स्वाध्याय, 10 वी. विज्ञान 2, 2. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग-1.1
┅━━━•❀•━━━┅
आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 लिंकला🖇️ स्पर्श करा.
.•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..
सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग 1 या धड्याचे स्वाध्याय साठी दोन भाग केले आहेत. पहिला भाग पान नंबर 16 सांगा पाहू पर्यंत आहे.
विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे स्वाध्याय सोडवल्यास त्यांचा हा धडा व्यवस्थित तयार होईल ही खात्री. मोठा धडा असल्यामुळे, या धड्याचे स्वाध्याय दोन भागात विभागणे हा एकच पर्याय आहे. संपूर्ण धड्याचा व्यवस्थित व्हावा यासाठी छोट्या छोट्या घटकांचा विचार घेऊन स्वाध्याय तयार केला आहे.
1. काही सजीव ऑक्सिजनच्या सान्निध्यात राहू शकत नाही. अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी ... चा अवलंब करावा लागतो.
2. संतुलित आहाराचेशरीरासाठी काय महत्त्व आहे?
3. ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये C, H आणि O चेअनुक्रमे किती अणूअसतात?
4. कर्बोदकांमधून आपल्याला ... Kcal/gm एवढी उर्जा मिळते.
5. दीर्घ रूप लिहा NAD.
6. ... प्रक्रियेला
‘एम्ब्डेन- मेयरहॉफ- पार्नास पाथ-वे’ (EMP Pathway) असेही म्हणतात.
7. ऊर्जा निर्मिती प्रक्रियेत रक्ताभिसरण संस्था कशी कार्य करते?
8. रसायनशास्त्राच्या दृष्टीकोनातून एखाद्या रेणूचेऑक्सिडीकरण होतेम्हणजेनेमकेकाय होते?
9. रासायनिकदृष्ट्या ATP कसा असतो?
10. ऑक्सिश्वसनामध्ये ... टप्प्यांमध्ये ग्लुकोजचेऑक्सिडीकरण होते.
11. मानवी शरीरात कोणकोणत्या प्रकारच्या संस्था अविरतपणे कार्य करत असतात?
12. दीर्घ रूप लिहा FAD.
13. श्वसन म्हणजेकाय?
14. इलेक्ट्रॉन वहन साखळी
अभिक्रिया ... मध्ये राबवली
जाते.
15.‘ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्र’ या चक्रीय अभिक्रियेला ‘... चक्र’ असेही संबोधले जाते.
16. स्निग्ध पदार्थांचे रूपांतर मेदाम्लांमध्ये
केले जाते, तर प्रथिनांचे रूपांतर ... आम्लांमध्ये केले जाते.
17. ऊर्जेचे मुख्य 3 स्रोत कोणते?
18. ग्लुकोज मधील सर्व अणू एकमेकांना कोणत्या रासायनिक बंधाने जोडलेले असतात?
19. ... मध्ये ॲसेटील-को-एन्झाईम-A च्या रेणूतील ॲसेटीलचे
पूर्णपणे ऑक्सिडीकरण केले जाते.
20. अन्नपदार्थ व त्यांतील पोषकतत्त्वे शरीरासाठी कशी उपयुक्त ठरतात?
21. पेशीस्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते?
22. ATP ला ऊर्जेचे चलन (Currency) असे का म्हटले
जाते?
23. स्नायूशरीरात कोणकोणतेकार्य पार पाडतात?
24. सजीवांमध्ये ... हे शरीरस्तर आणि
पेशीस्तर अशा दोन स्तरांवर होते.
25. प्रत्येक पेशीत तयार होणारे व पेशीश्वसनात मदत करणारे दोन सहविकर कोणते?
26. मानवी शरीरांतर्गत चालणारेकार्य कसे नियंत्रित होते? किती प्रकारे?
27. ‘पेशीस्तरावरील श्वसन’ म्हणजे काय?
28. बिजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे ... करतात.
29. ॲडीनोसीन ट्राय फॉस्फेट हा एक ऊर्जेने संपृक्त
असा रेणू असून त्यात ... चे तीन रेणू एकमेकांना ज्या
बंधांनी जोडलेले असतात त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली
असते.
30. पाचकरसाचे पचनसंस्थेमध्ये काय महत्त्व आहे?
31. सजीवांमध्ये पेशीस्तरावर होणारे
श्वसनाचे दोन प्रकार कोणते?
32. ग्लुकोजच्या पूर्ण ऑक्सिडीकरणासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते?
33. मानवी शरीरात तयार होणारे टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था कार्यरत असते?
34. पेशीद्रव्यात घडणाऱ्या ग्लुकोज-विघटन प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एका रेणूचे टप्प्याटप्प्याने विघटन होऊन कोणते पदार्थ तयार होतात?
35. दीर्घ रूप लिहा ATP.
36. ट्रायकार्बोक्झीलीक आम्ल चक्राला दुसरे नाव काय?
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
🛞 रेल्वे चाक 🛞
भारतात कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे आणि बिहार मधील सारण जिल्ह्यातील बेला येथे रेल्वेचे चाक तयार केले जातात.
ट्रेनच्या चाकाचे वजन हे 326 किलोग्रॅम (LHB कोच) ते 554 किलोग्रॅम (इलेक्ट्रिक इंजिन) पर्यंत असू शकते.
सामान्य कोच च्या चाकाचे वजन 384 किलो तर डिझेल इंजिनच्या चाकाचे वजन 528 किलोग्रॅम असते.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे दर 30 दिवसांनी या चाकांचे परीक्षण केले जाते जर काही दोष आढळल्यास चाक बदलले जाते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा