स्वाध्याय, 10 वी. विज्ञान.1, 7. भिंगे व त्यांचे उपयोग
┅━━━•❀•━━━┅
आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 लिंकला🖇️ स्पर्श करावा
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
- धड्याचा स्वाध्याय तयार करत असताना तो धडा संपूर्ण तयार व्हावा या दृष्टीने जास्तीत जास्त प्रश्न तयार केले आहे.
- स्वाध्याय सोडवणे हे एक आव्हान असणार आहे.
- या स्वाध्याय मधून आपणास काय व किती येते हे समजण्यास नक्कीच मदत होईल.
- स्व परीक्षा यासाठी हा स्वाध्याय आपणास उपयुक्त ठरेल ही सदिच्छा.
1. घड्याळ दुरूस्त करण्यासाठी, रत्नांची पारख करण्यासाठी व त्यातील दोष शोधण्यासाठी ... चा उपयोग करतात. ( या रिकाम्या जागेसाठी दोन उत्तरे ग्राह्य धरू.)
2. डोळ्याला दिसलेला वस्तूचा आभासी आकार हा वस्तूने डोळ्याशी धारण केलेल्या ... वर अवलंबून असतो.
3. R = 5 * 20/ -20 R = ?
4. सुस्पष्ट दृष्टीचे अधिकतम अंतर म्हणजे काय?
5. भिंगाची ... ही भिंगाच्या नाभीय अंतरावर असलंबून असते.
6. व्याख्या - प्रकाशिय केंद्र.
7. बहिर्गोल भिंगा साठी वस्तूचे स्थान अनंत अंतरावर असताना जर प्रतिमा नाभी F2 पाशी तयार होत असेल तर प्रतिमेचा आकार कसा असतो?
8. बहिर्गोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा मिळवण्या साठी कोणत्या तीन नियमांचा वापर करतात?
9. भिंगाचे प्रकार लिहा.
10. भिंगाचे सूत्र लिहा.
11. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे प्रकाशीय मध्यापासून मोजतात.
12. पारदर्शक पटलाच्या मागे गडद मांसल पडदा असतो, त्यालाच ... म्हणतात.
13. निरोगी मानवी डोळ्यासाठी दूरबिंदू ... अंतरावर असतो.
14. दरवाजावरील ... या उपकरणामध्ये एक किंवा अधिक अंतर्गोल भिंगाचा वापर करतात.
15. संयुक्त सूक्ष्मदर्शकात एका भिंगाने तयार झालेली प्रतिमा दुसऱ्या भिंगासाठी ... असते.
16. मानवी डोळ्याच्या बाबतीत, वस्तू दूर केल्यानंतरही ... सेकंदापर्यंत प्रतिमेचा दृष्टिपटलावर परिणाम तसाच राहतो.
17. ... भिंगाने कोणत्याही वस्तुची तयार झालेली प्रतिमा नेहमी आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा लहान आकाराची असते.
19. पडदा व भिंग यामधील अंतरास काय म्हणतात?
20. भिंगातून जाताना प्रकाश किरणाचे दोनदा ...होते.
21. बहिर्गोल भिंगारद्वारे विशालित, आभासी व सुलटी प्रतिमा मिळत असेल तर वस्तूचे स्थान कोठे असेल?
22. बहिर्गोल भिंगास अभिसारी भिंग का म्हणतात?
23. अंतर्गोल भिंगा समोर पदार्थ कोठेही ठेवल्यास मिळणाऱ्या प्रतिमेचा आकार पदार्थाच्या तुलनेत कसा असतो?
24. कार्टेशिअन चिन्ह संकेत लिहा.
25. बहिर्गोल भिंगासाठी समान आकाराची प्रतिमा मिळवण्यासाठी वस्तूचे स्थान कोठे असावे?
26. भिंगाच्या शक्तीचे एकक ... आहे.
27. नामनिर्देशित सुबक आकृती काढा- मानवी डोळा.
28. 1/v = 1/-20 + 1/10 v = ?
29. विजेरीत बल्बद्वारा निर्माण झालेल्या प्रकाशाला विस्तृतपणे विखुरण्यासाठी ... भिंगाचा उपयोग केला जातो.
30. द्वि-नाभीय भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गोल भिंगाचा असून ... दृष्टिता दोष दूर करतो.
31. दूरदर्शकाचे दोन प्रकार कोणते?
32. मानवी डोळ्यातील प्रकाशसंवेदी पेशींचे दोन प्रकार कोणते?
33. दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी ... शक्तीचा चष्मा असतो.
34. ... हे दोन पृष्ठभागानी युक्त असे पारदर्शक माध्यम आहे.
35. व्याख्या - वक्रता त्रिज्या.
36. बहिर्गोल भिंगा द्वारे पदार्थ F1 आणि 2F1 च्या दरम्यान ठेवल्यास, प्रतिमा मोठी मिळत असेल तर प्रतिमेचे स्थान कुठे असेल?
37. मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे (ऊर्ध्व अंतरे) ...असतात.
38. भिंगांच्या संयोगाचे सूत्र लिहा.
39. एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 40 cm आहे.तर त्या भिंगाची शक्ती किती असेल?
40. नाभीय अंतरात आवश्यकतेनुसार बदल करण्याच्या भिंगाच्या क्षमतेला ... शक्ती म्हणतात.
41. मानवी डोळ्यावर अत्यंत पातळ पारदर्शक पटल असते, त्याला ... म्हणतात
42. विशालन सूत्र लिहा.
43. सुस्पष्ट दृष्टिचे लघुत्तम अंतर म्हणजे काय?
44. फरक लिहा लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता आणि दूरदृष्टिता.
44.1 व्याख्या लिहा लघुदृष्टी.
44.2 निकट दृष्टिता दोषात प्रतिमेचे स्थान कोठे असते.
44.3 निकट दृष्टिता दोषाची दोन संभाव्य कारणे कोणती.
44.4 निकट दृष्टिता दोषाचे निराकरण कसे करतात.
44.11 व्याख्या लिहा -दूरदृष्टिता.
44.12 दूरदृष्टिता दोषात प्रतिमेचे स्थान कोठे असते.
44.13 दूरदृष्टितादोषाची दोन संभाव्य कारणे कोणती?
44.14 दूरदृष्टिता दोषाचे निराकरण कसे करतात.
45. द्वि-नाभीय भिंगामध्ये खालचा भाग ...भिंग असून दूर दृष्टिता दोष दूर करतो.
46. निकटदृष्टिदोषाच्या डोळ्यासाठी ... शक्तीचा चष्मा असतो.
47. दृष्टिसातत्य म्हणजे काय?
48. साध्या सूक्ष्मदर्शकाला ... असेही म्हणतात.
49. ... भिंगाचे नाभीय अंतर धन असते.
50. अंतर्गोल भिंगाद्वारे तयार होणारी प्रतिमा किरणाकृतीद्वारे काढण्यासाठीचे दोन नियम लिहा ?
51. व्याख्या -नाभीय अंतर.
52. भिंगाचे दैनंदिन जीवनातील दोन उपयोगात लिहा.
53. बहिर्गोल भिंगारद्वारे प्रतिमाही खूप मोठी व अनंत अंतरावर मिळत असेल तर वस्तूचे स्थान कोठे असेल?
54. भिंगाची शक्ती म्हणजे त्याच्या ... या एककात व्यक्त केलेल्या नाभीय अंतराचा व्यस्तांक होय.
55. बुबुळाच्या मध्यभागी बदलत्या व्यासाचे एक छोटेसे छिद्र असते त्यालाच डोळ्याची ...
म्हणतात.
56. भिंगाची शक्ती सूत्र लिहा.
57. अंतर्गोल भिंगांचे चार उपयोग लिहा.
58. साध्या सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने वस्तूची ... पट मोठी प्रतिमा मिळवता येते.
59. ... पेशींना अंधूक प्रकाशात संवेदना नसतात.
60. दृष्टीचे तीन अपवर्तन दोष कोणते?
61. मानवी नेत्रगोलाचा व्यास सुमारे ... cm असतो.
62. ज्या भिंगाचे दोन्हीं पृष्ठभाग आतल्या बाजने गोलीय असतात त्यांना ... भिंग किंवा दुहेरी अंतर्गोल भिंग म्हणतात.
63. अंतर्गोल भिंगास अपसारित भिंग का म्हणतात?
64. निरोगी डोळ्याकरिता डोळ्यातील स्नायूशिथिल असताना डोळ्याच्या भिंगाचे नाभीय अंतर ... cm असते.
65. भिंगातून बाहेर पडताना किरणांची दिशा का बदलते?
66. निरोगी मानवी डोळ्यासाठी निकटबिंदू डोळ्यापासून ... cm अंतरावर असतो.
67. व्याख्या - मुख्य अक्ष.
68. रंगांध म्हणजे काय?
68. बहुतेक भिंगांना ... गोलीय पृष्ठभाग असतात.
69. फरक लिहा -बहिर्वक्र भिंग व अंतर्वक्र भिंग.
70. बहिर्गोल भिंगा साठी वस्तूचे स्थान 2 F1 च्या पलीकडे असताना प्रतिमा ही F2 आणि 2F2 या दरम्यान तयार होत असल्यास प्रतिमेचा आकार ... असतो.
71. भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे, त्या गोलाच्या केंद्रास ...केंद्र म्हणतात.
72. अंतर्गोल भिंगाद्वारे अनंत अंतरावर ठेवलेल्या पदार्थाची प्रतिमा नाभी F1 वर बिंदू स्वरूपात मिळत असेल तर प्रतिमेचे स्वरूप लिहा?
73. व्याख्या - मुख्य नाभी.
74. भिंगाची शक्ती- व्याख्या लिहा.
75. डॉक्टरांनी दृष्टिदोषाच्या निराकरणासाठी +2.5 D शक्तीचे भिंग वापरण्याचा सल्ला दिला. त्या भिंगाचे नाभीय अंतर किती असेल? भिंगाचा प्रकार ओळखून नेत्रदोष कोणता असेल?
⋐⋑🔸✧ 🔸⋐⋑


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा