व्याख्या.... मेंदूला खुराक 4 🎷
काही व्याख्या योग्य शब्दरचना करून मनाने लिहिल्या आहेत.🙏🎻
🪷 आपल्या विज्ञान विषयक What's App समूहात सामील होण्यासाठी खालील लिंक ला स्पर्श करा.🙏
WhatsApp Group
Join Now
🌼 या अगोदरच्या लेखात, व्याख्या... मेंदूला खुराक 1 ,2, 3 साठीची लिंक 🔗 क्रमशः खाली 👇 दिली आहे.
1. व्याख्या... मेंदूला खुराक 1🎷
2. व्याख्या... मेंदूला खुराक 2🎷
3. व्याख्या... मेंदूला खुराक 4 🎷
====®®®====
- अन्नपचन:- खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात करून नंतर ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
- ग्रसनी:- ज्या ठिकाणी अन्ननलिकेचे व श्वासनलिकेचे तोंड उघडते, असा घशातील भाग म्हणजे ग्रसनी.
- जठर:- अन्ननलिकेच्या पिशवी सारख्या भागाला जठर असे म्हणतात.
- नैसर्गिक बदल:- जे बदल निसर्गतःच घडून येतात, त्यांना नैसर्गिक बदल म्हणतात.
- मानवनिर्मित बदल:- जे बदल मानवी हस्तक्षेपाने घडून येतात, त्यांना मानवनिर्मित बदल म्हणतात.
- उपयुक्त बदल:- आपल्या गरजेनुसार जे बदल करण्यात येतात त्यांना उपयुक्त बदल म्हणतात.
- हानिकारक बदल:- ज्या बदलांनी मानवास हानी पोहोचते, त्या बदलांना हानिकारक बदलणे म्हणतात.
- पदार्थ:- एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक परिभाषेत पदार्थ असे म्हणतात.
- मिश्रण:- दोन किंवा दोन पेक्षा अधिक पदार्थ कोणत्याही प्रमाणात एकमेकात मिसळले असता, जो पदार्थ तयार होतो त्यास मिश्रण म्हणतात.
- रेणू:- पदार्थाच्या लहानात लहान कणाला रेणू असे म्हणतात.
- मूलद्रव्ये:- ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणु असतात, त्या पदार्थांना मूलद्रव्ये म्हणतात. किंवा
- मूलद्रव्ये:- ज्या पदार्थांचे आणखी पुढे विघटन करता येत नाही व ज्यामध्ये एकाच प्रकारचे अणु असतत त्यांना मूलद्रव्ये म्हणतात.
- धातू:- ज्या मूलद्रव्यामध्ये तन्यता, वर्धनीयता, विद्युत व उष्णता सुवाहकता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म असतात त्यांना धातू असे म्हणतात.
- अधातू:- जी 18 मूलद्रव्य ठिसूळ असून उष्णता व विजेचे दुर्वाहक असतात त्यांना अधातू म्हणतात.
- धातुसदृश्य:- ज्या मुलद्रव्यांत काही प्रमाणात धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दिसतात त्यांना धातुसदृश्य म्हणतात.
- संज्ञा:- मूलद्रव्याच्या अद्याक्षररूपी संक्षेपास त्या मूलद्रव्याची संज्ञा असे म्हणतात. किंवा
- संज्ञा:- मूलद्रव्याला संबोधण्यासाठी वापरलेल्या संक्षेपाला त्या मूलद्रव्याची संज्ञा म्हणतात.
- संमिश्र:- दोन किंवा अधिक मूलद्रव्य मिसळून जो मिश्र धातू मिळतो, त्यास संमिश्र असे म्हणतात.
- संयुग:- दोन किंवा अधिक मूलद्रव्य विशिष्ट वजनी प्रमाणात एकत्र येऊन जो नवीन गुणधर्माचा पदार्थ तयार होतो, त्यास संयुग असे म्हणतात.
- रेणुसूत्र:- संज्ञांचा वापर करून पदार्थ संक्षिप्त स्वरूपात लिहिण्याला रेणुसूत्र असे म्हणतात.
- उर्ध्वपातन:- द्रावणातून द्रव्य बाहेर काढण्यासाठी व अशुद्ध द्रव पदार्थ शुद्ध करण्यासाठी जी पद्धत अवलंबली जाते त्यास उर्ध्वपातन म्हणतात.
- द्रव्य:- वस्तू ज्यापासून तयार झालेली असते, त्याला शास्त्रीय परिभाषेत द्रव्य असे म्हणतात.
- अपकेंद्री पद्धत:- द्रव आणि स्थायूंच्या मिश्रणातून स्थायू वेगळे करण्यासाठी जी पद्धत अवलंबली जाते, त्यास अपकेंद्री पद्धत असे म्हणतात. (Centrifuge)
- रंजकद्रव्य पृथक्करण पद्धत:- एकाच द्रावणात दोन किंवा अधिक पदार्थ अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर असे पदार्थ वेगळे करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते, त्यास रंजकद्रव्य पृथक्करण पद्धत म्हणतात.
- टूथपेस्ट:- कॅल्शियम कार्बोनेट व कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट सोबत अल्प प्रमाणात फ्लोराईड असलेल्या एकत्रीकरणास टूथपेस्ट म्हणतात.
- अपमार्जक:- पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात.
