मुख्य सामग्रीवर वगळा

नोट्स, 8वी विज्ञान - 11.3 मानवी शरीर व इंद्रिय संस्था.

 

नोट्स,  8वी  विज्ञान - 11.3  मानवी शरीर व इंद्रिय संस्था.

..•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..



🚁  आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील 👇लिंकला स्पर्श करा.
              
                                                 
                                                    👉  माहिती विज्ञानाची 🎷


꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂

🐐 रक्ताची कार्ये


1. वायूंचे परिवहन: फुप्फुसांमधील ऑक्सिजन O2 रक्ताद्वारे शरीराच्या सर्व भागांत पेशींपर्यंत वाहून नेला जातो. तसेच ऊतींकडून फुप्फुसांमध्ये CO2 आणला जातो.


2. पोषणतत्त्वांचे वहन (पेशींना खाद्य पुरविणे): अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो आम्ले, मेदाम्ले यांसारखी पचन झालेली साधी पोषणत्त्वे रक्तात घेतली जातात व ती शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जातात.

3. टाकाऊ पदार्थांचे वहन: युरिया, अमोनिया, क्रिएटिनीन इत्यादी नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ ऊतींकडून रक्तात जमा केले जातात. नंतर हे पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे वृक्काकडे वाहून नेले जातात.

4. शरीररक्षण: रक्तात प्रतिपिंडांची निर्मिती होते आणि ते सूक्ष्म जीवाणू व इतर उपद्रवी कण यांच्यापासून शरीराचे रक्षण करतात.

5. विकर व संप्रेरक परिवहन: विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्रवतात तेथून ती ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे वाहून नेली जातात.

6. तापमान नियमन: योग्य अशा वाहिनी विस्फारण आणि वाहिनी संकोचन यांमुळे शरीराचे तापमान 37 0इतके कायम राखले जाते.

7. शरीरातील सोडिअम, पोटॅशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणे.

8. रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे हे कार्य प्लेटलेट व रक्तद्रवातील फायब्रिनोजेन नावाचे प्रथिन करतात.

..•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..

🐒  मानवी रक्तगट (Human blood groups)

  • रक्तातील प्रतिजन आणि प्रतिपिंडे या दोन प्रथिनांवर आधारित रक्ताचे वेगवेगळे गट पाडले आहेत.
  •  मानवी रक्ताचे A, B, AB आणि O असे चार प्रमुख गट असून ‘आर एच’ (ऱ्हीसस) पॉझिटिव्ह व ‘आर एच’ निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्तगट होतात.(उदाहरणार्थ, A Rh +Ve व A Rh -Ve)

✺༺☬༒☬༻✺

🐓  रक्तदान:

  1. व्याख्या: शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरचे रक्त दिले जाते. याला ‘रक्त पराधान’ म्हणतात.
  2.  एखाद्या व्यक्तीला अपघात झाला की जखमांवाटे रक्तस्त्राव होतो. 
  3. अनेक वेळा शस्त्रक्रियेच्या वेळीही रुग्णास रक्त द्यावे लागते. 
  4. ॲनेमिया, थॅलॅसेमिया (Thalassemia), कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही बाहेरून रक्तपुरवठा केला जातो. 

┅━━━━━•❀•━━━━━┅

🐈  रक्तपेढ्या:

 रक्तपेढ्यांमध्येनिरोगी व्यक्तीच्या शरीरातून विशिष्ट पद्धतीने रक्त काढले जाते आणि ते गरजूंना पुरवले

जाते. जमा झालेले रक्त लगेच वापरायचे नसल्यास ते रेफ्रिजरेटरमध्ये काही दिवसांपर्यंत ठेवता येते.

❀꧁✧꧂❀

🐇  रक्तदाता: 

जी व्यक्ती रक्त देते तिला रक्तदाता म्हणतात.

┅━═▣◆★✧★◆▣═━┅

💫  रक्तग्राही: 

  1. ज्या व्यक्तीला रक्त दिले जाते ती व्यक्ती म्हणजे रक्तग्राही होय.
  2. O गटाचे रक्त इतर सर्व गटांना देता येते, तर AB गटाची व्यक्ती सर्वांकडून रक्त घेऊ शकते, म्हणून ‘O’ रक्तगटाला सर्वयोग्य दाता (Universal Donar) म्हणतात तर ‘AB’रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही (Universal Recipient) म्हणतात.

⋐⋑🔸✧ 🔸⋐⋑

🐅  रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान:

  • रक्तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या जनुकांवर अवलंबून असतात.
  • रक्तदान करताना रक्तगट जुळल्यासच ते रक्त रुग्णाला दिले जाते. 
  • रक्त पराधनात रक्तगट न जुळल्यास रुग्णाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे रुग्ण दगावण्याचाही संभव असतो.
  • आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो. 
  • काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान आहे.
  • अपघात, रक्तस्त्राव, प्रसवकाळ आणि शस्त्रक्रिया अशा स्थितीमध्ये रुग्णास रक्ताची गरज पडते. निरोगी व्यक्तीद्वारा केलेल्या रक्तदानाचा उपयोग गरजू रुग्णाचे जीवन वाचवण्यासाठी केला जातो. यामुळेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.

✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤

🐄 रक्तदाब (Blood pressure):

  1.  हृदयाच्या आकुंचनप्रसरणामुळे धमन्यांतील रक्त सारखे प्रवाहित ठेवले जाते.
  2. हृदयाच्या आकुंचनामुळे धमन्यांच्या भिंतीवर रक्ताचा दाब पडतो त्यास ‘रक्तदाब’ असे म्हणतात. 
  3. शरीराच्या सर्व भागांत रक्तपोहोचण्यासाठी योग्य रक्तदाब हा आवश्यक असतो. हृदयाच्या आकुंचनाच्या वेळी जो दाब नोंदविला जातो त्यास सिस्टॉलिक दाब’(अकुंचक दाब) असे म्हणतात व प्रसरणाच्या वेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास ‘डायस्टोलिक दाब’ (प्रकुंचनीय दाब) असे म्हणतात. 
  4. निरोगी माणसाचा रक्तदाब सुमारे 120/80 मिमी ते 139/89 मिमी मर्क्युरीच्या (पाऱ्याच्या) स्तंभाएवढा असतो. 
  5. रक्तदाब मोजण्यासाठी ‘स्पिग्मोमॅनोमीटर’ नावाचे यंत्र वापरतात.

━━═◆❃★❂★❃◆═━━

🐬  हे नेहमी लक्षात ठेवा.

  • आपल्या शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सतत चालू असते.
  • 18 वर्षावरील निरोगी व्यक्ती वर्षातून 3-4 वेळा रक्तदान करू शकते.
  • रक्तदानासाठी एकावेळी एका व्यक्तीचे 350 mरक्त घेतले जाते, तर आपले शरीर 24 तासांमध्ये घेतलेल्या रक्ताच्या तरल भागाची पूर्ती करते.
  •  गर्भावस्था, स्तनपानकाळ सुरू असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही.
  • रक्तदान करताना / केल्यानंतर कोणताही त्रास होत नाही.

┅━━━━━•❀•━━━━━┅

🐫  उच्च रक्तदाब:

  1.  माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब म्हणजे उच्च रक्तदाब होय.
  2. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तीच्या धमन्यांमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होतो. 
  3. उच्च रक्तदाब म्हणजे हृदयाला गरजेपेक्षा जास्त काम करावे लागते. यात दोन्ही सिस्टॉलिक व डायस्टॉलिक दाब वाढलेले असतात.

✧°══✺══°✧

🐎  शोध रक्तगटाचा:

  • A, B आणि O या रक्तगटांचा शोध इ.स. 1900 साली डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी लावला. या शोधाबद्दल त्यांना 1930 सालचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. 
  • AB रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी 1902 मध्ये लावला.

*❀**⊱═⊰*🔸✧ 🔸*⊱═⊰**❀*

🐌  रक्तशास्त्र (हिमॅटॉलॉजी):

रक्त, रक्त तयार करणारे अवयव आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा. रक्ताच्या सर्व रोगांचे निदान करणे व त्यांवर उपचार करणे याविषयीचे संशोधनही या शाखेत केले जाते.

▓▓▓▓🐫▓▓▓▓▓▓▓👏▓▓▓▓▓▓▓




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...

12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.

12  वी बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या 1 वाजता.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल शनिवार दिनांक ०२ मे २०२६ रोजी दुपारी ०१ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बोर्ड १२ वी निकाल २०२६ संदर्भात मोठी अपडेट! डिजीलॉकरवर रिझल्ट लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत  बोर्डाचा निकाल साधारणपणे दुपारी १:०० वाजता ऑनलाईन उपलब्ध होतो. निकाल ऑनलाइन कसा तपासायचा? निकाल जाहीर झाल्यावर  विद्यार्थी खालील 👇 अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचे गुण पाहू शकतात.... 👉   🌈    mahahsscboard.in १. mahresult.nic.in २.  hscresult.mkcl.org ३.  results.digilocker.gov.in ४.  mahahsscboard.in निकाल पाहण्यासाठी काय आवश्यक आहे?विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खालील दोन गोष्टी तयार ठेवाव्यात. हॉल तिकीटवर असलेला आपला बैठक क्रमांक, अर्जावर नोंदवलेले आईचे नाव. स्ट्रीम वाईज निकाल (आर्ट्स, कॉमर्स, सायन्स)महाराष्ट्र बोर्ड एकाच वेळी विज्ञ...