प्रश्न पहिला, विज्ञान भाग- एक🎷
━•───────────━•
चला तर तयार व्हा🎯 इयत्ता दहावी संपूर्ण भाग- एक, प्रश्न पहिला, तयारी किती आहे पाहण्यासाठी 🙏
What's App Group
Join Now
🪞 दोन राजवायूंची नावे सांगा?
उत्तर:-
- हेलियम He
- निऑन Ne
- ऑर्गन Ar
- झेनॉन Xe
🌟 निकटदृष्टीचा या दृष्टीदोषात नेत्र गोलाचा आकार कसा होतो?
उत्तर:- निकटदृष्टीचा या दृष्टीदोषात नेत्र गोलाचा आकार उभट होतो.
🎸 विद्युतधारा मोजण्याचे एकक कोणते?
उत्तर:- अॅम्पिअर.
🍫 पितळ या मिश्रणातील धातूंची नावे कोणती?
उत्तर:- पितळ या संमिश्रत तांबे आणि जस्त हे दोन धातू असतात.
🎯 हवेचा अपवर्तनांक किती?
उत्तर:-हवेचा अपवर्तनांक 1.0003.
☘️ भिंगाची शक्ती मोजण्याचे सूत्र कोणते?
उत्तर:-
P = 1 / f
🌞 निस्तापन म्हणजे काय?
उत्तर:- कार्बोनेट धातुके मर्यादित हवेत तीव्रपणे तापवले असता त्यास निस्तापन असे म्हणतात.
🕛 तांबड्या प्रकाश किरणांची तरंग लांबी किती?
उत्तर:- तांबड्या प्रकाश किरणांची तरंग लांबी 700 nm
🖌️ दृष्टी पटलावरील शंक्वाकार पेशींचे कार्य कोणते?
उत्तर:- शंक्वाकार पेशीमुळे प्रतिमेचा रंग समजण्यास मदत होते.
🥁 झिंक ब्लेंड चे रेणुसूत्र काय?
उत्तर:- झिंक ब्लेंड चे रेणुसूत्र ZnS
🚨 कॅसिटराइट या खनिजापासून कोणते मूलद्रव्य मिळते?
उत्तर:- कथिल (कॅसिटराइट SnO)
💐 ब्रांॅझ हे संमिश्र कोणत्या दोन धातूपासून तयार करतात?
उत्तर:- ब्रांॅझ हे संमिश्र तांबे आणि कथिल या दोन धातूपासून मिळतात.
🏆 जस्ताचा लोखंडावर पातळ थर देण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
उत्तर:- गॅल्व्हनायझिंग.
🎃 अल्किन मध्ये कार्बन कार्बन कोणता बंध असतो?
उत्तर:- अल्किन मध्ये कार्बन कार्बन दुहेरी बंध असतो C=C.
🌛 भाजणे म्हणजे काय?
उत्तर:- सल्फाईड धातुके अतिरिक्त हवेमध्ये तीव्रपणे तापवल्यास या क्रियेस भाजणे असे म्हणतात.
🎊 अॅरोमॅटीक हायड्रोकार्बन चे एक उदाहरण द्या.
उत्तर:- बेंझिन (C 6 H 6).
🎉 G चे SI एकक कोणते?
उत्तर:- G चे SI एकक N.m^2/Kg^2.
🎂 पृथ्वीच्या केंद्रापाशी गुरुत्वीय त्वरणाचे मूल्य किती असते?
उत्तर:- शून्य.
👍 वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप कोणते?
उत्तर:- वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप म्हणजे वस्तुमान.
😎 वस्तूचा मुक्तिवेग हा वस्तूच्या कोणत्या गोष्टीवर अवलंबून नसतो?
उत्तर:- वस्तूचा मुक्तिवेग हा वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो.
💥 मिथेन हे संपृक्त हायड्रोकार्बन का आहे?
उत्तर:- ज्या हायड्रोकार्बनचे चारही बंध एकेरी सहसंयुज बंधने संतृप्त असतात त्यास संपृक्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. मिथेनमध्ये चारही बंध हे एकेरी आहेत.
🥸 क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण काय?
उत्तर:- क्लोरीनचे इलेक्ट्रॉन संरूपण 2,8,7 आहे.
🏒 कोणत्या अणुअंकानंतरची सर्व मूलद्रव्य ही मानवनिर्मित आहेत?
उत्तर:- 92 अणुअंकानंतरची सर्व मूलद्रव्य ही मानवनिर्मित आहेत.
☄️ गंजाचे रासायनिक सूत्र कोणते?
उत्तर:- Fe2O3.xH2O गंजाचे रासायनिक सूत्र आहे.
©️ प्रत्यावर्ती विद्युतधारेची वारंवारता किती?
उत्तर:- 50 Hz.
🏏 विद्युत चुंबकत्वाचा शोध कोणी लावला?
उत्तर:- विद्युत चुंबकत्वाचा शोध ओरस्टेडने लावला.
🤡 मिथेन, सोडियम क्लोराइड, ब्युटेन, बेंझिन वेगळा शब्द ओळखा
उत्तर:- सोडियम क्लोराइड (कारण इतर सर्व हायड्रोकार्बन आहेत.)
🌌 दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता किती टक्के असते?
उत्तर:- दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100 % असते.
🦅 1 कॅलरी = ? ज्यूल.
उत्तर:- 1 कॅलरी = 4.18 ज्यूल.
📜 काचेमध्ये जांभळ्या प्रकाशाची चाल ही तांबड्या प्रकाशाच्या चालीच्या तुलनेत कशी असते?
उत्तर:- काचेमध्ये जांभळ्या प्रकाशाची चाल तांबड्या प्रकाशाच्या चालीपेक्षा कमी असते.
(कारण जांभळ्या प्रकाशाची तरंगलांबी तांबड्या प्रकाशाच्या तुलनेत कमी असते. )
🥊 वेगवेगळ्या माध्यमांचा प्रकाशाच्या वेगावर काय परिणाम होतो?
उत्तर:- वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो.
✒️ जर आपाती किरण हा मुख्य अक्षाला समांतर असेल, तर अपवर्तित किरण कसा जातो?
उत्तर:- अपवर्तित किरण हा मुख्य नाभीतून जातो.
🏹 भिंगाची शक्ती 2 D असल्यास त्याचे नाभीय अंतर किती?
उत्तर:- नाभीय अंतर- 0.5 m.
🛼 निकटदृष्टीता या दोषाचे निराकरण करण्यासाठी कोणता भिंग वापरतात?
उत्तर:- अंतर्वक्र भिंग.
🌚 अशुद्ध धातूपासून शुद्ध धातू मिळवण्यासाठी कोणती पद्धत वापरतात?
उत्तर:- विद्युत अपघटन.
🙈 दूरदृष्टीता, वृद्धदृष्टीता, वर्णपटदर्शक, निकटदृष्टीता वेगळा शब्द ओळखा.
उत्तर:- वर्णपटदर्शक (हे उपकरण आहे इतर मानवी दृष्टीदोष आहेत.)
🍶 आम्लराज म्हणजे काय ?
संहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि संहत नायट्रिक आम्लाचे मिश्रण 3:1 या प्रमाणात घेऊन आम्लराज / ॲक्वारेजिआ हे मिश्रण तयार केले जाते.
🌝 उपग्रहाची उंची व वेग यातील सहसंबंध काय?
उत्तर:- उपग्रहाची उंची वाढवल्यास त्याचा वेग कमी होतो.
बहुत कमियाँ
निकालते है हम
दूसरों में अक्सर,
आओ एक मुलाक़ात ज़रा
आईने🪞 से भी कर ले🎷.
प्रश्न 1 चा जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा