मुख्य सामग्रीवर वगळा

10 वी, विज्ञान-1, 2. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण.


 10 वी, विज्ञान-1, 2. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण.


.               .•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..


             🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅


आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील 👇 लिंकला 🖇️ स्पर्श करा.
            

┈┅━❀꧁꧂❀━•┈   

मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या धड्याचा कितीही सखोल अभ्यास केला तरी तो संपता संपणार नाही. आपली विचारशक्ती जेव्हढी आपण वाढवू त्यानुसार यातील प्रश्न उत्तरे आपल्याला कळत जातील. या धड्यावरील जी नियमित प्रश्नावली आहे ती अगोदरच आपण पाहिली आहे. आजचा असा प्रयत्न आहे की सखोल धड्याचा अभ्यास कसा करावा यासाठीचा प्रयत्न. काही छोटे छोटे शब्द असतात, काही कालावधीनंतर आपण त्याचा अर्थ विसरून जातो. या भागात आपण धड्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

1. पहिल्या गणातील मूलद्रव्यांना अल्कधातू असे म्हणतात. (कारण)

उत्तर: 

पहिल्या गणातील मूलद्रव्यांना अल्कधातू म्हणतात, कारण ते पाण्याशी अभिक्रिया करून अल्कली (क्षार) तयार करतात आणि त्यांचे द्रावण क्षारीय असते.

पहिल्या गणातील मूलद्रव्यांना अल्कधातू (Alkali metals) असे म्हणतात, 

कारण:

2Na + 2H2O ----> 2NaOH + H2

 अल्कधातूंची उदाहरणे:

लिथियम (Li), सोडियम (Na), पोटॅशियम (K), रूबिडियम (Rb), सीझियम (Cs), फ्रँशियम (Fr).

2. दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांना अल्कधर्मी मृदा धातू असे म्हणतात.

उत्तर:  दुसऱ्या गणातील मूलद्रव्यांना अल्कधर्मी मृदा धातू म्हणतात, कारण त्यांच्या ऑक्साइड व हायड्रॉक्साइडला क्षारीय (अल्कधर्मी) गुणधर्म असतात. तसेच, हे धातू पृथ्वीच्या मृदेत संयुगांच्या रूपात आढळतात, म्हणून त्यांना मृदा धातू म्हटले जाते.

3. गण 17 मधील मूलद्रव्यांना हॅलोजन असे म्हणतात. (कारण)

उत्तर:  हॅलोजनचा अर्थ:

"हॅलोजन" हा शब्द ग्रीक शब्दांपासून आला आहे - "हॅलो" (मीठ) आणि "जन" (उत्पादक). तर, हॅलोजन म्हणजे मीठ उत्पादक.

4. गण 18 मधील मूलद्रव्यांना निष्क्रिय वायू मूलद्रव्य म्हणतात. (कारण)

उत्तर:  गण 18 मधील मूलद्रव्यांना निष्क्रिय वायू म्हणतात, कारण त्यांच्या बाह्य कक्षेत इलेक्ट्रॉन्स पूर्ण भरलेले असल्यामुळे ते रासायनिक अभिक्रियांमध्ये अतिशय कमी सहभाग घेतात, म्हणजेच ते रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात.

5. गण 1 व गण 2 यांचा समावेश एस खंडात होतो.

उत्तर:  गण 1 व गण 2 यांचा समावेश s-खंडात होतो, कारण या गणांतील मूलद्रव्यांमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन ‘s’ उपकक्षेत भरतो.

म्हणून ही मूलद्रव्ये s-block elements म्हणून ओळखली जातात.

6. गण 3 ते 12 या गणांचा समावेश डी. खंडात होतो.

उत्तर:  गण 3 ते 12 या गणांचा समावेश d-खंडात होतो, कारण या मूलद्रव्यांमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन ‘d’ उपकक्षेत भरतो.

म्हणून ही मूलद्रव्ये d-block elements (संक्रमण मूलद्रव्ये) म्हणून ओळखली जातात.

7. गण 13 ते 18 या गणांचा समावेश पी खंडात होतो.

उत्तर:  गण 13 ते 18 या गणांचा समावेश p-खंडात होतो, कारण या मूलद्रव्यांमध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन ‘p’ उपकक्षेत भरतो.

म्हणून ही मूलद्रव्ये p-block elements म्हणून ओळखली जातात.

8. दीर्घश्रेणी आवर्तसारणीच्या तळाशी दोन स्वतंत्र आवर्तने आहेत त्यांना एफ खंडातील मूलद्रव्य असे म्हणतात.

उत्तर:  दीर्घ श्रेणीच्या आवर्त सारणीच्या तळाशी असलेल्या दोन स्वतंत्र आवर्तांना f-खंड (एफ खंड) म्हणतात. या खंडातील मूलद्रव्यांना अंतर संक्रामक मूलद्रव्ये (Inner Transition Elements) असे म्हणतात.

कारण: ही दोन स्वतंत्र आवर्तने लॅन्थनाइड (Lanthanides) आणि ॲक्टिनाइड (Actinides) अशा दोन मालिकांमध्ये विभागलेली आहेत.

या मूलद्रव्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक संरचनेत 4f आणि 5f उपखोलांचे भरणे होते.

यामुळे ही मूलद्रव्ये आवर्त सारणीच्या मुख्य भागापासून वेगळी खाली दाखवली जातात.

म्हणूनच, f-खंडातील ही दोन आवर्तने म्हणजेच अंतर संक्रामक मूलद्रव्ये.

9. दीर्घ श्रेणी आवर्तसारणीच्या उभ्या स्तंभांना गण असे म्हणतात.

उत्तर:  

  1. दीर्घ श्रेणी आवर्त सारणीमध्ये उभ्या स्तंभांना “गण” म्हणतात. 
  2. एकूण 18 गुण आहेत. 
  3. एका गणातील सर्व मूलद्रव्यांच्या बाह्य इलेक्ट्रॉनिक संरचनेत साम्य असल्यामुळे त्यांचे रासायनिक गुणधर्मही साम्यपूर्ण असतात.

10. दीर्घश्रेणी आवर्त सारणीत एकूण 18 गण आहेत.

11. आधुनिक आवर्तसारणीच्या आडव्या ओळींना आवर्तन असे म्हणतात.

12. आधुनिक आवर्त सारणीत एकूण सात आवर्तने आहेत.

13. एस खंड व पी खंड या मूलद्रव्यांना सामान्य मूलद्रव्य असे म्हणतात.

उत्तर:  s-खंड (एस खंड) आणि p-खंड (पी खंड) यांतील मूलद्रव्यांना एकत्रितपणे सामान्य मूलद्रव्ये किंवा प्रतिनिधिक मूलद्रव्ये (Representative Elements) असे म्हणतात.

कारण:

  • या मूलद्रव्यांमध्ये बाह्य s किंवा p कवच भरत असतो.
  • यांचे गुणधर्म नियमितपणे बदलत जातात, त्यामुळे हे मूलद्रव्ये रासायनिक दृष्टीने प्रतिनिधिक मानली जातात.
  • यांमध्ये धातू, अधातू व धातूसदृश सर्व प्रकारची मूलद्रव्ये आढळतात.
  • गण  1, 2 (s-block) आणि गण  13 ते 18 (p-block) यांचा यात समावेश आहे.
  • म्हणून, s आणि p खंडातील मूलद्रव्ये = सामान्य/प्रतिनिधिक मूलद्रव्ये.

14. डी खंडातील मूलद्रव्यांना संक्रमक मूलद्रव्य असे म्हणतात.

उत्तर:  d-खंड म्हणजे आवर्त सारणीचं मधलं व्यस्त चौरस्ता. इथे इलेक्ट्रॉनांची ये-जा अशी चालते की त्यांच्या रासायनिक वर्तनात खरोखरच “संक्रमण” दिसतं.

संक्षेपात कारण असे: 

  • d-कक्षा (d-orbital) भरत असताना जी मूलद्रव्ये येतात, ती बहुधा अनेक ऑक्सिडेशन अवस्थांमध्ये दिसतात,
  • रंगीत संयुगे तयार करतात,
  • आणि उत्कृष्ट उत्प्रेरक (catalysts) म्हणून काम करतात.

15. एफ खंडातील मूलद्रव्यांना अंतरसंक्रामक मूलद्रव्य असे म्हणतात.

उत्तर: 

कारण:

  1. f-खंडात लॅन्थनाइड (4f series) आणि ॲक्टिनाइड (5f series) ही दोन मालिकेतील मूलद्रव्ये असतात.
  2. या मूलद्रव्यांमध्ये 4f किंवा 5f उपखोलांचे (subshell - s, p, d, f.) भरणे होते.
  3. त्यांची स्थिती आवर्त सारणीच्या मुख्य भागापासून खाली वेगळी दिलेली असते.
  4. ही मूलद्रव्ये d-खंडाच्या संक्रमण मूलद्रव्यांपेक्षा आतील उपखोल (f-sub shell) भरत असल्यामुळे त्यांना अंतर संक्रमण (Inner Transition) मूलद्रव्ये म्हटले जाते.

-----

16. धातुसदृश्य मूलद्रव्ये.

उत्तर:  

व्याख्या: धातुसदृश्य मूलद्रव्ये (Metalloids) ही अशी मूलद्रव्ये आहेत ज्यांच्यात धातू आणि अधातू या दोन्हींचे काही गुणधर्म आढळतात. 

ही मूलद्रव्ये आवर्त सारणीमध्ये धातू व अधातू यांच्या मधल्या भागात तिरक्या रेषेवर आढळतात.

✔ धातुसदृश्य मूलद्रव्यांची यादी

साधारणपणे खालील 7 मूलद्रव्ये धातुसदृश्य मानली जातात:

1. बोरॉन (B)

2. सिलिकॉन (Si)

3. जर्मेनियम (Ge)

4. आर्सेनिक (As)

5. ॲन्टिमनी (Sb)

6. टेल्युरियम (Te)

7. पोलोनियम (Po) (काहीवेळा मतभेद असू शकतात)

✔ धातुसदृश्य मूलद्रव्यांचे गुणधर्म

  • धातूसारखे गुणधर्म
  • उष्णता आणि विद्युत यांचे मध्यम स्तरावर वहन करतात.
  • चमक असू शकते (उदा. सिलिकॉन).
  • घन अवस्थेत आढळतात.
  • अधातूसारखे गुणधर्म
  • ठिसूळ (brittle) असतात — हातोडा मारल्यास तुकडे होतात.
  • उच्च वितळनांक नसतो.
  • आयनिक तसेच संयुजी संयुगे तयार करतात.

---

18. + एक संयुजा असलेली मूलद्रव्ये.

उत्तर: 

व्याख्या: एक संयुजा (valency = 1) असलेली मूलद्रव्ये म्हणजे ज्यांच्या अणूच्या बाह्य कक्षेत १ इलेक्ट्रॉन असतो किंवा ज्यांना १ इलेक्ट्रॉन देऊन/घेऊन संयुग तयार करता येते.

⭐ एक संयुजा असलेली मुख्य मूलद्रव्ये

1) गण 1 (सोडियम कुटुंब) – क्षारधातू (Alkali Metals)

ही सर्व धातू एक संयुजा असतात कारण यांच्या बाह्य कक्षा (ns¹) मध्ये 1 इलेक्ट्रॉन असतो.

उदा:

  1. हायड्रोजन (H)
  2. लिथियम (Li)
  3. सोडियम (Na)
  4. पोटॅशियम (K)
  5. रुबिडियम (Rb)
  6. सिझियम (Cs)
  7. फ्रॅन्सियम (Fr)

18.1 

अधातूंपैकी एक संयुजा असलेली उदाहरणे काही अधातू एक इलेक्ट्रॉन घेऊन एक संयुजा दाखवतात.

उदा:

  1. फ्लोरिन (F)
  2. क्लोरिन (Cl) 
18.2 कोणता धातुसदृश्य ऋण एक संयुजा दर्शवतो.

उत्तर: ॲस्टाटीन (At) हे धातुसदृश्य (metalloid-like) गुणधर्म असलेले मूलद्रव्य असून -1 संयुजा दाखवू शकते.

ॲस्टाटीन (At) - गण  17

----

19. + दोन संयुजा असलेली मूलद्रव्ये,

उत्तर:  

संयुजा +2 म्हणजे ती मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेत २ इलेक्ट्रॉन देतात.

✔ मुख्यतः +2 संयुजा असलेली मूलद्रव्ये:

(1) गण  2 – क्षारधातू (Alkaline Earth Metals)

  1. बेरीलियम (Be²⁺)
  2. मॅग्नेशियम (Mg²⁺)
  3. कॅल्शियम (Ca²⁺)

✔ यांशिवाय काही संक्रमण धातू बहुधा +2 संयुजा दाखवतात

  • लोह (Fe²⁺)
  • तांबे (Cu²⁺)
  • जस्त (Zn²⁺)
  • कॅडमियम (Cd²⁺)
  • पारा (Hg²⁺)
  • निकेल (Ni²⁺)
  • कोबाल्ट (Co²⁺)
  • मॅंगनीज (Mn²⁺)

थोडक्यात नियम: गण 2 = नेहमी +2

------

19.1 ऋण दोन (–2) संयुजा असलेली मूलद्रव्ये.

–2 संयुजा दाखवणारी अधातू:

  1. ऑक्सिजन(प्राणवायू) O²⁻
  2. गंधक S²⁻

------

20. + तीन संयुजा असलेली मूलद्रव्ये.

उत्तर:  +3 संयुजा (Valency +3) असलेली मूलद्रव्ये मुख्यतः गट 13 आणि काही गट 3 (d-खंड) तसेच f-खंडातील काही मूलद्रव्यांमध्ये आढळतात.

✅ 1) गट 13 मधील मूलद्रव्ये (मुख्य +3 संयुजा)

गट 13 = बोरोन समूह (Boron group) -या समूहातील बहुतांश मूलद्रव्यांची प्रमुख संयुजा +3 असते.

  1. B (बोरॉन) — +3
  2. Al (ॲल्युमिनियम) — +3
  3. Ga (गॅलियम) — +3

✅ 2) d-खंडातील (संक्रमक) काही मूलद्रव्यांची +3 संयुजा

Sc (स्कँडियम) — +3 (एकमेव स्थिर संयुजा)

  • La (लँथनम) — +3
  • Cr (क्रोमियम) — +3
  • Fe (लोह) — +2, +3
  • Co (कोबाल्ट) — +2, +3
  • Mn (मँगॅनीज) — +2, +4, +6, +3.

20.1 ऋण तीन संयुजा असलेली मूलद्रव्ये (–3)

गण  15 (नायट्रोजन गट):

  1. नायट्रोजन (N)
  2. फॉस्फरस (P)
  3. आर्सेनिक (As)
  4. ॲन्टिमनी (Sb)

------

21. + चार संयुजा असलेली मूलद्रव्ये.

+4 संयुजा असलेली काही मूलद्रव्ये म्हणजे 

कार्बन (C), मिथेन CH4), 

सिलिकॉन (Si), सिलिकॉन डायऑक्साइड- SiO2 आणि 

टिन (Sn), टिन टेट्राक्लोराईड (SnCl4).

21.1 ऋण चार संयुजा असलेली मूलद्रव्य.

मुख्यत्वे कार्बन गटातील (Group 14) काही मूलद्रव्ये विशिष्ट संयुगांमध्ये -4 ऑक्सिडेशन अवस्था दर्शवतात:

1) कार्बन (C)

मिथेन (CH₄) मध्ये कार्बन = -4

सर्वात सामान्य -4 संयुजा दर्शवणारे मूलद्रव्य

2) सिलिकॉन (Si)

सिलेन (SiH₄) मध्ये सिलिकॉन = -4

3) जर्मेनियम (Ge)

जर्मेनियम हायड्राइड (GeH₄) मध्ये = -4

----

22. 1 संयुजा असलेली मूलद्रव्ये.

ज्या मूलद्रव्यांची संयुजा 1 आहे, अशा मूलद्रव्यांमध्ये अनेक धातू आणि अधातूंचा समावेश होतो, जसे की: 

धातू: सोडियम (Na), पोटॅशियम (K), लिथियम (Li) इत्यादी.अधातूंमध्ये: हायड्रोजन (H), फ्ल्युओरिन (F) आणि इतर हॅलोजेन्स (Cl), (Br), (I) यांचा समावेश होतो.

----

23. 0 संयुजा असलेली मूलद्रव्ये. (कारण)

शून्य संयुजा असलेली मूलद्रव्ये म्हणजे गण १ ८ मधील मूलद्रव्ये/ अक्रिय/ निष्क्रिय/राज वायू आहेत, कारण त्यांचे बाह्य कवच पूर्णपणे भरलेले असते आणि त्यामुळे ते रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात. यामध्ये हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन यांचा समावेश होतो.

---- 

24. दुसऱ्या व तिसऱ्या आवार्तामधील धातुसदृश्य मूलद्रव्ये.

🌏 दुसऱ्या आवर्तनात (period) बोरॉन धातूसदृश्य (metalloid) मूलद्रव्य, 

तर तिसऱ्या आवर्तनात सिलिकॉन (Si) हे धातूसदृश्य मूलद्रव्य आहे

25. तिसऱ्या आवार्तामधील अधातू.

🥳 तिसऱ्या आवर्तामधील अधातू फॉस्फरस (P), सल्फर (S) आणि क्लोरीन (Cl) आहेत. 

---

26. संयुजा चार असलेली मूलद्रव्य.

⭕ कार्बन (C), सिलिकॉन (Si), जर्मेनियम (Ge) आणि टिन (Sn). 

---

27. कोणत्या गणाच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात.

🎷 हॅलोजन, गण 17 च्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. उदा. फ्लोरिन, क्लोरीन,  ब्रोमिन, आयोडीन.

--

28. आवर्तसारणीच्या कोणत्या खंडामध्ये धातू आणि अधातू नागमोडी रेषेने वेगळे दर्शवता येतात.

🤌 आवर्तसारणीच्या 'p' खंडामध्ये धातू आणि अधातू नागमोडी रेषेने वेगळे दर्शवता.

---

29. सर्व क्रियाशील धातूचा कोणत्या गणात समावेश होतो.

🎸 सर्व क्रियाशील धातूंचा समावेश गट 1 मधील अल्कली धातूंमध्ये होतो. उदा. लिथियम, सोडियम, पोटॅशियम.

---

30. सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षेत किती संयुजा इलेक्ट्रॉन असतात.

🌈 सिलिकॉनच्या बाह्यतम कक्षेत 4 संयुजा इलेक्ट्रॉन असतात. 

---

31. कोणत्या गणात अधिक अभिक्रियाशील अधातू असतात.

🎇 सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू गट गण 17 (हॅलोजन) मध्ये आढळतात.

---

32. शास्त्रीय कारणे लिहा.

अ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते.

🏆 आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होते. यामागचे कारण म्हणजे अणूतील प्रोटॉनची संख्या वाढल्यामुळे केंद्रकाचे इलेक्ट्रॉनवरील आकर्षण वाढते. यामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाच्या जवळ ओढले जातात आणि अणूचा आकार लहान होतो

----

आ. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातु-गुणधर्म कमी होत जातो.

🥁 आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना, अणुअंक वाढतो आणि अणूची त्रिज्या कमी होते, ज्यामुळे इलेक्ट्रॉन गमावणे कठीण होते आणि धातू गुणधर्म कमी होतात, तर अधातू गुणधर्म वाढतात. 

---

इ. गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.

🪕 गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढते कारण प्रत्येक नवीन ओळीत एक नवीन इलेक्ट्रॉन कवच जोडले जाते, ज्यामुळे केंद्रक आणि सर्वात बाहेरील इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर वाढते. 

----

ई. एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते.

एकाच गणामधील मूलद्रव्यांची संयुजा समान असते कारण त्यांच्या बाह्यतम कक्षेत (outermost shell) समान इलेक्ट्रॉनची संख्या असते. या समान संख्येमुळेच त्यांचे रासायनिक गुणधर्मही सारखे असतात. 

१. मूलद्रव्याची संयुजा ही त्यांच्या बाह्यतम कक्षेतील संयुजा-इलेक्ट्रॉन वरून ठरवली जाते.

२. गणातील सर्व मूलद्रव्यांची संयुजा-इलेक्ट्रॉनची संख्या समान असते. म्हणून एकाच गणातील मूलद्रव्ये समान संयुजा दर्शवतात. उदा., गण 1 मधील मूलद्रव्यांत संयुजा-इलेक्ट्रॉन 1 आहे. म्हणून गण 1 मधील मूलद्रव्यांची संयुजा एक आहे. त्याचप्रमाणे गण 2 मधील मूलद्रव्यांची संयुजा 2 आहे.


 1. एक ते वीस मूलद्रव्यांचे संज्ञा व अणुअंक.


अणु क्रमांक  मूलद्रव्याचे नाव   संज्ञा (Symbol)


1 हायड्रोजन H


2 हीलियम He


3 लिथियम Li


4 बेरिलियम Be


5 बोरॉन B


6 कार्बन C


7 नायट्रोजन N


8 ऑक्सिजन O


9 फ्ल्युओरिन F


10 निऑन Ne


11 सोडियम Na


12 मॅग्नेशियम Mg


13 अल्युमिनियम Al


14 सिलिकॉन Si


15 फॉस्फरस P


16 सल्फर S


17 क्लोरीन Cl


18 आर्गॉन Ar


19 पोटॅशियम K


20 कॅल्शियम Ca


---------


2. कक्षा K, L, M, N.


अणुकक्षांचे (Electron Shells) नाव K, L, M, N असे आहे आणि त्यांच्यात जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन्सची संख्या अशी आहे:


K- 2

L- 8

M -18

N -32

-----


3. गणात वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते.


अणुत्रिज्या ही एखाद्या अणूतील नाभिकापासून बाह्य इलेक्ट्रॉन्सपर्यंतची सरासरी अंतराची मोजणी आहे.


प्रत्येक खालील पातळीवर एक नवीन इलेक्ट्रॉन कक्षा (shell) अणूमध्ये येते.


अणूमध्ये इलेक्ट्रॉन्सच्या नवीन कक्षा जोडल्या जातात, ज्यामुळे बाह्य इलेक्ट्रॉन्स नाभिकापासून दूर जातात.


--------


4. सर्वात लहान आकारमानाचा अणू.


सर्वात लहान आकारमानाचा (Atomic radius) अणू म्हणजे हीलियम (Helium, He).


कारणे:


1. हीलियममध्ये केवळ २ इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ती K कक्षेत बसतात.


2. नाभिकातील प्रोटॉन्सची आकर्षक शक्ती या दोन इलेक्ट्रॉन्सवर खूप प्रभावी आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन्स नाभिकाजवळ खूप घट्ट राहतात.


3. परिणामी, हीलियमचे अणू अत्यंत लहान आकाराचे असते.


------


5. सर्वात कमी अणूवस्तुमानाचा अणू.


सर्वात कमी अणूवस्तुमान (Atomic Mass / Atomic Weight) असलेला अणू म्हणजे हायड्रोजन (Hydrogen, H).


कारणे:


1. हायड्रोजनमध्ये केवळ १ प्रोटॉन आणि ० किंवा १ न्यूट्रॉन (आयसोतोपनुसार) असतो.


2. त्यामुळे त्याचे परमाणुवस्तुमान सर्वात कमी (सुमारे 1 u) आहे.


--------


6. सर्वाधिक विद्युत ऋण अणू.


सर्वाधिक विद्युतऋण (Electronegativity) असलेले अणू म्हणजे फ्लोरीन (Fluorine, F).


कारणे:


1. फ्लोरीनमध्ये ७ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ते केवळ १ इलेक्ट्रॉन मिळवून स्थिर ऑक्टेट पूर्ण करू शकते.


2. फ्लोरीनचे नाभिक लहान आणि प्रोटॉन्सची संख्या जास्त, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्सला खूप आकर्षित करते.


3. परिणामी, फ्लोरीनची विद्युतऋणता (Pauling scale) ३.९ आहे, जी सर्वात जास्त आहे.


-------


7. सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू.


सर्वात कमी अणुत्रिज्या असलेला राजवायू (Noble Gas) म्हणजे हीलियम (He).


कारणे:


1. हीलियममध्ये केवळ १ कक्षा (K-shell) आहे आणि २ इलेक्ट्रॉन्स त्यात घट्ट बसलेले आहेत.


2. नाभिकाची आकर्षक शक्ती या इलेक्ट्रॉन्सवर पूर्ण प्रभाव टाकते, त्यामुळे अणू अत्यंत लहान असतो.


3. इतर सर्व राजवायूंमध्ये (Ne, Ar, Kr, Xe, Rn) इलेक्ट्रॉन्सच्या नवीन कक्षा जोडल्या असल्यामुळे अणुत्रिज्या वाढते.


-------


8. सर्वाधिक अभिक्रियाशील अधातू.


1. फ्लोरीनमध्ये ७ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आणि फक्त १ इलेक्ट्रॉन मिळवून स्थिर ऑक्टेट पूर्ण करू शकते.


2. त्याचा नाभिक छोटा आणि प्रोटॉन्सची संख्या जास्त असल्याने, विद्युतऋणता अत्यंत जास्त आहे.


3. परिणामी, फ्लोरीन इतर अणूंशी खूप सहजपणे प्रतिक्रिया करून अत्यंत अभिक्रियाशील ठरते.


------


9. एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण २ , ८ , २ आहे यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.


1. या मूलद्रव्याचा अणुअंक किती?


 उत्तर:- 


इलेक्ट्रॉनांची एकूण संख्या = 2 + 8 + 2 = 12


अणुअंक = 12 ✅


2. या मूलद्रव्याचा गण कोणता?


बाह्य कक्षातील इलेक्ट्रॉन्स

 = 2


त्यामुळे हे गण 2 (II A) मधील धातू आहेत.


3. हे मूलद्रव्य कोणत्या आवरतात आहे?


एकूण कक्षांची संख्या = 3 (K, L, M)


त्यामुळे आवरत = 3 ✅

     ┅━━━━━•❀•━━━━━┅

                               Ag

सोने कधीच का गंजत नाही? विज्ञानातील  रहस्य!

सोने हा जगातील सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे, परंतु त्याची अविश्वसनीय स्थिरता त्याला खास बनवते. लोखंड गंजते, चांदी काळी होते आणि तांबे हिरवे होते, परंतु सोने वर्षानुवर्षे, जर शतकानुशतके अबाधित राहते.

खरा प्रश्न असा आहे की सोने का बदलत नाही?

 सोने हा एक उदात्त धातू आहे. असे धातू हवा, धूळ किंवा घामाशीही प्रतिक्रिया देत नाहीत. सोने हे मूळतः "स्थिर" असते, म्हणून ते कोणत्याही वायूशी सहजपणे मिसळत नाही.

🌻 सोने कधीच गंजत नाही कारण त्याच्या रासायनिक गुणधर्मांमुळे ते अत्यंत अक्रिय (non-reactive) धातू आहे.

यासाठी मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

⭐ 1. रासायनिक अक्रियता (Chemical Inertness)

सोनेच्या बाहेरील पातळ्यांतील इलेक्ट्रॉन्स खूप स्थिर असतात. त्यामुळे सोने ऑक्सिजन, पाणी, आम्ल किंवा वायू यांच्याशी सहज अभिक्रिया करत नाही.

⭐ 2. ऑक्साइड स्तर तयार होत नाही

लोखंडासारख्या धातूंवर ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन गंज (ऑक्साइड) तयार होते.

पण सोन्यावर ऑक्साइड लेयर तयार होत नाही, म्हणून ते गंजत नाही.

⭐ 3. पाण्याशी अभिक्रिया नाही

पाणी किंवा आर्द्रता सोन्यावर काहीही परिणाम करत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे ठेवले तरी सोने तसंच चमकदार राहते.

⭐ 4. बहुतेक आम्लांवर परिणाम होत नाही

सोन्यावर सामान्य आम्ले (HCl, H₂SO₄, HNO₃) यांचा परिणाम होत नाही.

फक्त एक्वा रेजिया (HCl + HNO₃ चे मिश्रण) हेच सोने विरघळवू शकते.


       ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ━┅┉┈





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...

10 th, Science and technology, Total Part - 2, 10 वी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संपूर्ण भाग- 2.

  Science and technology Standard 10 Total Part 2 विज्ञान आणि तंत्रज्ञान  इयत्ता दहावी संपूर्ण भाग 2. Touch the blue link 🔗 below to join this What's App group of your माहिती विज्ञानाची 🎷👇  👉  माहिती विज्ञानाची 🎷 सेमी माध्यमांना सोपे जावे म्हणून प्रथम मराठीत व लगेच इंग्रजीत अशी प्रश्न उत्तरांची रचना केलेली आहे. मुलांची तशी मागणी होती. त्यांना हे सोपे जात आहे. कारण आपण शिकवत असतानाही याच पद्धतीचा अवलंब करतो . सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग एक हा धडा सध्या तयार नाही तो तयार झाल्यावर यामध्ये समाविष्ट केला जाईल. 1. अनुवंशिकता व उत्क्रांती 1, heredity and evolution 1 https://studyforbrain39.blogspot.com/2024/01/top-1010.html 2. अनुवंशिकता व उत्क्रांती 2, heredity and evolution 2  https://studyforbrain39.blogspot.com/2024/01/top-10-10th-class-heredity-and.html 3. अनुवंशिकता व उत्क्रांती 3, heredity and evolution 3 https://studyforbrain39.blogspot.com/2024/01/10th-science-heredity-and-evolution-10.html 4. अनुवंशिकता व उत्क्रांती 4, heredity and evolution 4  htt...