स्वाध्याय, 10 वी. विज्ञान 2, 2. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.2
┅━━━•❀•━━━┅
आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 लिंकला🖇️ स्पर्श करा.
.•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..
सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 या धड्याचे स्वाध्याय साठी दोन भाग केले आहेत. दुसरा भाग पान नंबर 16 विविध अन्नघटकांपासून मिळणारी ऊर्जा पासून पुढे.
1. रक्तामध्येसुद्धा रक्तद्रव्याच्या ... % पाणीच असते.
2. प्रथिनांपासूनसुद्धा प्रती ग्रॅम ... KCal एवढी ऊर्जामिळते.
3. सूत्री विभाजन मुख्य दोन टप्पे कोणते?
4. ... विभाजना ने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात ज्यांना जन्यपेशी (Daughter cells) म्हणतात.
5. सजातीय गुणसूत्रे म्हणजे काय?
6. ... मध्ये केंद्राकावरण पूर्णपणे नाहीसे होते.
7. ... म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते.
8. स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात?
9. सूत्री विभाजन का आवश्यक असते.
9.1 प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेली अमिनो आम्ल आकृतीने दाखवा.
10. एकगुणित पेशींचेनेमक महत्त्व काय आहे?
11. वनस्पती पेशींमध्ये खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल (Cell plate) तयार होऊन ... विभाजन होते.
12. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू (Centromere) यादरम्यान विशिष्ट अशा लवचीक प्रथिनांचे धागे (Spindle fibres/तुर्कतंतू ) ... मध्ये तयार होतात.
13. आपल्या शरीरात साधारणतः ... ते ... % पाणी असते.
14. वेगवेगळे अवयव व पेशी ...आम्लांपासून त्यांना अथवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात.
15. आपण फुले तोडतो त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का? त्या जखमा कशा भरून येतात?
16. पेशींचे प्रद्रव्यपटल तयार करण्यासाठी ... नावाचे रेणू आवश्यक असतात.
17. प्रकलविभाजनाच्या चार पायऱ्यां कोणत्या?
18. परीकलविभाजन या प्रक्रियेत पेशीच्या ... प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी तयार होतात.
19. युग्मक पेशी 2n असतात की n? का?
20. अंत्यावस्था मध्ये ... पूर्णपणे नाहीसे होतात.
21. प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या ... % पाणीच असते.
22. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजांपासून नव्यानेच तयार करतात व त्यांपासून विविध ... तयार करतात.
23. 2n (द्विगुणित) पेशी म्हणजे काय?
24. पश्चावस्था मध्ये गुणसूत्रे ... च्या घडासारखी दिसतात.
25. पालेभाज्या, फळे, धान्ये यांपासून आपल्याला ... पदार्थ मिळतात.
26. आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदक पदार्थ शरीरात यकृत आणि स्नायूंमध्ये ... च्या स्वरूपात साठवले जाते.
27. आपल्याला जखम होते त्या ठिकाणच्या ऊतींतील पेशींचे काय होते?
28. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात ‘चरबीयुक्त ... ऊतींमध्ये’ साठवून ठेवले जातात.
29. ... मध्ये तारा केंद्र (centriole) द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जात
30. चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण तयार करण्यासाठी ... वापर केला जातो.
31. झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का?
32. ... मध्ये केंद्राकावरण (nuclear membrane) आणि केंद्रिका (nucleolus) नाहीसे व्हायला सुरुवात होते.
33. एकगुणित पेशी कशा तयार होतात?
34. ... हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मांपैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे.
35. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला ‘...’ म्हणतात.
36. अर्धसूत्री विभाजनाचा भाग-II हा ... विभाजनासारखाच असतो.
37. कोणत्याही प्रकारच्या पेशीविभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या ... करते.
38. ग्लुकोज-विघटन आणि क्रेब-चक्र या प्रक्रियांमध्ये कोणते २ पदार्थ तयार होतात.
39. वनस्पतीपेशींच्या हरीतलवकांमध्ये असलेले ... नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वांत जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन होय.
40. ... विभाजन जनन पेशी अवलंबतात.
41. n (एकगुणित) पेशी म्हणजे काय?
42. रायबोफ्लेविन म्हणजे कोणते जीवनसत्व?
43. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना ... पदार्थ म्हणतात.
44. पेशीविभाजनाचे मुख्यत्वे 2 दोन प्रकार कोणते.
45. स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला प्रति ग्रॅम ... KCal इतकी ऊर्जा मिळते.
46. निकोटीनामाइड म्हणजे कोणते जीवनसत्व?
47. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर ... आम्ले तयार होतात.
48. ... विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते.
49. प्राणिज पदार्थांपासून मिळणाऱ्या प्रथिनांना ‘... प्रथिने’ म्हणतात.
50. पाणीसुद्धा एक अत्यावश्यक पोषकद्रव्य आहे, कारण लिहा.
51. मेदाम्लांचा उपयोग करून कोणकोणते संप्रेरक तयार होतात.
52. जीवनसत्त्वांचे मुख्य सहा प्रकार कोणते?
▬▬▬۩۞۩▬▬▬


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा