रासायनिक अभिक्रिया भाग 1.2
What's App Group
Join Now
रासायनिक समीकरण संतुलित करण्याचा प्रयत्न करा. काही रासायनिक समीकरणे संतुलित करण्यात एक वेगळाच आनंद येतो.
- पोटॅशिअम क्लोरेट (KClO3 ) तापवले असता .
2KClO3 -----
> 2KCl + 3O2 .
पोटॅशिअम क्लोरेट तापवले असता त्याचे अपघटन मंदगतीने होऊन पोटॅशियम क्लोराइड तयार होते व या क्रियेत ऑक्सिजन वायू बाहेर पडतो.
●┈┉꧁●꧂┉┈●
- ऑक्सिडीकरण अभिक्रिया
मॅग्नेशियमची फी हवेत जाळली असता
2Mg + O2 ------ > 2MgO
मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होते.
~~•❅••❅•~~
- कार्बन हवेत जाळला असतात
C + O2 -----> CO2
कार्बन हवेत जाळला असतात कार्बनची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू मुक्त होतो.
●┈┉꧁●꧂┉┈●
- मॅग्नेशियम हायड्रॉईडला उष्णता दिली असता.
MgH2 ----- > Mg + H2
मॅग्नेशियम हायड्रॉईडला उष्णता दिली असता मूलद्रव्यरूपात मॅग्नेशियम तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
- इथेन ला योग्य उष्णता दिली .
CH 3 -CH3 ----- > CH 2 = CH2 + H2
इथेन ला योग्य उच्च तापमान आणि प्लॅटिनम उत्तरेरकाच्या मदतीने उष्णता दिली असता इथेन चे रूपांतर ईथिन मध्ये होते व हायड्रोजन वायू बाहेर पडतो .
●┈┉꧁●꧂┉┈●
- एथील अल्कोहोलची आम्लयुक्त पोटॅशियम डायकोमेट बरोबर अभिक्रिया केली
CH3 - CH 2 – OH ----- > CH3 - COOH + H2O
एथील अल्कोहोलची आम्लयुक्त पोटॅशियम डायकोमेट बरोबर अभिक्रिया केली असता अॅसिटिक ऍसिड तयार होते.●▬▬๑۩ ۩๑▬▬●
- पोटॅशियम डायक्रोमेट ची सल्फ्युरिक आम्ल बरोबर अभिक्रिया केली असता
K2Cr2O7 + 4H2SO4 ----- > K2SO4 + Cr2 (SO4)3 +4H2O + 3 [O]
पोटॅशियम डायक्रोमेट ची सल्फ्युरिक आम्ल बरोबर अभिक्रिया केली असता पोटॅशियम सल्फेट व क्रोमियम सल्फेट तयार होऊन नवजात ऑक्सिजन बाहेर पडतो.
●┈┉꧁●꧂┉┈●
- पोटॅशियम परमॅग्नेट ची सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता
2KMnO 4 + 3H 2 SO 4 ----- > K2SO 4 + 2MnSO 4 + 3H2O + 5 [O]
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
- आम्लयुक्त पोटॅशियम परमॅग्नेट चे फेरस सल्फेट द्वारे ऑक्सिडेशन कसे घडते.
2KMnO4 + 10FeSO4 + 8H2SO4 ----- > K2SO4 +2MnSO4 +
5Fe2(SO4 )3 + 8H2O.
आम्लयुक्त पोटॅशियम परमॅग्नेट चे फेरस सल्फेट द्वारे ऑक्सिडेशन घडून पोटॅशियम सल्फेट, मॅग्नीज सल्फेट आणि फेरिक सल्फेट तयार होते.
- कॉपर ऑक्साइडवरून हायड्रोजन वायू प्रवाहित केला
CuO + H2 ------- > Cu
+ H2O
जेव्हा काळ्या कॉपर ऑक्साइडवरून हायड्रोजन वायू प्रवाहित केला जातो तेव्हा तांबूस रंगाचे तांबे मिळते.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
- हायड्रोजन सल्फाईड व सल्फर डाय ऑक्साईड या वायूंची रासायनिक अभिक्रिया केली
2H2S + SO2 ------- > 3S + 2H2O
हायड्रोजन सल्फाईड व सल्फर डाय ऑक्साईड या वायूंची रासायनिक अभिक्रिया केली असता गंधक सुटे होते.
●┈┉꧁●꧂┉┈●
- मॅग्नीज डाय ऑक्साईड ची हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर अभिक्रिया केली असता.
MnO2 + 4 HCl ----- > MnCl2 + 2H2O + Cl2
मॅग्नीज डाय ऑक्साईड ची हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर अभिक्रिया केली असता मॅग्नीज क्लोराइड तयार होऊन क्लोरीन वायू बाहेर पडतो.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
- लोखंड हवेत उघडे ठेवले असता
किंवा
- लोखंडाचे क्षरण कसे होते?
किंवा
- लोखंड कसे गंजते?
2Fe 3+ (aq) + 4H2O(l) ----- > Fe2O3 .H2O(s) + 6H+(aq)
लोखंड हवेत उघडे ठेवले असता लोखंडावर वातावरणातील विविध घटकामुळे लोखंडाचे ऑक्सिडीकरण होते लोखंडावर तांबूस रंगाचा जालीय आयर्न ऑक्साइड चा थर जमा होतो यास लोखंडाचे क्षरण असे म्हणतात.
●┈┉꧁●꧂┉┈●
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
कामवाली बाई : मालकीणबाई, पगार वाढवून द्या.
मालकीण : नक्की देते, पण यात दोन पर्याय आहेत.
जुन्या पर्यायाप्रमाणे पगार घेतलास तर
पगार, बोनस आणि सणावाराला भेट मिळेल.
नव्या पर्यायाप्रमाणे घेतलास तर
पगार वाढवून मिळेल पण....
बोनस, भेटवस्तू काहीही मिळणार नाही.
बोल, कुठला पर्याय निवडतेस?
कामवाली बाई : मी माझ्या सी ए ला विचारून सांगते.😁😎🎷
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा