मुख्य सामग्रीवर वगळा

10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.1 , 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1


10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.1, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.1.



आपल्या माहिती विज्ञानाची या व्हाट्सअप समूहात सामील होण्यासाठी लिंक👇

🔦 संतुलित आहाराचे शरीरासाठी काय महत्त्व आहे?
उत्तर: 
  • निरोगी शरीर आणि मनासाठी संतुलित आहार आवश्यक आहे.
  • दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे आणि क्षार घेणे म्हणजेच संतुलित आहार होय.
  • संतुलित आहारामुळे आपले शरीर संतुलित राहते आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता निर्माण होते.
  • शरीराचे योग्य पोषण करणे व ऊर्जा निर्मिती यासाठी संतुलित आहार गरजेचा असतो.


🎷What is the importance of balanced diet for body?
Ans: 
  • A balanced diet is essential for a healthy body and mind.
  • consumption of carbohydrates, proteins, fats, vitamins and minerals in the right proportion is called balanced diet.
  • Balanced diet maintain our health and builds ability to fight disease.. 
  • Balanced diet is required for energy production in the form of ATP and nutrition of the body. 

🦚 स्नायू शरीरात कोणकोणते कार्य पार पाडतात?
उत्तर: 
  • स्नायू आपल्या शरीराची आपल्या इच्छेप्रमाणे हालचाल घडवून आणतात.
  • कर्बोदके आणि प्रथिने यांची साठवण स्नायू मध्ये होते.
  • आपल्या शरीरात तीन प्रकारचे स्नायू आहेत 1.ऐच्छिक, 2.अनैच्छिक, 3. हृदयीक  
  • ऐच्छिक स्नायू आपल्या इच्छेनुसार कार्य घडवून आणतात. आपल्या हात व पायामध्ये ऐच्छिक प्रकारचे स्नायू आहेत.
  • अनैच्छिक स्नायू शरीरातील सर्व मूलभूत कार्य घडवून आणतात. जठर, आतडे यामध्ये अनैच्छिक प्रकारचे स्नायू आहेत.
  • हृदयीक स्नायू हृदयाच्या कार्यावर नियंत्रण ठेवतात.

👏 Which different functions are perform by muscles in body?
Ans: 
  • Carbohydrates and proteins are stored in our muscles.
  • In our body three types of muscles are present, 
  • 1. Voluntary muscles
  • 2. Involuntary muscles &  
  • 3. Cardiac muscles. 
  • Voluntary muscles perform all the moments of our body according to our will.
  • Involuntary muscles bring about all vital activities such as digestion, excretion, etc.
  • Cardiac muscles control the moment of our heart. 


🛩️ मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते?
उत्तर: 
  • मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंड, मोठे आतडे, यकृत, त्वचा आणि फुफ्फुसे हे उत्सर्जनाचे अवयव म्हणून कार्य करतात.
  • शरीरातील नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मूत्रपिंड (kidney) मदत करतात.

⛱️ Which system is in action for removal of waste materials produced in human body?
Ans: 
  • Organs of excretion are kidneys, large intestine, liver, skin, and lungs.
  • Excretory system such as kidneys are in action for removal of nitrogenous waste materials produced in human body. 

💪 ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते?
उत्तर: 
  • पचनसंस्थेत तयार झालेला ग्लुकोज व श्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन यांचे तंतुकनिकेत ऑक्सिडीकरण होते व एटीपी युक्त ऊर्जा तयार होते.
  • मानवी रक्तातील हिमोग्लोबिन/ लोहित रक्तकणिका ऑक्सीजन वाहनाचे कार्य करतात.

🌬️What is the role of circulatory system in energy production?
Ans: 
  • The glucose produced from digestive system and oxygen carried by RBCs get transported to mitochondria.
  • In mitochondria oxidation takes place and ATP energy is liberated.


🔊 मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते? किती प्रकारे?
  • उत्तर: मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य दोन प्रकारे नियंत्रित होते.
  • चेतासंस्था व अंत:स्त्रावी संस्था याद्वारे शरीरातील वेगवेगळ्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते.

👉 How are the various processes occurring in the human body controlled? In how many ways?
Ans: 
  • The various processes occurring in human body controlled by two ways. 
  • The nervous system and endocrine systems control and regulate various life processes in humans.
 
🍹पाचकरसाचे पचनसंस्थेमध्ये काय महत्त्व आहे?
 उत्तर: 
  • पाचकरसामध्ये वेगवेगळी विकरे असतात. पाचकरस उत्प्रेकासारखे कार्य करत असल्या मुळे अन्न पचनाची क्रिया लवकर होते.
  • जठरातील पाचकरसामुळे शरीरातील सामू pH आम्लधर्मी होते.
  • आतड्यातील पाचकरसामुळे अन्न आम्लारिधर्मी होते.

🥤 What is the importance of digestive juices in digestive system?
Ans: 
  • Digestive juice contain different enzymes, which breakdown food into nutrients that the body can absorb. 
  • Saliva produced by the salivary glands moistens food. 
  • Enzymes act as catalyst.
  • The digestive juices of stomach make pH of digestive tract acidic while that of intestine in juice make it alkaline. 

 
*जिथे श्वास सुद्धा आपला नाही 
तिथे हे माझं ते माझं 
म्हणण्यात काहीच अर्थ नाही, 
कारण इथे घेतलेला श्वास सुद्धा 
इथेच सोडून जावा लागतो.*🎷🛩️

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अभ्यास कसा करावा ?...🤔🎷

अभ्यास कसा करावा? आपल्या What's App समूहात सामील होण्यासाठी माहिती विज्ञानाची या निळ्या लिंकला स्पर्श करावा. 🙏 👇 👉  माहिती विज्ञानाची 🎷 अभ्यास हा स्वतः साठी असतो . रविवार व सुट्टीचे दिवस हे राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी व पुनरावृत्ती साठी असतात. याचा अर्थ असा नाही की सुट्टी घेऊ नये, किंवा मोज मजा करू नये. लग्नकार्य, समारंभ यावेळेस संपूर्ण त्या सोहळ्याचा आनंद घ्यावा. हसा, खेळा पण जीवनात शिस्त पाळा.   अभ्यासाची सवय ही लहान पणापासून लावावी. लहानपणीचा अभ्यास हा बडबड गीते , लोकगीते, शुभंकरोती, a,b,c,d.... अ, आ, इ, ई, ..... A, B, C, D, इत्यादी... शुभंकरोती, भीमरूपी, हनुमान चालीसा, गणपती अथर्वशीर्ष, मनाचे श्लोक, यांचा वापर पाठांतरासाठी होतो का हे पहावे.🙏 दररोजचा अभ्यास हा दररोज झालाच पाहिजे. मुलांना अभ्यासाला बस ही सांगण्याची वेळ पालकावर येऊ नये अशी सवय त्यांना लावावी.  दिवसातून दोन-तीन वेळेस अभ्यासाला बस , अभ्यास कर हे पालू पद सुरू ठेवू नये.  पाठांतरापेक्षा समजून घेऊन केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो.  आपला मुलगा खरोखर अभ्यास करत आहे की नाही हे कळत नकळत आप...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

12 वी बोर्ड निकाल 2024🎷

  12वी बोर्ड निकाल 2024 🎷 तिसऱ्या आठवड्यात 12 वी चा तर चौथ्या   आठवड्यात 10 वी चा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोर्डाने जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद घेऊन तारीख जाहीर केली जाणार आहे. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.   9 विभागीय मंडळाचे निकाल तयार झाल्याने, राज्य मंडळाकडून सोमवारी पत्रकार परिषद तारीख जाहीर केली जाणार आहे. यंदा पेपर तपासणीची कार्यवाही लवकर पूर्ण करण्यात आली. आज पत्रकार परिषद घेऊन मंडळ 12 वी निकालाची तारीख जाहीर करणार. यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च दरम्यान घेण्यात आली असून राज्यात यंदा 3320 केंद्रावर 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी 12 वी बोर्ड निकाल 25 मे रोजी लागला होता, यावर्षी मागच्या वर्षीच्या  तुलनेत चार दिवस आधी बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या निकालाचे वेध लागलेले होते. बारावी निकालाच्या तारखा बद्दल सतत अफवा पसरत होत्या त्यामुळे मंडळाने आज तारीख जाहीर करण्याचे ठरवले आहे.