मुख्य सामग्रीवर वगळा

10 वी. विज्ञान भाग-1 प्र. 1. (ब), प्रश्न 2. (ब)(2)


10 वी. विज्ञान भाग-1 प्र. 1. (ब), प्रश्न 2. (ब) (2)

नियम व व्याख्या. 

●▬▬๑۩ ۩๑▬▬● What's App Group Join Now

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴

 💫 शीघ्र अभिक्रिया म्हणजे काय?

 किंवा

 व्याख्या दया : शीघ्र अभिक्रियाः

उत्तर : जी रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो, त्या अभिक्रियेला शीघ्र अभिक्रिया म्हणतात.


🔥 व्याख्या ट्या : ऑक्सिडीकरण अभिक्रिया.

उत्तर : ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते, अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात.

🍫  ऑक्सिडक (Oxidant) म्हणजे काय

उत्तर : जो रासायनिक पदार्थ ऑक्सिजन उपलब्ध करून देऊन ऑक्सिडीकरण अधिक्रिया घडवून आणतो, त्याला ऑक्सिडक (Oxidant) म्हणतात.


🏒  व्याख्या दया: क्षपण क्रिया.

उत्तर : ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारक हायड्रोजन प्राप्त करतात किंवा त्यातून ऑक्सिजन निघून जातो आणि उत्पादित तयार होते, अशा अभिक्रियेला क्षपण क्रिया म्हणतात.

 🌞 क्षपणक म्हणजे काय

उत्तर : जो पदार्थ क्षपण घडवून आणतो त्या पदार्थाला क्षपणक म्हणतात. 

 🎆 क्षरण म्हणजे काय ?

उत्तर : परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकांमुळे (हवेतील आर्द्रतेमुळे) धातूचे ऑक्झिाडीकरण व पर्यायाने त्याची झीज होते, त्यास क्षरण म्हणतात.

 रासायनिक सूत्र Fe2O3.xH₂O 

🌀 संज्ञा स्पष्ट करा: खवटपणा.

उत्तर : जेव्हा तेल किंवा तूप दीर्घकाळ तसेच ठेवले जाते किंवा तळलेले पदार्थ दीर्घकाळ तसेच ठेवले जातात; त्यामुळे त्याचे ऑक्सिडीकरण होते, तेव्हा त्यास खवटपणा प्राप्त होतो. तसेच त्याची चव व वास बदलते. या प्रक्रियेला खवटपणा म्हणतात.


🦅 व्याख्या लिहा : विद्युतशक्ती

उत्तर : विद्युतशक्ती म्हणजे एकक कालावधीत घडून आलेले विद्युत कार्य होय.

किंवा

विद्युतशक्ती म्हणजे वेळेच्या संदर्भात विद्युत ऊर्जा वापराचा दर विद्युत ऊर्जा कालावधी होय.

🎊 एक किलोवॅट तास म्हणजे काय ?

उत्तर : एक किलोवॅट-तास म्हणजे एक किलोवॅट शक्ती असलेल्या विद्युत उपकरणाने एका तासात वापरलेली विद्युत ऊर्जा होय. ही 3.6 * 10 ^ 6 इतकी असते.

👍 उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम लिहा. 



 उत्तर : कल्पना करा की, सरळ

विद्युतवाहकाला तुम्ही उजव्या हातात अशा रितीने पकडले आहे की, अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. तर मग तुमची बोटे विद्युतवाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय.

🫲 फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम लिहा. 




उत्तर : फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आपल्या डाव्या हाताची तर्जनी, मधले बोट आणि अंगठा एकमेकांना लंब राहतील अशी ताठ धरल्यास, जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल आणि मधले बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल, तर अंगठ्याची दिशा ही विद्युतवाहकावरील बलाची दिशादर्शक असते.


🎷  व्याख्या लिहा : विद्युतचलित्र.

उत्तर : : विदयुत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या उपकरणाला विद्युतचलित्र म्हणतात. 

©️ विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय ?

उत्तर : ज्या प्रक्रियेमध्ये वाहकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या वाहकामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते, त्या प्रक्रियेला विद्युतचुंबकीय प्रवर्तन म्हणतात. वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल अथवा वाहक स्थिर राहून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल, तर वाहकात विद्युतधारा निर्माण होते (म्हणजेच प्रवर्तित होते).


🍏 फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम लिहा.

उत्तर : फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम : कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की, कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते.


🍑 फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम लिहा.





उत्तर : फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम आपल्या उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांस लंब राहतील अशी ताणा. जर तर्जनी चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत आणि अंगठा विद्युतवाहकाच्या गतीच्या दिशेत असेल, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवतो.

🛼  व्याख्या लिहा : वितळणाचा अप्रकट उष्मा.

उत्तर : स्थायूचे द्रवात रूपांतर होत असताना स्थिर तापमानाला (पदार्थाच्या द्रवणांकाला) जी उष्णता शोषली जाते, तिला वितळणाचा अप्रकट उष्मा म्हणतात.

🪀 व्याख्या लिहा : वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा.

उत्तर : एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे द्रवामध्ये पूर्णपणे रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता स्थायूत शोषली जाते, त्या उष्णतेला वितळणाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात.


🎢  व्याख्या लिहा : पदार्थाचा उत्कलनांक.

उत्तर : ज्या तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना उष्णता शोषली जाते, परंतु तापमान स्थिर राहते, त्या तापमानास पदार्थाचा उत्कलनांक म्हणतात.


📞  व्याख्या लिहा : बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा.

उत्तर : एकक वस्तुमानाच्या द्रव पदार्थाचे वायूमध्ये पूर्ण रूपांतर होत असताना स्थिर तापमानावर जी उष्णता द्रवात शोषली जाते, त्या उष्णतेला बाष्पनाचा विशिष्ट अप्रकट उष्मा म्हणतात.


🚠  व्याख्या लिहा : पुनर्हिमायन.

उत्तर : दाबामुळे बर्फाचे वितळणे व दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे या प्रक्रियेला पुनर्हिमायन म्हणतात.

 🦍 व्याख्या लिहा : दवबिंदू तापमान.

उत्तर : एका विशिष्ट तापमानाची असंपृक्त हवा घेतली व तिचे तापमान कमी करीत नेले, तर तापमान कमी होताना ज्या तापमानास हवा बाष्पाने संपृक्त होते, त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात.


🫵 व्याख्या लिहा : निरपेक्ष आर्द्रता.

निरपेक्ष आर्द्रताचे एकक सांगा.

उत्तर : एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास निरपेक्ष आर्द्रता म्हणतात.

निरपेक्ष आर्द्रतेचे एकक = वस्तुमानाचे एकक / आकारमानाचे एकक = kg/m³.


😎  सापेक्ष आर्द्रता.

उत्तर : हवेच्या ठरावीक आकारमानात व तापमानास प्रत्यक्ष समाविष्ट बाष्पाचे वस्तुमान व हवा संपृक्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाष्पाचे वस्तुमान यांच्या गुणोत्तरास सापेक्ष आर्द्रता म्हणतात.

 ━•─────────━•

या अगोदर झालेल्या व्याख्या पाहण्यासाठी खालील 👇लिंक क्लास स्पर्श करा.

10 वी. विज्ञान भाग 1.(ब) (1)

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴

*पति* : डार्लिंग आज जेवायला काय खास बनवत आहेस?   


*पत्नी* : *अनएज्युकेटेड बीन्स !*

*पति* : हे काय आहे?


*पत्नी* : गवांर !🎷

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...