- नैसर्गिक अपमार्जक:- सॅपोनिन हा रासायनिक पदार्थ असलेल्या अपमार्जकास नैसर्गिक अपमार्जक म्हणतात.
- आधुनिक सिमेंट:- सिलिका, ॲलुमिना, चुना, आयर्न ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार झालेल्या पदार्थास आधुनिक सिमेंट म्हणतात.
- प्राचीन किंवा जलीय सिमेंट:- भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून जलीय सिमेंट तयार केले जाते.
- नैसर्गिक संसाधने:- जी संसाधने आपल्याला निसर्गातून मिळतात, त्यांना नैसर्गिक संसाधने असे म्हणतात.
- शिलावरण:- जमीन व त्याखालील कठीण कवच आणि त्यावरील माती, पर्वत, दगड, खडक, डोंगर, पठार अशा सर्व भूभागाला शिलावरण असे म्हणतात.
- धातूके:- ज्या खनिजांमध्ये धातूचे प्रमाण जास्त असते त्याला धातुके म्हणतात.
- मृदा अशुद्धी:- धातू काम मधील वाळू व मातीच्या अशुद्धेला मृदा अशुद्धी असे म्हणतात.
- इंधन:- ऊर्जा निर्मितीसाठी दैनंदिन वापरामध्ये जे विविध पदार्थ वापरले जातात, त्या पदार्थांना इंधने असे म्हणतात.
- खनिज तेल:- खडकात जीवाश्म इंधन द्रवरूपात असेल तर त्याला खनिज तेल असे म्हणतात.
- ऊर्जा संकट:- जीवाश्म इंधनांचे साठे संपण्याची भीती म्हणजे ऊर्जा संकट होय.
- जंगल:- सर्वसाधारण विस्तृत प्रदेश जिथे वनस्पतींच्या वेगवेगळ्या जाती एकत्रित दिसतात, त्याला जंगल म्हणतात.
- बिंदूस्त्रोत:- जेव्हा प्रकाश स्त्रोत सूक्ष्म आकाराचा असतो, तेव्हा त्यास बिंदू स्त्रोत म्हणतात.
- प्रच्छाया:- बिंदू स्त्रोतातून निघणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात वस्तू ठेवल्यास पडद्यावर केवळ एकच छाया मिळते, त्यास प्रच्छाया किंवा गडद छाया म्हणतात.
- विस्तारित स्त्रोत:- जेव्हा प्रकाश स्त्रोत मोठ्या आकाराचा असतो, तेव्हा त्यास विस्तारित स्त्रोत म्हणतात.
- सूर्यग्रहण:- अमावास्येच्या दिवशी जेव्हा सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र येतो, त्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या भागावर पडते, त्या भागातून सूर्य दिसत नाही या खगोलीय स्थितीस सूर्यग्रहण म्हणतात.
- चंद्रग्रहण:- पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सूर्य व चंद्र यांच्या दरम्यान पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते या खगोलीय घटनेस चंद्रग्रहण म्हणतात.
- पिधान:- जेव्हा एखादा ग्रह किंवा तारा चंद्राच्या मागे झाकला जातो, तेव्हा त्या खगोलीय घटनेस पिधान म्हणतात.
- शून्य छाया दिन:-कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्या दरम्यान असलेल्या प्रदेशात जेव्हा सूर्य अचूक आपल्या डोक्यावर येतो तेव्हा आपली सावली पूर्णपणे नाहीशी होते या घटनेस शून्य छाया दिन म्हणतात.
- प्रकाशाचे विकिरण:- वातावरणातील रेणू, धुलीकरण व इतर सूक्ष्म कण यांच्यावर प्रकाशाचे किरण आदळतात व सर्वत्र विखुरले जातात या घटनेस प्रकाशाचे विकिरण म्हणतात.
- ध्वनीची वारंवारता:- 'सा रे ग म प ध नी सा' या स्वरांच्या उंचीला विज्ञानाच्या परिभाषेत ध्वनीची वारंवारता असे म्हणतात.
- आयाम:- कंपायमान अवस्थेत असलेल्या वस्तूच्या मध्य स्थिती पासून कोणत्याही एका बाजूस होणाऱ्या जास्तीत जास्त अंतराला त्या कंपनाचा आयाम म्हणतात.
- स्थितीस्थापकता:- ताणलेले रबर सोडून दिल्यावर ते मूळ स्थितीत येण्याच्या गुणधर्माला स्थितीस्थापकता किंवा प्रत्यास्थता म्हणतात.
- साधा दोलक:- मध्यस्थितीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे ठराविक कालावधीत पुन्हा पुन्हा पुढे मागे होणाऱ्या वस्तूला 'साधा दोलक' म्हणतात.
- दोलनगती:- मध्यस्थीती पासून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणाऱ्या ढोलकाच्या गतीला 'दोलनगती' म्हणतात.
- दोलन:- मागे-पुढे होणारा दोलक एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येणे याला 'एकदोलन' म्हणतात.
- दोलनकाळ:- दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलन काळ म्हणतात.
- वारंवारता:- दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलन संख्येला दोलकाची वारंवारता असे म्हणतात.
===÷÷÷===
सुमधुर स्नेह वंदन।🙏*
*एक बेहतरीन जिंदगी जीने के लिए
यह स्वीकार करना भी जरूरी है
कि सब कुछ सबको
नहीं मिल सकता।*
*आपका हर दिन
मंगलमय और सुखमय हो।🙏*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा