प्र. 1 चे बजेट 🎷
━•───────────━•
अल्प सुरुवात बजेटने करू. नंतर विज्ञान भाग एक मधील प्रश्न पहिला 'अ' चा अभ्यास पाहू.
मुख्य उद्देश:- विज्ञान भाग एक ची तयारी समजणे.
तयारी कमी वाटत असेल तर योग्य प्रमाणात झोप घेऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. संतुलित, ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे योग्य प्रमाणात आहार घ्यावा म्हणजे आळस येणार नाही.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
What's App Group
Join Now
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
वित्तमंत्री:- वर्ष 2025-26 साठी चे बजेट केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केले.
भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी तेलुगु कवी आणि नाटककार गुरजादा वेंकट अप्पाराव यांच्या ओळीने केली" राष्ट्र केवळ मातीने नसते, तर राष्ट्र त्या देशातील लोकांमुळे असते.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●उद्देश:- सरकारचा मूळ उद्देश लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात सरकारने कृषी, एमएसएमई(सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग), गुंतवणूक आणि निर्यात ही विकासाची चार इंजिने ठेवले.
औषध:- कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांनी त्रस्त लोकांना दिलासा मिळावा यासाठी 36 औषधांवरील कर हटवण्याची मोठी घोषणा केली.
Tax:- वेतन प्राप्त कर्मचाऱ्यांना पुढच्या वर्षीपासून 12 लाख रुपये पर्यंत उत्पन्नावर कोणतेही कर/ Tax लागणार नाही ही आनंदाची घोषणा केली.
माखना:- सरकारने बिहारमध्ये माखना पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी माखाना विकास मंडळ🎯 स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●चला वळूया विज्ञान भाग एक प्रश्न पहिला 🎷
@ पृथ्वीवरील 720 न्यूटन वजनाच्या वस्तूचे, चंद्रावरील वजन किती असेल?
उत्तर:- 120 न्यूटन
(पृथ्वीच्या तुलनेत चंद्राचे गुरुत्वाकर्षण सहाव्या भाग आहे. म्हणून 720 न्यूटनला सहा ने भाग दिल्यास 120 न्यूटन उत्तर येते.)
@ अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे?
उत्तर:- एक
(कारण अल्प धातूंचा समावेश गण एक मध्ये होतो.)
@ इका बोरॉन या मूलद्रव्याला मेंडेलीव्हच्या आवर्त सारणीत नंतर काय संबोधण्यात आले?
उत्तर:- स्कॅनडियम.
( इका बोरॉन, इका एल्युमिनियम, इका सिलिकॉन या मूलद्रव्यांना क्रमशः स्कॅनडियम, गॅलियम, जर्मनियम असे संबोधण्यात आले.)
@ कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य कोणते? किंवा
(द्रवरूपातील अधातू कोणता?)
उत्तर:- ब्रोमीन Br.
(सामान्य तापमानाला हॅलोजन गणातील फ्यूओरीन F, क्लोरीन Cl हे वायुरूपात, ब्रोमीन द्रवरूपात तर आयोडीन I स्थायुरूपात असते.)
@ रासायनिक अभिक्रियांच्या मध्यभागात बाणावर ∆ चिन्ह संकेत काय दर्शवतो.
उत्तर:- उष्मा (उष्णता)
@ लघु परिपथामध्ये परिपथातील एकूण विद्युतधारेत काय बदल होतो?
उत्तर:- विद्युत धारा वाढते. (कारण रोध कमी होतो)
@ पाण्याचे तापमान किती अंश सेल्सिअस पेक्षा कमी झाल्यास आकारमान वाढते?
उत्तर:- 4° C.
(कारण चार अंश सेल्सिअस नंतर पाणी आकुंचन पावणे ऐवजी प्रसरण पावते.)
@ पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी कोणते उपकरण उपयोगात येते?
उत्तर:- होपचे उपकरण.
@ कथलीकरण म्हणजे काय?
*"इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे,*
*तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दु:ख दडलेले आहे,*
*या सत्याची खऱ्या अर्थाने खरी जाणीव झाल्याशिवाय*
*मानवी जीवनात खरी क्रांती होणे शक्य नाही.*
🙏परीक्षेची नेमकी तयारी कशी करावी यासाठी👇
🏹 अभ्यास प्रश्न पहिला, विज्ञान भाग- एक🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा