━•*───®───*━
इयत्ता 10 वी भाग- 1 शास्त्रीय कारणे.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
प्रत्येक प्रश्नाचे एक वैशिष्ट्य असते. त्या प्रश्नाचे वैशिष्ट्ये समजून घेऊन उत्तर लिहिले असता गुण (Marks)वजा होत नाही.
किती गुणांचा प्रश्न आहे त्याप्रमाणे आपले उत्तर असावे. शास्त्रीय कारणे द्या हा प्रश्न परीक्षेत दोन मार्काला विचारला जाणारा आहे. वर्ग दहावीचा विचार केल्यास प्रश्न दुसरा अ. चार गुणासाठी हा प्रश्न असतो. या प्रश्न प्रकारात एक उपप्रश्न रसायनशास्त्रावर तर एक उपप्रश्न भौतिकशास्त्रावर आधारित असतो. तीन पैकी दोन शास्त्रीय कारणे सोडवायचे असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना दोन पैकी एक गुण मिळतो. कारण उत्तर मुद्देसूद नसते किंवा दोन महत्त्वाच्या मुद्द्यांचे स्पष्टीकरण त्यात नसते.
शास्त्रीय कारण द्या आले म्हणजे त्या प्रश्नापुरता आपला विज्ञानाचा अभ्यास बऱ्यापैकी झाला असे म्हणणे म्हणता येईल.आज आपण इयत्ता दहावी भाग 1 चे काही शास्त्रीय कारणे पाहू
* आपल्याला सूर्य क्षितिजावर येण्यापूर्वीच दिसतो.
किंवा
सूर्यास्त झाल्यानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो.
( अपवर्तन, वातावरण)
उत्तर:- 1. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे वरील क्रिया घडते.
2. सूर्यकिरण हे अवकाशातून वातावरणात प्रवेश करताना मध्यम बदलामुळे ( निर्वात व हवा) स्तंभिकेकडे झुकतात म्हणजेच त्यांचे अपवर्तन होते. सूर्याकडून आलेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यात गेल्यावर सूर्य आपणास दिसतो.
3. अपवर्तनामुळे जरी प्रत्यक्ष सूर्य क्षितिजाखाली असला तरीही सूर्य क्षितिजावर असल्याचा भास होतो म्हणून आपणास सूर्योदयापूर्वी काही काळ सूर्य पूर्व क्षितिजावर दिसतो, त्याचप्रमाणे सूर्यास्तानंतरही काही काळ सूर्य पश्चिम क्षितिजावर दिसतो.
━•*───®───*━
2. तारे लुकलुकतात पण ग्रह आपणास लुकलुकताना दिसत नाहीत.
( बिंदू स्त्रोत , वातावरण, अपवर्तन, आभासी स्थिती )
उत्तर:-
A. 1.आपल्यापासून तारे अत्यंत दूर अंतरावर (प्रकाश वर्ष) असल्यामुळे ते बिंदू स्त्रोतासारखे असतात.
2. वातावरणीय बदल यात हवेची घनता, हवेचे तापमान, हवेची होणारी सतत हालचाल यामुळे वातावरण स्थिर नसते. याचाच परिणाम त्या भागातील हवेचा अपवर्तनांक सतत बदलत असतो.
3.वरील सर्व गोष्टीचा एकत्र परिणाम होऊन ताऱ्यांची आभासी स्थिती व प्रखरता यात सतत बदल होत असतो. म्हणून आपणास तारे लुकलुकताना दिसतात.
B.1.ग्रह हे बिंदू स्त्रोता ऐवजी बिंदू स्त्रोतांचा समूह ठरतो, ग्रह ताऱ्यांच्या तुलनेत आपणास बरेच जवळ असतात.
2. ग्रहांची सरासरी स्थिती व प्रखरता ही कायम राहत असल्यामुळे ताऱ्या प्रमाणे ग्रह लुकलुकत नाहीत. वातावरणीय बदलाचा एवढा जास्त परिणाम ग्रहांच्या स्थितीवर होत नाही.
━•*───®───*━
* पाण्यात अर्धवट बुडलेली पेन्सिल पाण्याच्या पृष्ठभागाशी वाकलेली दिसते.
( माध्यम बदल, अपवर्तन )
उत्तर:- 1. घन माध्यमातून विरल माध्यमात प्रकाश किरण प्रवेश करताना ते स्तंभिकेपासून दूर जातात.
2. पाण्यात तिरप्या बुडालेल्या पेन्सिलच्या पाण्यातून भागाकडून येणाऱ्या प्रकाश किरणांचे अपवर्तन झाल्यामुळे ते प्रकाश किरण सरळ रेषेत न दिसता मार्ग बदलामुळे पाण्यात अर्धवट बुडलेली पेन्सिल पाण्याच्या पृष्ठभागाशी वाकलेली दिसते.
* धातूच्या भांड्यात ठेवलेले नाणे कडेने पाहिले असता दिसत नाही परंतु त्या भांड्यात पाणी ओतताच ते नाणे दिसू लागते.
(अडथळा , अपवर्तन )
उत्तर :- 1.वस्तू कडून आलेले प्रकाश किरण जोपर्यंत डोळ्यात शिरत नाही तोपर्यंत ती वस्तू डोळ्यांना दिसत नाही.
2. धातूच्या रिकाम्या भांड्यात नान्याकडून आलेले प्रकाश किरण भांड्याच्या कडेकडून अडवली गेल्याने नाणे दिसत नाही.
3. परंतु भांड्यात पाणी ओतल्यावर पाणी या घन माध्यमातून हवा या विरल माध्यमातून प्रकाश किरण येताना स्तंभिकेपासून दूर वळतात. प्रकाशाच्या अपवर्तनामुळे भांड्यात पाणी ओतताच आपणास नाणे दिसते.
━•*───®───*━
* घड्याळ दुरुस्तीमध्ये साधा सूक्ष्मदर्शक वापरतात.
( तत्व , प्रतिमेचे स्वरूप )
उत्तर:- 1. तत्व:- बहिर्वक्र भिंगाच्या नाभीय अंतराच्या आत पदार्थ ठेवला असता त्या पदार्थाची प्रतिमा ही सुलटी, त्याच बाजूस व विशालीत मिळते.
2.घड्याळाचे सूक्ष्म काटे, चक्रे व संस्था सूस्पष्ट पाहण्यासाठी घड्याळजी घड्याळ बहिर्वक्र भिंगाच्या नाभी अंतरात ठेवून त्याची योग्य ती प्रतिमा डोळ्यावर ताण न पडता मिळवतो.
━•*───®───*━
* जळती उदबत्ती वेगाने वर्तुळाकार फिरवल्यास लाल रंगाचे प्रकाशवलय दिसते.
(संवेदना, दृष्टीसातत्य कालावधी)
उत्तर:- 1. एखादी वस्तू डोळ्यासमोर धरल्यावर त्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर काही सेकंद टिकते.
2. दृष्टी सातत्याच्या तत्त्वानुसार वेगाने वर्तुळाकार उदबत्ती फिरवल्यास, पूर्वीच्या प्रतिमेची संवेदना व नवीन प्रतिमेची संवेदना यामध्ये एकसंधपणा जाणवतो ,म्हणजेच 1/16 सेकंदाच्या आत जर पुढची प्रतिमा तयार झाली तर आपणास लाल वर्तुळ (लाल रंगाचे प्रकाश वलय)दिसते.
━•*───®───*━
* रंगांध व्यक्तींना निरनिराळ्या रंगांचा भेद करणे शक्य होत नाही.
(रंगात भेद, शंक्वाकार पेशी )
उत्तर:-1. मानवी डोळ्यांना रंगांची जाण ही डोळ्यातील दृष्टीपटलातील शंक्वाकार पेशी मुळे होते. शंक्वाकार पेशी प्रकाशाच्या रंगांना प्रतिसाद देतात.
2. रंगांध व्यक्तीच्या डोळ्यात विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशी नसतात. त्यामुळे त्यांना निरनिराळ्या रंगांचा भेद करणे शक्य होत नाही.
━•*───®───*━
* वाहन चालकाला परवाना देताना रांगांधता दोषाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असते.
( रंगात भेद, सिग्नल, सूचनाफलक , अपघात)
उत्तर:- 1. लाखांमध्ये काही व्यक्तींनाच विशिष्ट रंगांना प्रतिसाद देणाऱ्या शंक्वाकार पेशींचा अभाव असतो.
2.अशा व्यक्ती ते रंग ओळखू शकत नाही किंवा निरनिराळ्या रंगात फरक करू शकत नाहीत. अशा व्यक्तींना रांगांध व्यक्ती म्हणतात.
3. रंगात भेद न करता आल्यामुळे सिग्नल वरील रंग किंवा सूचनाफलकांचे रंग त्यांना समजले नाही तर अपघात होऊ शकतो. म्हणून वाहन चालकाला परवाना देताना रांगांधता दोषाकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे असते.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
विनोद 😃🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा