10 वी. विज्ञान भाग-1 प्र. 1. (ब), प्रश्न 2. (ब) (1)
नियम व व्याख्या.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
आकृती, उदाहरण यांचा योग्य उपयोग करून जर आपण व्याख्या, नियम लक्षात ठेवलं तर ते दीर्घकाळ स्मरणात राहतात. रविवार व सुट्टीच्या दिवसात ज्या प्रश्नांची उत्तरे आपणास येत नाही त्यांचे रिविजन केले तर.....☄️
🚨 केप्लरचा पहिला नियम:-
ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून, सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो.
💫 केप्लरचा दुसरा नियम :
ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते.
🔥 केप्लरचा तिसरा नियम :
सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो.
🏒 न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहा.
उत्तर : विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठरावीक बलाने आकर्षित करीत असते. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूंच्या वस्तुमानांच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यांमधील अंतरांच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते.
🌞 गुरुत्व त्वरण म्हणजे काय?
किंवा
व्याख्या लिहा : गुरुत्व त्वरण.
उत्तर : पृथ्वीच्या (अथवा इतर ग्रहाच्या/उपग्रहाच्या/ताऱ्याच्या) गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते. या त्वरणास पृथ्वीचे (अथवा त्या ग्रहाचे/उपग्रहाचे/ताऱ्याचे) गुरुत्व त्वरण म्हणतात.
🥸 अभिकेंद्री बल म्हणजे काय ?
किंवा
व्याख्या लिहा : अभिकेंद्री बल.
उत्तर : वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्री बल म्हणतात.
🌹 व्याख्या लिहा : गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा.
किंवा
गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणजे काय ?
उत्तर : वस्तू व पृथ्वी यांमधील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे वस्तूत जी ऊर्जा सामावलेली असते, तिला गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा म्हणतात.
🌜 मुक्तिवेग म्हणजे काय ?
किंवा
व्याख्या लिहा : मुक्तिवेग.
उत्तर : ज्या विशिष्ट आरंभ वेगामुळे पृथ्वीच्या (अथवा इतर ग्रहाच्या/उपग्रहाच्या ताऱ्याच्या) पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या (अथवा त्या ग्रहाच्या / उपग्रहाच्या ताऱ्याच्या) गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते त्यास मुक्तिवेग म्हणतात. या वेळी वस्तू पृथ्वीपाएं (अथवा त्या ग्रहापासून/उपग्रहापासून/ताऱ्यापासून) अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल.
💥 डोबरायनर/ डोबेरायनर त्रिकाचा नियम लिहा.
डोबरायनरने मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली असता,
मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाचे आवर्तीफल असतात असे दिसून आले.
🎆 न्यूलैंड्सचा अष्टकाचा नियम.
उत्तर :
न्यूलैंड्सने मूलद्रव्यांची मांडवी अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता,
प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्मांप्रमाणे असतात असे दिसून आले.
©️ मेंडेलीव्हचा आवर्ती नियम सांगा.
उत्तर : मेंडेलीव्हने मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता,
मेंडेलीव्हला असे दिसून आले की, ठरावीक अवधीनंतर भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये सारखेपणा असलेल्या मूलद्रव्यांची पुनरावृत्ती होते.
मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवर्तीफल असतात.
🛼 आधुनिक आवर्ती नियम सांगा.
उत्तर : मोसलेने मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांच्या चढत्या क्रमाने केली असता,
मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्तीफल आहे असे दिसून आले.
🎯 आधुनिक आवर्तसारणी म्हणजे काय ?
उत्तर : मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या अणुअंकांच्या (Z) चढत्या क्रमाने केल्यावर मूलद्रव्यांचे जे वर्गीकरण मिळते, ते म्हणजे आधुनिक आवर्तसारणी.
📜 अपघटन अभिक्रिया म्हणजे काय?
ज्या रासायनिक अभिक्रियेत केवळ एकाच अभिक्रियाकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या रासायनिक अभिक्रियेला अपघटना अभिक्रिया असे म्हणतात.
🥊 औष्णिक अपघटन अभिक्रिया म्हणजे काय?
ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाला उष्णता देऊन त्याचे अपघटन केले जाते त्या अभिक्रियेला औष्णिक अपघटना अभिक्रिया म्हणतात.
🦅 विद्युत अपघटन अभिक्रिया म्हणजे काय ?
उत्तर : ज्या अभिक्रियेत संयुगाच्या द्रावणातून अथवा द्रवीभूत संयुगान्त विद्युतधारा प्रवाही करून त्या संयुगाचे अपघटन केले जाते, त्या अभिक्रियेला विदयुत अपघटन अभिक्रिया म्हणतात.
🌀 विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय ?
उत्तर : संयुगातील कमी क्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त क्रियाशील असलेले मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हणतात.
☸️ दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय ?
उत्तर : ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियेला दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात.
@ पुढील संज्ञा स्पष्ट करा @
(1) उष्माग्राही अभिक्रिया : ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते, त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात.
(2) उष्मादायी अभिक्रिया : ज्या अभिक्रियेत उष्णता बाहेर टाकली जाते, त्या अभिक्रियेला उष्मादायी अभिक्रिया म्हणतात.
🍕 मंद अभिक्रिया म्हणजे काय ?
किंवा
व्याख्या: मंद अभिक्रिया.
उत्तर : जी रासायनिक अभिक्रिया पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो, त्या अभिक्रियेला मंद अभिक्रिया म्हणतात.
━•───────────━•
चावी मध्ये आत्मा असतो असं म्हणतात...🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा