तयारी पेपरची 📝
चांगले गुण मिळवण्यासाठी...🎷
What's App Group
Join Now
चांगले गुण मिळवण्यासाठी सुरुवात ही लहानपणापासूनच झाली पाहिजे.
अभ्यास हा दररोज करण्यासाठीचा असतो.
शिक्षण हे सातत्यपूर्ण असते.
प्रत्येक मुलाला वाटत असते की आपणास बोर्ड परीक्षेत छान गुण मिळावेत. बरेच जण त्यासाठी चांगले प्रयत्नही करतात.
जो धडा वर्गात शिकवला जाणार आहे तो आपण जर घरून वाचून गेलोत तर....🛼
दररोजचा अभ्यास दररोज केला तर....🏹
संपूर्ण धडा व्यवस्थित वाचन करून पुस्तकावर योग्य ठिकाणी चिन्ह संकेत केले तर....🥊
गाईडचा वापर तो धडा व्यवस्थित, सखोल समजून घेण्यासाठी म्हणून केला तर...🏒
नुसते तोंडी वाचन करण्याऐवजी लिहून अभ्यास केला तर...✍️
जे आपणास समजले नाही ते इतरांना विचारले तर....🎷
स्वतःचे नोट्स स्वतः काढले तर....🏏
दररोज मनाला व शरीराला योग्य आराम मिळावा म्हणून एखादा योग्य छंद अर्धा तास जोपासला तर....🏸
वरील कृतींची अंमलबजावणी केली तर...⚽ सांगा आपण यशाच्या 🎯 जवळ जाणार की नाही?
प्रथमतः यासाठी डिसेंबर एन्ड पर्यंत त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम हा अभ्यासून झाला पाहिजे.
इयत्ता दहावीचा निकाल म्हणजे पहिली ते दहावीचा निकाल समजावा. कारण बऱ्याच मुलांना नववीपर्यंत छान गुण असतात.... त्याचे कारण ज्याचे त्यांनी शोधावे.
आपल्या नियोजनानुसार काही कृतीपत्रिकेवर आधारित प्रश्न पत्रिका बोर्ड पॅटर्न प्रमाणे सोडवावेत.
नवीन प्रश्नपत्रिका संच उपलब्ध असेल तर तो पण सोडवावा. उदाहरणार्थ नवनीतचा सर्व विषयांसाठी प्रश्नपत्रिकेचा संच उपलब्ध असतो.
काही घाई गडबड केले असता चुका होतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मन एकाग्र ठेवणे, शांत राहणे, प्रश्नपत्रिकेवर लक्ष केंद्रित करणे या गोष्टी आत्मसात करायला हव्यात.
काहीजण प्रश्नपत्रिका संपूर्ण वाचतात, तर काहीजण पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करतात. आपल्या कॉन्फिडन्स प्रमाणे ज्याने त्याने ठरवावे आपला कोणता मार्ग.
🪞 उत्तर पत्रिकेचे पहिले पान हे त्या विद्यार्थ्यांचा आरसा असतो ज्यास आपण First Impression असे म्हणू. पहिल्या पानापासूनच टापटीपपणा असावा, खाडाखोड नसावी, व्यवस्थितपणे आखून उत्तर लिहिलेले असावे.
❓ बरेच विद्यार्थी प्रश्न क्रमांक व उपप्रश्न क्रमांक लिहीत नाहीत किंवा दुसऱ्या व तिसऱ्या प्रश्नांचे क्रमांक एकमेकात असतात. म्हणून जी मार्जिन आपण आखलेली आहे त्यामध्ये प्रश्न क्रमांक व उपप्रश्न क्रमांक व्यवस्थित लिहावेत. आपल्या हाताला ही सवय लावूनच घ्यावी याशिवाय उत्तराची सुरुवातच करू नये.
नवीन प्रश्न नवीन पानावरच लिहावा. पहिल्या प्रश्नाचे उत्तर झाल्यावर बंद साठी एखादी खूण करावी. जसे
-------×------
😐 एखाद्या प्रश्नातील एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर आले नाही तर त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी जागा सोडून द्यावी.
क्रमशः प्रश्न सोडवावेत.
दहावी बोर्डाची उत्तर पत्रिका ही 20 पानांची असते.
मी विज्ञान शिक्षक आहे प्रथम विज्ञानासाठी बोलू. उत्तर पत्रिकेत कोणत्या प्रश्नाचे उत्तर कोठे असावे यासाठी खालील नमुना,
प्र. 1 अ. ---- पहिल्या पानावर.
प्र. 1 ब. ---- दुसऱ्या पानावर.
प्र. 2 अ. ----- (कोणतेही दोन सोडवावेत.)
प्र. 2 अ. 1. तिसऱ्या पानावर
प्र. 2 अ. 2. चौथ्या पानावर
प्र. 2 अ. 3. पाचव्या पानावर
प्र. 2 ब. ----- (कोणतेही तीन सोडवावेत.)
प्र. 2 ब. 1. सहाव्या पानावर
प्र. 2 ब. 2. सातव्या पानावर
प्र. 2 ब. 4. आठव्या पानावर
प्र. 3 रा. (कोणतेही पाच सोडवावेत.)
प्र. 3 रा. 1. नवव्या पानावर
प्र. 3 रा. 2. दहाव्या पानावर
प्र. 3 रा. 3. अकराव्या पानावर
प्र. 3 रा. 4. बाराव्या पानावर
प्र. 3 रा. 6. तेराव्या पानावर
प्र. 3 रा. 8. 14 व्या पानावर
प्र. 4 था. (कोणताही एक प्रश्न सोडवावा.)
प्र. 4 था 1. 15 व्या पानावर
प्र. 4 था 2. 16 व्या पानावर
उत्तर पत्रिकेचे चार पाने शिल्लक आहेत. प्रश्न दुसरा ब मध्ये दोन प्रश्न सोडवणे बाकी आहेत समजा यासाठी दोन पाने दिली. तरी दोन पाने शिल्लक आहेत. प्रश्न तिसऱ्या मध्ये सहा प्रश्न सोडवलेत, ज्यात केवळ पाचच सोडवायचे आहेत. उरलेले दोन प्रश्न सोडवल्यास दोन पाने आहेत..
📜 विज्ञान भाग एक व विज्ञान भाग दोन संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी (with all questions) विद्यार्थ्यांना पुरेल एवढी उत्तर पत्रिका बोर्ड देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुटसुटीत, नियोजनबद्ध उत्तर लिहावे. यानंतरही पुरवणी गरजेची असल्यास विद्यार्थ्यांना पुरवणी मिळते.
आकृती:-आकृतीचा प्रश्न क्रमांक लिहावा. नामनिर्देशित सोबत आकृती काढावी. नामनिर्देशनासाठी पट्टीने रेषा माराव्यात. आकृतीला चौकट करावी.
📝 लिखाणाचा सराव.
लिखाणाचा पण सराव करणे गरजेचे असते. कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नसते. उत्तर लिहिताना अंडरलाईन _____ करणे,
1.
2.
मुद्देसूद उत्तर लिहिणे या गोष्टीचा सराव करावा, म्हणजे उत्तर तपासणीचे काम सहज सोपे होते. कोणतीही गोष्ट शरीराला अंगवळणी पडल्याशिवाय सहज होत नसते. त्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यासावर भर द्यावा. दहावी व बारावी बोर्ड परीक्षा ही लेखी स्वरूपात असल्यामुळे वेळेच्या आत उत्तरे पूर्ण करावेत.
🦅जादाची म्हणजे एक्स्ट्रा ची प्रश्न सोडवण्या अगोदर कंपल्सरी प्रश्न सोडवले आहेत का? याकडे लक्ष द्यावे.
विद्यार्थ्यांनी प्रश्न समजून घेऊनच उत्तर लिहावे. प्रश्नाला अनुसरून उत्तर लिहिले तर पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्यामुळे प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयासाठीची समजून घेणे गरजेचे असते.
वेळेचे नियोजन 🕒
आपल्याला कोणता प्रश्न प्रकार सोपा जातो व कोणता प्रश्न प्रकार सोडवण्यास थोडेसे कष्ट पडतात याप्रमाणे वेळेचे नियोजन करावे.
काही लक्षात ठेवण्या योग्य..
उद्या ज्या विषयाचा पेपर आहे त्यासाठी व परीक्षेसाठी जे साहित्य 📋,✏️,✒️,🍶,🍫, लागणार आहे ते आदल्या दिवशीच व्यवस्थित भरून ठेवावे.
परीक्षा केंद्रावर वेळेच्या आधी पोहोचा.
तयारी अशी असावी की चिंता, टेन्शन, अती विचार, नकारात्मकता आपल्या जवळपासही येणार नाहीत.🎷
*ठरवलं आणि लगेच झालं
असं कधीच होत नाही,
थोडा संयम ठेवा,
हाल होतील
पण
हार* *होणार नाही
कारण
संघर्ष रडवतो
पण
आयुष्य घडवतो.,,!!!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा