मुख्य सामग्रीवर वगळा

रासायनिक अभिक्रिया भाग 1.1

 

रासायनिक अभिक्रिया भाग 1.1

~~•❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅•~~

What's App Group Join Now



रासायनिक अभिक्रिया आपणास यावी असे वाटत असेल तर यासाठी फार पूर्वतयारी करावी लागते.
 प्रथम आपणास 
मूलद्रव्य, 
मूलद्रव्यांच्या संज्ञा, 
मूलद्रव्यांचे अणुअंक,
 त्यांचे  मुलक (इयत्ता नववी, विज्ञान आणि तंत्रज्ञान पान नंबर 56.) या गोष्टीचा संपूर्ण अभ्यास हवा.
 मुलकांचा वापर करून रेणुसूत्र तयार करता आले पाहिजे. 
याचबरोबर रासायनिक अभिक्रियांचे प्रकार म्हणजेच 
  1. संयोग अभिक्रिया, 
  2. अपघटन अभिक्रिया,
  3.  विस्थापन अभिक्रिया, 
  4. दुहेरी विस्थापन अभिक्रिया, 
  5. उष्मादायी अभिक्रिया, 
  6. उष्माग्राही अभिक्रिया 
*⧋────⧋*

रासायनिक अभिक्रिया लवकर समजल्या पाहिजेत.
त्यासाठी काही नियम 
  1. अभिक्रिया कारके डाव्या बाजूस तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहावीत. 
  2. दोन किंवा दोन पेक्षा अधिक अभिक्रिया कारके व उत्पादित्तामध्ये + चिन्ह लिहावे. 
  3. अभिक्रिया कारकाकडून उत्पादितांकडे जाणारा बाण दर्शवावा.
  4. अभिक्रिया कारके व उत्पादित यांच्या भौतिक अवस्था लिहाव्यात. 
  5. अभिक्रियाकारके व उत्पादितांतील अणूंची संख्या ही समान असावी.
निव्वळ सरावाने हा भाग येतो त्यामुळे आपणास यात प्रभुत्व हवे असेल तर हात धुवून रासायनिक अभिक्रियेच्या मागे लागावे लागेल.
❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅

कोपर सल्फेटच्या जलीय द्रावणात जस्ताची भुकटी टाकली.

CuSO4 (aq) + Zn (S)  ------>   ZnSO4 (aq) + Cu (s)

   कोपर सल्फेटच्या निळसर जलीय द्रावणात जस्ताची भुकटी टाकली असतात रंगहीन झिंक सल्फेट तयार होते व तांबे विस्थापित होते.

~●●○○○○●●~


  • कॅल्शियम कार्बोनेट ला उष्णता दिली

                 CaCO3 (s)   -------->  CaO(s) + CO2 (g)

कॅल्शियम कार्बोनेट ला 1000 °C पर्यंत उष्णता दिली असता कॅल्शियम ऑक्साईड तयार होऊन कार्बन डाय-ऑक्साइड वायू मुक्त होतो.

~~•❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅•~~

  • वनस्पती तेलातून हायड्रोजन वायू प्रवाहित केला.

वनस्पती तेल  (l) + H2  (g) ------> वनस्पती तुप  (s)

वनस्पती तेलाची 60 °C तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते.

-~●●○○○○●●~

  • तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता 

 Cu(s) + 4 HNO3 (aq)  ------> Cu(NO3)2 (aq)  +  2 NO2 (g) + 2H2O(l)

तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता कॉपर नायट्रेट तयार होऊन  तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साइड वायू तयार होत

~~•❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅•~~

  • तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता

 3Cu(s) + 8HNO3 (aq)  ------>  3Cu(NO3)2 (aq)  + 2NO(g) +  4H2O (l)

तांब्याची विरल नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता कॉपर नायट्रेट तयार होऊन नायट्रिक ऑक्साइड वायूतयार होतो.

~●●○○○○●●~

  • जलीय सिल्वर नायट्रेटची जलीय सोडियम क्लोराइड बरोबर अभिक्रिया केली असता. 

AgNO3 (aq)+ NaCl(aq) -----> AgCl + NaNO3 (aq)

जलीय सिल्वर नायट्रेटची जलीय सोडियम क्लोराइड बरोबर अभिक्रिया केली असता सिल्वर क्लोराइड चा पांढऱ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो व जलीय सोडियम नायट्रेट तयार होते.

~~•❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅•~~

  • सोडियम हायड्रॉक्साइड ची सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता

2 NaOH + H2SO4 --à Na2SO 4 + 2 H2O

सोडियम हायड्रॉक्साइड ची सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता. 

सोडियम सल्फेट तयार होते.

