक असे त्यासारखेच परंतु स्वस्त पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला अन्नभेसळ असे म्हणतात.
- ढगफुटी:- जमिनीकडील उष्ण तापमानामुळे पावसाच्या पाण्याची परत वाफ होऊन ती ढगातच सामावली जाणे व तेथे शीघ्र संघनन प्रक्रिया घडून अचानकपणे एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे 100 मिलिमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात ढग फुटल्याप्रमाणे मुसळधार येणारा पाऊस म्हणजे ढगफुटी.
- भूकंप:- भूकवचात अचानक होणारी जमिनीची कंपने म्हणजे भूकंप.
- त्सुनामी:- भूकंप व ज्वालामुखी यामुळे महासागरात विशिष्ट प्रकारच्या ताशी 800 ते 900 किलोमीटर इतका वेग असणाऱ्या लाटा किनार्यावर येऊन धडकण्या ला त्सुनामी म्हणतात.
- वहन:- पदार्थाच्या उष्ण भागाकडून थंड भागाकडे होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास उष्णतेचे वहन म्हणतात.
- उष्णतेचे अभिसरण:- द्रव पदार्थास भांड्याच्या तळाकडून उष्णता दिली असता घनतेच्या फरकामुळे प्रवाह निर्माण होऊन त्याद्वारे द्रव पदार्थात उष्णतेचे संक्रमण होते यास उष्णतेचे अभिसरण म्हणतात.
- प्रारण:- कोणतेही माध्यम नसतानाही विद्युत चुंबकीय तरंगांच्या स्वरूपात होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणास प्रारण म्हणतात.
- सुवाहक:- ज्या पदार्थामधून उष्णता व विद्युत यांचे वहन सहजपणे होते त्यांना सुवाहक म्हणतात.
- दुर्वाहक:- ज्या पदार्थामधून उष्णता व विद्युत यांचे वहन सहजपणे होत नाही त्यांना सुवाहक म्हणतात.
- भौतिक राशी:- वस्तुमान, वजन, वेग, तापमान, अंतर, आकारमान, लांबी इत्यादी राशींना भौतिक राशी असे म्हणतात.
- सदिश राशी:- ज्या राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण व दिशा या दोहोंची गरज असते त्या राशींना सदिश राशी म्हणतात.
- अदिश राशी:- ज्या राशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्ण व्यक्त करता येतात त्यांना अदिश राशी म्हणतात.
- वस्तुमान:- पदार्थांमधील द्रव्य संचय म्हणजे वस्तुमान.
- वजन:- वस्तूवर जेवढे गुरुत्वी बल कार्यकर्ते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात. किंवा
- वजन:- वस्तुमानावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन असे म्हणतात.
- पृथ्वीवरील वजन:- एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने स्वतःच्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन असे म्हणतात.
- पायाभूत राशी:- ज्या राशींचे प्रमाण ठरवता येते अशा राशींना पायाभूत राशी असे म्हणतात.
- क्युबिट:- स्वतःच्या कोपरापासून मधल्या बोटाच्या टोकापर्यंतचे अंतर म्हणजे 1 क्युबिट.
🎻 यानंतर चा लेख व्याख्या... मेंदूला खुराक 3 ची लिंक 🔗 खाली 👇 दिली आहे.
*🙏 सुमधुर स्नेह वंदन।🙏*🎷
*जीवन कैसी विचित्र पहेली है*
*अनोखी इसकी रीति,*
*अनोखी इसकी शैली है*
*दिल में रखो तो बोझ सा होता है,*
*कह दो तो अफसोस होता है।*
*🙏आपका हर दिन मंगलमय और
सुखमय हो। 🙏*🥁
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा