मुख्य सामग्रीवर वगळा

10 वी. विज्ञान भाग-1 प्र. 1. (ब), प्रश्न 2. (ब) (4)

 

10 वी. विज्ञान भाग-1 प्र. 1. (ब), प्रश्न 2. (ब) (4)

●▬▬๑۩ ۩๑▬▬● What's App Group Join Now

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴

🎢 दृष्टिसातत्याचे स्पष्टीकरण करा. दृष्टिसातत्याचे एक उदाहरण दया.

उत्तर : दृष्टिसातत्य : जेव्हा एखादया वस्तूची प्रतिमा ही नेत्रभिंगामुळे दृष्टिपटलावर तयार होते, तेव्हा ती वस्तू आपल्याला दिसते. वस्तू दूर केल्याबरोबर तिची प्रतिमा नाहीशी होते. परंतु प्रतिमेचा परिणाम, म्हणजेच प्रतिमेची दृष्टिपटलावरील संवेदना त्यानंतरही 1/ 16 सेकंद टिकते. काही काळ दृष्टिपटलावरील संवेदना टिकते, या परिणामास दृष्टिसातत्य  म्हणतात. वस्तू दूर केल्यानंतरही 1/ 16 सेकंदपर्यंत दृष्टिसातत्यामुळे आपल्याला वस्तू मूळ जागी दिसत राहते.

उदाहरण : जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास, 1 सेकंदपेक्षा कमी वेळात 16 वर्तुळ पूर्ण केल्यास, तांबड्या रंगाचे वर्तुळ आपणास दिसते.


💥 पुढील संज्ञा स्पष्ट करा :

  1.  खनिजे : धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिजे म्हणतात. उदा., खनिजांची एकत्रित मिश्रणे रॉक या स्वरूपात आढळतात. उदा. ग्रॅनाइट खनिजे आहे.
  2.  मृदा अशुद्धी: धातुकांमध्ये धातूंच्या संयुगांबरोबर माती, वाळू, खडकीय पदार्थ वगैरे अशुद्धी असतात. या अशुद्धींना मृदा अशुद्धी म्हणतात.
  3.  धातुके (Ores): ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीररीत्या धातू वेगळा करता येतो, त्यांना धातुके म्हणतात. उदा., बॉक्साइट (Al2O3.7H2O).
  4.  धातुविज्ञान (Metallurgy): धातुकापासून धातूचे शुद्ध रूपात निष्कर्षण करणे व त्यानंतर धातूला शुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून जास्तीत जास्त शुद्ध करतात, या प्रक्रियेला धातुविज्ञान म्हणतात.
  5.  धातुकांचे संहतीकरण (Concentration of Ores): धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे संहतीकरण म्हणतात.
  6.  भाजणे (Roasting) : धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साइडमध्ये रूपांतर केले जाते. या प्रक्रियेला भाजणे असे म्हणतात. उदा., जस्ताची धातुके भाजणे (सल्फाइड धातुके).
  7. निस्तापन (Calcination): कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवून ऑक्साइडमध्ये रूपांतरित करतात. या प्रक्रियेला निस्तापनः म्हणतात. 
  8. शुद्धीकरण (Purification) अशुद्ध धातूचे शुद्धीकरण करण्यासाठी विद्युत अपघटनासारख्या व्यापक पद्धतीला शुद्धीकरण म्हणतात.

🦍 आयनिक संयुगे म्हणजे काय?

उत्तर : धन आयन व ऋण आयन या दोन घटकांपासून तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात.

किंवा

धातूकडून अधातूकडे इलेक्ट्रॉन्स दिले जाऊन तयार होणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे (Ionic Compounds) म्हणतात.


🦅  आयनिक बंध म्हणजे काय ?

उत्तर : धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युत स्थितिक आकर्षण बल असते. हे आकर्षण बल म्हणजेच धन आयन व ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय.

©️  क्षरण म्हणजे काय ते उदाहरणासहित स्पष्ट करा.

उत्तर : धातू हे हवा, पाणी किंवा रासायनिक पदार्थ (आम्ल) यांच्या सान्निध्यात आले असता हळूहळू त्यांची झीज होण्यास सुरुवात होते. या प्रक्रियेला क्षरण म्हणतात.

 किंवा 

क्षरण म्हणजे पर्यावरणामुळे पदार्थाचा होणारा ऱ्हास.

लोखंडाचे क्षरण ही सर्वांत प्रमुख समस्या आहे कारण लोखंड हे इमारती, पूल, जहाजे, स्वयंचलित वाहने इत्यादींच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. लोखंडाची दमट हवेबरोबर अभिक्रिया होऊन तपकिरी पदार्थांचा थर जमा होतो. या पदार्थास गंज म्हणतात

🛼  शृंखलाबंधन शक्ती (Catenation Power) म्हणजे काय?

उत्तर : कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर बंघ तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता असते; त्यातून मोठे रेणू तयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखलाबंधन शक्ती (Catenation Power) म्हणतात.

🔥  सहसंयुज बंध म्हणजे काय ?

संज्ञा स्पष्ट करा: 

💐 सहसंयुज बंध: दोन अणूंमध्ये संयुजा-इलेक्ट्रॉनच्या भागीदारीने जो रासायनिक बंध तयार होतो, त्याला सहसंयुज बंध म्हणतात. 

🚠  अल्केन : संपृक्त हायड्रोकार्बनमध्ये कार्बन कार्बन अणूंमध्ये फक्त एकेरी बंध असतो त्याला अल्केन म्हणतात. उदा., मीथेन (CH4), ईथेन (C2H6).

 🥊 अल्कीन: कार्बन कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनना अल्कीन म्हणतात. उदा., एथिन (CH2 = CH2)

🍏 अल्काइन: कार्बन कार्बन तिहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनना अल्काइन म्हणतात. उदा. ईथाइन (C2H2)

📞 समावेशन अभिक्रिया (Addition Reaction): जेव्हा एखादे सेंद्रिय संयुग हे दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पावून दोघांमधील सर्व अणू असलेले एखादे उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेला समावेशन अभिक्रिया म्हणतात.

उदा.

वनस्पती तेल + H2(g) Ni उत्प्रेरक  ---> वनस्पती तूप.

🪷  प्रतियोजन अभिक्रिया (Substitution Reaction): जेव्हा रेणूमधील एका प्रकारच्या अणूची किंवा अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू किंवा अणुगट घेतो, तेव्हा त्या अभिक्रियेला प्रतियोजन अभिक्रिया म्हणतात.

 ━•─────────━•

तीन मनोरंजक लघु कथा

या तीनही कथांना सखोल अर्थ आहे. 

१. "गहन"

मी लिफ्ट मध्ये एका लहान मुलाला आईस्क्रीम खात असलेलं बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो, "आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील!"


तो मुलगा उत्तरला, "माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली."


मी विचारलं, "आइसक्रीम खाल्यामुळे?"


तो म्हणाला, "नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खूपसत नाही!"


किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात! आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय - कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय?


२. "थकलेला"


आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंट बद्दल बातम्या पाहात होतो - लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.


ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते मी सुटकेचा निश्वास टाकला.


बापरे, माझ्या मनावरचा ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!


मात्र मी एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.


३. "थांबा"

एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तीनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, "सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात."


त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागान ओरडून म्हणाला, "हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं ?"


त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या शिटापाशी उभी राहिली.


ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली, "सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं"


तात्पर्य

मनावर संयम असावा

आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो. ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं. 

या तीन गंमतदार छोट्या गोष्टी किती चांगल्या आहेत . . 😊🎻🎷 What's App वरून साभार अनामिक लेखकास🙏.

🌀 या अगोदर झालेले भाग क्रमशः 👇

  1. 10 वी. विज्ञान भाग 1. प्र. 1 ब व प्र. 2 ब (1)
  2. 10 वी. विज्ञान भाग 1 प्र. 1 ब व प्र. 2 ब (2)
  3. 10 वी.विज्ञान भाग 1. प्र. 1 ब व प्र. 2 ब (3)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

10 th, part 1, Gravitation 1 🎷

  10 th, part 1, Gravitation 1 🎷 A Link 🔗 for Test  on Gravitation 1 chapter given below 👇 🎷 Touch the blue link below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 🌞 What are the effects of force acting on an object?  Ans: A force can change the shape and size of the body on which the force acts. Can change the speed of the body, Force can stop a moving body,  A force can set a body in motion , Force can change the direction of motion of the body, Force can change the speed as well as the direction of motion of the body.  🎷 What types of forces are you familiar with ? Ans:  gravitational force  nuclear force Electromagnetic force Frictional force Magnetic force,  Spring force, Muscular forces. Tension force, Air resisting force. 🔱 What do you know about the gravitational force ? Ans: the gravitational force is a universal force; i.e., gravitational force acts between any two objects in th...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.