~●●○○○○●●~

  • नायट्रोजन वायूची हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया केली असता.

N2 (g) + H2 (g ) --à NH3 (g)

नायट्रोजन वायूची हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया केली असता अमोनिया वायू तयार होतो.

~~•❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅•~~

  • सल्फर डाय ऑक्साईड वायूची हायड्रोजन सल्फाइड वायू बरोबर अभिक्रिया केली असता

SO+ 2H2S ---à 3S + 2H2O 

सल्फर डाय ऑक्साईड वायूची हायड्रोजन सल्फाइड वायू बरोबर अभिक्रिया केली असता पाणी व गंधक तयार होते.

~●●○○○○●●~

  • चांदीची हायड्रोक्लोरिक मला बरोबर अभिक्रिया केली असता

2Ag + 2HCl ----- > 2AgCl + H2

चांदीची हायड्रोक्लोरिक मला बरोबर अभिक्रिया केली असता सिल्वर क्लोराइड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.

~~•❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅•~~

  • अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराइड वायू यांच्या अभिक्रिया केली 

NH(g)+ HCl (g) ----- > NHCl(s).

अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराइड वायू यांच्या अभिक्रिया केली असता पांढऱ्या रंगाचा अमोनियम क्लोराइड हा क्षार तयार होतो. 

~●●○○○○●●~

  • चुनकळी म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांच्यात अभिक्रिया केले 

CaO + H2O -----> Ca(OH)2 + उष्णता

चुनकळी म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांच्यात अभिक्रिया केले असता कॅल्शियम हायड्रॉक्साइड व उष्णता तयार होते.

~~•❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅•~~

  •  मॅग्नेशियम धातूची फीत हवेत  जाळल्यास  

2Mg + O ---- > 2 MgO

मॅग्नेशियम धातूची फीत हवेत  जाळल्यास  मॅग्नेशियम धातू हवेत जळून  मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते.

~●●○○○○●●~

  •  साखरेला उष्णता दिली असता 

C12 H22O11   ------ > 12 C + 11H 2 O

साखर                        कार्बन 

 साखरेला उष्णता दिली असता करपलेला काळा कार्बन तयार होतो व पाणी निघून जाते.

•●┈┉꧁●꧂┉┈●•

  • हायड्रोजन पेरॉक्साइड हवेत उघडे ठेवले 

2H2O2 (l) ------ >  2H2O(l) + O2

 हायड्रोजन पेरॉक्साइडचे मंद गतीने आपोआप पाणी व ऑक्सिजन यांच्यामध्ये विघटन होते.

~●●○○○○●●~

  • पाण्याचे विदुत अपघटन केले 

2H2O(l)  ----- > 2H2 + O2 

पाण्याचे विदुत अपघटन केले असता हैड्रोजन व ऑक्सिजन वायू मुक्त होतात .

~~•❅•●┈┉꧁●꧂┉┈●•❅•~~


रासायनिक अभिक्रिया पुढील भाग पाहण्यासाठी खालील 👇 लिंकला 🖇️ स्पर्श करा 

रासायनिक अभिक्रिया भाग 1.2 🎷



~*࿇ ≛⃝🌎⃝ ⃝ माहिती─ ⃝ ⃝. विज्ञानाची 🦚 ≛⃝ ࿇*~










 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷

 Top 10,10 वी विज्ञान 1, विद्युतधारेचे परिणाम...🎷 ▬▬▬۩۞۩▬▬▬ विज्ञान विषयाचा दररोज थोडा थोडा अभ्यास करण्यासाठी खालील "माहिती विज्ञानाची" या What's App समूहात सामील व्हावे.🙏 What's App Group Join Now ▬▬▬۩۞۩▬▬▬ Interesting Coincidence:🎇 Today is ...........               *Week End*                *Month End* Tomorrow will be. *Year End* *🏵️*  *🏵️* *🏵️* या पाठावर आधारित MCQ परीक्षा👇 *╭✺༺☬༒☬༻✺╮* * पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर:- a. सोने Au, चांदी Ag, तांबे Cu,  अल्युमिनियम Al या धातूंची रोधकता खूप कमी असते व  धातूंच्या आणूच्या शेवटच्या कक्षेत  मुक्त इलेक्ट्रॉन असतात त्यामुळे धातूंना विद्युत सुवाहक म्हणतात. b. रबर, काच , लाकूड व प्लॅस्टिक पदार्थाची रोधकता खूप जास्त असते व त्यांच्याकडे मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून या पदार्थांना विद्युत दुर्वाहक म्हणतात. ━━━━✧❂✧━━━━ * विद्युतशक्ती म्हणजे काय? एकक कालावधीत घडून ...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...