10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.2, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.2.
10 th, Sci-II, Life processes in living organisms: part-1.2, 10 वी, विज्ञान-2, सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.2.
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 What's App समूहात सामील होण्यासाठी लिंक 👇
💀 मानवी शरीरात कोणकोणत्या संस्था अविरतपणे कार्य करतात?
उत्तर: मानवी शरीरात पुढील संस्था अविरतपणे कार्य करतात
- श्वसन संस्था
- पचन संस्था
- चेतासंस्था
- उत्सर्जन संस्था
- रक्ताभिसरण संस्था
- अंतःस्रावी संस्था
🫀 Which systems are continuously performing their function in human body?
Ans:
Following systems are continuously performing their function in human body.
- Respiratory system
- digestive system
- excretory system
- circulatory system
- nervous system
- endocrine system
🦢 कर्बोदकांपासून आपल्याला 4 kcal/g एवढी ऊर्जा मिळते.
🦕 We get 4 kcal energy per gram of carbohydrates.
🫁 श्वसन म्हणजे काय?
उत्तर:
पेशीतील तंतुकनिकेत ऑक्सिजनच्या उपस्थितीत साठवलेल्या अन्नाचे ऑक्सिडीकरण केल्यावर शरीरातील पेशींना ऊर्जा प्रदान करण्याच्या क्रियेला श्वसन असे म्हणतात.
🪻 What is respiration?
Ans: Release of energy from the assimilated food by a chemical process is called respiration.
⚡ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये C, H, आणि O चे अनुक्रमे किती अणू असतात?
उत्तर:
- ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बनचे 6, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 अणू क्रमशः असतात.
- ग्लुकोजचे रेणुसूत्र C6H12O6
🚲 How many atoms of carbon (C) hydrogen (H) and oxygen (O) are respectively present in a molecule of glucose?
Ans:
- There are 6 atoms of carbon, 12 atom of Hydrogen and 6 atoms of oxygen are present in a molecule of glucose.
- The molecular formula of glucose is C6H12O6.
👻 ग्लुकोज मधील सर्व अणु एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधने जोडलेले असतात?
उत्तर: ग्लुकोज मधील सर्व अणु एकमेकांना सहसंयुज बंधने जोडलेले असतात.
🔦 Which types of chemical bonds are present in glucose molecule.?
Ans: Covalent bonds are present between carbon, hydrogen and oxygen in glucose molecule.
⛱️ रसायनशास्त्राच्या दृष्टीने एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे नेमके काय होते?
उत्तर: रसायनशास्त्राच्या दृष्टीने एखाद्या रेणूचे ऑक्सिडीकरण होते म्हणजे तो रेणू
- ऊर्जा गमावून ऑक्सिजन सोबत मिसळतो किंवा
- हायड्रोजन निघून जातो किंवा
- इलेक्ट्रॉन गमावले जातात.
😤 In terns of chemistry what happens actually when a molecule is oxidized?
Ans: In terns of chemistry when molecule is oxidized
- it gains oxygen atoms or
- the loss of hydrogen or
- it loses electrons with loss of energy.
🎈 पेशी श्वसनात मदत करणारे दोन सहविकर कोणते?
उत्तर: पेशी श्वसनात मदत करणारे दोन
सहविकर
1. NADH2 - निकोटिनामाईड ॲडेनाईन
डायन्युक्लिओटाईड
2. FADH2 - फ्लॅविन ॲडेनाईन
डायन्युक्लिओटाईड
🥁 Which enzymes are formed in cells and used in cellular respiration?
Ans:
- NADH2 - Nicotinamide Adenine dinucleotide
- FADH2 - Flavin adenine dinucleotide
ATP :
- ॲडीनोसीन ट्रायफॉस्फेट हा एक ऊर्जेने संपृक्त असा रेणू आहे.
- ATP त फॉस्फेटचे तीन रेणू एकमेकांना ज्या बंधांनी जोडलेले असतात त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते.
- ATP रेणूंचा पेशींमध्ये आवश्यकतेनुसार साठा करून ठेवलेला असतो.
- रासायनिकदृष्ट्या ATP हा ॲडीनोसीन रायबोन्युक्लिओसाइडपासून तयार झालेला ट्रायफॉस्फेटचा रेणू असून यात ॲडेनिन हा नत्रयुक्त रेणू , रायबोझ (C5H10O5) ही पेंटोज शर्करा व तीन फॉस्फेटचे रेणू असतात.
- ऊर्जेच्या आवश्यकतेनुसार ATP मधील फॉस्फेटच्या रेणूमधील बंध तोडून ऊर्जा मिळवली जाते म्हणून ATP ला ऊर्जेचे चलन (Currency) असे म्हटले जाते.
ATP:
Ans:
- Adenosine triphosphate is energy-rich molecule.
- In ATP energy is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other.
- ATP molecules are stored in the cells as per body need. Chemically, ATP is triphosphate molecule formed from adenosine ribonucleoside.
- ATP contains a nitrogenous compound-adenine, pentose sugar- ribose and three phosphate groups.
- As per the need, energy is derived by breaking the phosphate bond of ATP; hence ATP is called as ‘energy currency’ of the cell.
🥁 इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया तंतुकणिकेमध्ये राबवली जाते.
🎷 Electron transfer chain reaction is operated in mitochondria only.
💐 ऊर्जा मिळवताना स्निग्ध पदार्थांचे रूपांतर मेदाम्लात मध्ये केले जाते तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये केले जाते.
🥤 At the time of energy production lipids are converted into fatty acids where as proteins are converted into amino acids.
🦋 ग्लायकोलायसिस प्रक्रियेला ‘एम्ब्डेन - मेयरहॉफ- पार्नास पाथ-वे’ (EMP Pathway) असे म्हणतात.
🪻 Glycolysis is called as Embden-Meyerhof-Parnas pathway (EMP pathway).
‘🛩️ ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्र’ ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्झ क्रेब्ज यांनी
शोधली. म्हणून या चक्रीय अभिक्रियेला ‘क्रेब्ज चक्र’ असे संबोधले जाते.
⭕ The cyclical reactions of tricarboxylic acid cycle were
discovered by Sir Hans Krebs. Hence, this cyclical process is
called as Krebs cycle.
🎷 कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिश्वसन करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया स्पष्ट करा.
उत्तर:
स्निग्ध पदार्थ कर्बोदके प्रथिने
| | |
| | |
[मेदाम्ल] [ ग्लुकोज विघटन अमिनोआम्ल
| (Glycolysis) ] | | |
| | |
|. | |
| पायरुविक आम्ल |
| | |
|. | | | | |
|_ _ _ (ॲसेटील-को-एन्झाईम-A)__|
|
|
[ क्रेब चक्र. ]
|
|
{ CO2+ H2O + ऊर्जा }
🫀 *प्रत्येक व्यक्तीमध्ये
एक चांगला गुण दडलेला असतोच ,
फक्त त्याला गरज असते
योग्य ठिकाणी वापर करणाची.*
*एकदा का त्यांच्या गुणांना प्रसिद्धी मिळाली की,
त्या व्यक्ती ला यशस्वी होण्यावाचून
कोणी रोखू शकत नाही .*
*मात्र त्याला गरजेचे असते
जिद्दीने लढण्याची व
समाजापुढे योग्यरित्या सिद्ध होण्याची...!*
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा