सामान्य विज्ञान, इयत्ता 8 वी, सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण.
हा पाठ शिकण्या अगोदर काही व्याख्या आपल्याला माहित असणे आवश्यक आहे
व्याख्या... मेंदूला खुरक 3🎷
व्याख्या... मेंदूला खुराक 2🎷
व्याख्या.. मेंदूला खुराक 1🎷
▬▬▬۩۞۩▬▬▬
🪷 आपल्या विज्ञान विषयक What's App समूहात सामील होण्यासाठी खालील लिंक🔗 ला स्पर्श करा.🙏
WhatsApp Group
Join Now
▬▬▬۩۞۩▬▬▬
🤭 अबब:- 2011 च्या गणनेनुसार पृथ्वीवर जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत.
🎺 इतिहासात डोकावताना.
🥁 इ.स. 1735 मध्ये कार्ल लिनिअस यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले.
- वनस्पती सृष्टी Vegetabilia. व
- प्राणी सृष्टी Animalia
🎂 इ.स. 1866 साली हेकेल यांनी 3 सृष्टींची कल्पना केली.
- प्रोटिस्टा,
- वनस्पती व
- प्राणी.
🪈 इ.स. 1925 मध्ये चॅटन यांनी पुन्हा सजीवांचे दोनच गट केले -
- आदिकेंद्रकी व
- दृश्यकेंद्रकी.
📯 इ.स. 1938 मध्ये कोपलँड यांनी सजीवांना 4 सृष्टीमध्ये विभागले -
- मोनेरा,
- प्रोटिस्टा,
- वनस्पती व
- प्राणी
=====©=====
🌴 जैविक वर्गीकरण:- सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात.
⛴️ रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी सजीवांचे पाच गट तयार केले...
- मोनेरा
- प्रोटिस्टा
- कवके
- वनस्पती
- प्राणी
=====©=====
🎉 सजीवांच्या वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी कोणते निकष विचारात घेतले?
उत्तर
- पेशीची जटिलता (Complexity of cell structure) :
- आदिकेंद्रकी व
- दृश्यकेंद्रक
- एकपेशीय किंवा
- बहुपेशीय
- वनस्पती - स्वयंपोषी (प्रकाश संश्लेषण),
- कवके - परपोषी (मृतावशेषातून अन्नशोषण),
- प्राणी - परपोषी (भक्षण)
- उत्पादक वनस्पती,
- भक्षक - प्राणी,
- विघटक - कवके -
- आदिकेंद्रकी ते दृश्यकेंद्रकी,
- एकपेशीय ते बहुपेशीय
=====©=====
🪷 सृष्टी 1: मोनेरा
लक्षणे
- सृष्टी 1 मोनेरा मधील सर्व सजीव एकपेशी असतात.
- पोषण:- स्वयंपोषी किंवा परपोषी असतात.
- हे आदिकेंद्रकी असून पटलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात.
- उदा. सर्व प्रकारचे जिवाणू व निलहरित शैवाल.
=====©=====
🌼 सृष्टी 2: प्रोटिस्टा
लक्षणे:-
- प्रोटिस्टासृष्टीतील सर्व सजीव एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्र असते.
- प्रचलन:- प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असतात.
- स्वयंपोषी उदा. युग्लीना,
- व्हॉल्व्हाॅक्स पेशीत हरित लवके असतात.
- परपोषी उदा. अमिबा, पॅरामेशिअम, प्लास्मोडिअम.
=====©=====
सृष्टी 3: कवके
लक्षणे :
- कवक सृष्टीत परपोषी, असंश्लेषी व दृश्यकेंद्रकी सजीवांचा समावेश होतो.
- बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत. कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात.
- कवकांची पेशीभित्तिका 'कायटीन' या जटील शर्करेपासून बनलेली असते.
- काही कवके तंतुरूपी असून आतील पेशीद्रव्यात असंख्य केंद्रके असतात.
- उदा .
- कवक - किण्व (बेकर्स यीस्ट) बुरशी,
- ॲस्परजिलस, (मक्याच्या कणसावरील बुरशी),
- पेनिसिलिअम,
- भूछत्रे (मशरूम).
=====©=====
🔵. सजीवांच्या आकारासंदर्भात पुढील प्रमाणे लक्षात ठेवावे.
1 मीटर = 10^6 मायक्रोमीटर (μm)
1 मीटर = 10^9 नॅनोमीटर (nm)
=====©=====
🦠 जीवाणू (Bacteria):
- जिवाणूंचा आकार - 1 µm ते 10 µm इतका असतो.
- पृथ्वीवर सर्वप्रथम आदिकेंद्रकी तयार झालेल्या पेशी म्हणजे जीवाणू.
- आढळ:- जीवाणू पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळतात. एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती (Colonies) बनवतात.
- एक ग्रॅम मातीमध्ये सामान्यत: 4 कोटी जीवाणू पेशी असतात.
- जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशीभित्तिका फॉस्फोलिपिड्स ची असते.
- जीवाणूच्या पेशींमध्ये अणूचे केंद्र नसते.
- प्रजनन बहुधा द्विखंडीभवनाने (एका पेशीचे दोन भाग होऊन) होते.
- अनुकूल परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटांत संख्येने दुप्पट होऊ शकतात.
- उदा. रायझोबियम जीवाणू हवेतील नत्रस्थिरीकरण तसेच मातीतील नत्र विघटनाचे काम करतात.
=====©=====
🦟 आदिजीव (Protozoa):
- कारण:- पृथ्वीवर सर्वप्रथम हे दृश्यकेंद्रकी निर्माण झाल्यामुळे या प्राण्यांना आदिजीव म्हणतात.
- समावेश:- व्हिटाकर यांच्या आधुनिक पद्धतीच्या पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीप्रमाणे आदिजीव संघाचा समावेश प्राणिसृष्टीत न करता सृष्टी प्रोटिस्टा यामध्ये करण्यात आला आहे.
- आकार:- आदिजीवांचा आकार सुमारे 200 µm असतो.
- केंद्रक:- दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे आदिजीव हे एकपेशीय सजीव आहेत.
- प्रोटोझुआंच्या पेशीरचना, हालचालींचे अवयव, पोषणपद्धती यांत विविधता आढळते.
- प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते.
- आढळ:
- माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात,
- काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात.
- युग्लीना - स्वयंपोषी
- एन्टामिबा हिस्टोलिटिका मुळे आमांश होतो.
- प्लाज्मोडिअम व्हायवॅक्स मुळे मलेरिया (हिवताप) होतो.
- अमिबा, पॅरामेशिअम गढूळ पाण्यात आढळतात, स्वतंत्र जीवन जगतात.
=====©=====
🧘 कवके (Fungi) :
- बुरशीला शास्त्रीय भाषेत कवक म्हणतात. बुरशीच्या सुमारे एक लाख जाती ज्ञात आहेत.
- आकार:- कवकांचा आकार सुमारे 10 µm ते 100 µm इतका असतो.
- आढळ:- कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यांमध्ये कवके आढळतात.
- दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव. कवकांमध्ये पटल-आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशीअंगके असतात, मात्र त्यांमध्ये हरितलवके नसतात. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात.
- अन्न:- कवके ही मृतोपजीवी असून कार्बनी पदार्थांपासून अन्नशोषण करतात.
- प्रजनन:- कवकांचे प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते.
- उदा. यीस्ट, कॅन्डीडा, आळंबी (मशरूम/ अळिंबी प्रकारातील बुरशी खाण्यासाठी वापरली जाते.)
=====©=====
🌀 शैवाले (Algae) :
- जनक:- भारताचे शैवाल विज्ञान जनक हे मंदायम ओसुरी पार्थसारथी अयंगर होत.
- आकार:- शैवालांचा आकार सुमारे 10 µm ते 100 µm इतका असतो.
- जायंट ब्लॅडर केल्प ही सर्वात मोठी शैवाल प्रजाती आहे,
- पाण्यात वाढतात. मुळे, पाने इत्यादी रचना नसतात
- दृश्यकेंद्रकी, एकपेशीय, स्वयंपोषी सजीव.
- पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाशसंश्लेषण करतात. उदा. क्लोरेल्ला, क्लॅमिडोमोनास.
- शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत, तर इतर सर्व शैवाले बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात.
=====©=====
♍ विषाणू (Virus):
- आकार:- विषाणूंचा आकार सुमारे 10 nm ते 100 nm.
- विषाणूंना साामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव-निर्जिवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात.
- घडण:- विषाणू स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA (डीऑक्सीरायबो न्युक्लिक आम्ल) किंवा RNA (रायबो न्युक्लिक आम्ल) पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते.
- जीवन:- विषाणू वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात, त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात.
- संसर्ग:- प्राणी, वनस्पती तसेच जीवाणू (bacteria) यांच्यासह जवळपास सर्व सजीवांना विषाणू संसर्ग करू शकतात. कावीळ, पोलिओ, गालफुगी, एड्स, स्वाईन फ्लू, कांजण्या, कोरोना, गोवर इत्यादी.
▬▬▬۩۞۩▬▬▬
*सकाळ🌅 म्हणजे,नवीन क्षणांची सुरुवातजे घडुन गेले आहेते विसरुनयेणाऱ्या नवीन क्षणांचेस्वागत 🤗करणे आणिआपल्या आयुष्याला आणखी सुंदर🦋 बनवणे...!**आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा