10 वी. विज्ञान भाग-1 प्र. 1. (ब), प्रश्न 2. (ब) (3)
नियम व व्याख्या.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
😎 व्याख्या लिहा : एक किलोकॅलरी उष्णता.
उत्तर : एक किलोग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 deg * C ते 15.5 deg * C पर्यंत, म्हणजे 1 deg * C : वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक किलोकॅलरी उष्णता म्हणतात.
🦍 व्याख्या लिहा : एक कॅलरी उष्णता.
उत्तर : एक ग्रॅम पाण्याचे तापमान 14.5 deg * C ते 15.5 deg * C पर्यंत, म्हणजे 1 deg * C ने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस एक कॅलरी उष्णता म्हणतात.
🌞 व्याख्या लिहा:- विशिष्ट उष्माधारकता.
उत्तर : एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 deg * C ने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय.
🌀 पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ?
उत्तर : पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी उष्णता विनिमयाच्या तत्त्वाचा उपयोग करतात.
━•─────────━•
🥊 प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा.
उत्तर : प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम :
- आपाती किरण व अपवर्तित किरण हे आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात.
- दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरिता sin i/ sin r हे गुणोत्तर स्थिर असते. येथे i हा आपाती कोन असून, r हा अपवर्ती कोन आहे. या गुणोत्तरास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात.
━•─────────━•
💥 प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय?
उत्तर : प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते. यास प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात.
🎯 व्याख्या लिहा : आपाती कोन.
उत्तर : आपाती किरणाने आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेशी केलेल्या कोनास आपाती कोन म्हणतात.
🍑 व्याख्या लिहा : अपवर्ती कोन.
अपवर्तित किरणाने आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेशी केलेल्या कोनास अपवर्ती कोन म्हणतात.
🍕 व्याख्या लिहा : निरपेक्ष अपवर्तनांक.
उत्तर : निर्वात पोकळीमधील प्रकाशाच्या वेगाचे त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाशी असणारे गुणोत्तर म्हणजे एखादया माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक.
☄️ प्रकाशाचे अपस्करण म्हणजे काय?
उत्तर : प्रकाशाचे अपस्करण: पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगांत पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण म्हणतात.
💫 प्रकाशाची वर्णपंक्ती म्हणजे काय ?
वर्णपंक्ती : प्रकाशझोताच्या रंगीत घटक असणाऱ्या पट्ट्याला वर्णपंक्ती म्हणतात.
🚠 व्याख्या लिहा : प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन.
उत्तर : प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात मार्गक्रमण करीत असताना, आपाती कोन हा क्रांतिक कोनापेक्षा जास्त असल्यास प्रकाशाचे अपवर्तन न होता प्रकाशाचे पूर्णपणे घन माध्यमात परावर्तन होते. यास प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणतात.
☸️ व्याख्या लिहा : क्रांतिक कोन.
उत्तर : प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जाताना ज्या आपाती कोनासाठी अपवर्तन कोनाचे मूल्य 90° होते, त्या कोनास क्रांतिक कोन म्हणतात.
━•─────────━•
📜 बहिर्गोल भिंगाने तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे कोणतेही दोन नियम लिहा.
उत्तर : बहिर्गोल भिंगाने तयार होणारी प्रतिमा मिळवण्यासाठीचे नियम :
- जर आपाती प्रकाशकिरण हा भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असेल, तर अपवर्तित प्रकाशकिरण हा भिंगाच्या मुख्य नाभीतून जातो.
- जर आपाती प्रकाशकिरण हा भिंगाच्या मुख्य नाभीतून जात असेल, तर अपवर्तित प्रकाशकिरण हा भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर जातो.
- जर आपाती प्रकाशकिरण हा भिंगाच्या प्रकाशीय केंद्रातून जात असेल, तर त्याची दिशा बदलत नाही.
✊ भिंगाची शक्ती म्हणजे काय ?
किंवा
भिंगाची शक्ती व्याख्या लिहा.
उत्तर : आपाती प्रकाशकिरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती म्हणतात. भिंगाची शक्ती ही भिंगाच्या नाभीय अंतरावर अवलंबून असते.
भिंगाची शक्ती (P) म्हणजे त्याच्या नाभीय अंतराचा (f) व्यस्तांक होय.
🌹 भिंगाच्या शक्तीचे सूत्र लिहा.
P = 1/f
👀 सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर किती ?
उत्तर : सुस्पष्ट दृष्टीचे लघुतम अंतर = 25 cm.
━•─────────━•
🎷 व्याख्या लिहा :
- भिंगाचे वक्रता केंद्र (C) भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, त्याच्या केंद्रास भिंगाचे वक्रता केंद्र (C) म्हणतात.
- भिंगाच्या वक्रता त्रिज्या (R): भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलांचे भाग असतात, त्या गोलांच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या म्हणतात.
- भिंगाचा मुख्य अक्ष:- भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रांतून जाणारी काल्पनिक सरळ रेषा म्हणजे भिंगाचा मुख्य अक्ष होय.
- भिंगाचे प्रकाशीय केंद्र:- प्रकाशकिरण हे भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाहीत, अशा मुख्य अक्षावरील बिंदूला भिंगाचे प्रकाशीय केंद्र म्हणतात.
- भिंगाची मुख्य नाभी (F): जेव्हा भिंगाच्या मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाशकिरण हे भिंगावर पडतात, तेव्हा अपवर्तनानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात (एकत्र येतात) [बहिर्गोल भिंग]. किंवा मुख्य अक्षावरील एका बिंदूपासून अपसारित होतात (बाहेर पडतात) असे वाटते [अंतर्गोल भिंग]. या बिंदूस भिंगाची मुख्य नाभी (F) म्हणतात.
- भिंगाचे नाभीय अंतर (f) : भिंगाची मुख्य नाभी व प्रकाशीय मध्य (प्रकाशीय केंद्र) यांमधील अंतराला भिंगाचे नाभीय अंतर (f) म्हणतात.
🫵. भिंगांसाठी चिन्हसंकेत लिहा.
उत्तर :
- कार्टेशिअन चिन्हसंकेतानुसार भिंगाचा प्रकाशीय मध्य (O) हा आरंभ बिंदू मानतात. मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा X-अक्ष घेतात.
- पदार्थ नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात.
- मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे भिंगाच्या प्रकाशीय मध्यापासून मोजतात.
- प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात,
- तर डावीकडे मोजलेली सर्व अंतरे ऋण मानतात.
- मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे (ऊर्ध्व अंतरे) धन असतात.
- मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे (अधो अंतरे) ऋण असतात.
- 6. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन
- अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा