मुख्य सामग्रीवर वगळा

स्वाध्याय, 10 वी. विज्ञान 1, 9.1 कार्बनी संयुगे.

स्वाध्याय, 10 वी. विज्ञान 1,  9. 1 कार्बनी संयुगे. 

┅━━━•❀•━━━┅



✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤

आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 लिंकला🖇️ स्पर्श करा.

                                          👉       माहिती विज्ञानाची

   .•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..

विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे स्वाध्याय सोडवल्यास त्यांचा हा धडा व्यवस्थित तयार होईल ही खात्री. प्रचंड मोठा धडा असल्यामुळे, या धड्याचे स्वाध्याय दोन भागात विभागणे हा एकच पर्याय आहे. पण या धड्याच्या  स्वाध्यायचा एक फायदा असा आहे की हा धडा पुन्हा 12 वी ला आहे. संपूर्ण धड्याचा  व्यवस्थित व्हावा यासाठी छोट्या छोट्या घटकांचा विचार घेऊन स्वाध्याय तयार केला आहे. 

🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅

 1. अल्कीनच्या समजातीय श्रेणीतील सदस्यांची रेणुसूत्रे CnH2n या सामान्य सूत्राने दर्शवतात.

2. अल्कीन श्रेणीच्या दुसऱ्या सदस्याचेरेणुसूत्र लिहा.

3. ॲरोमॅटिक संयुग कोणास म्हणतात. 

4. भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकचअसते तेव्हा या घटनेला ‘रचना ...’

म्हणतात.

5. कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना ‘...’ म्हणतात.

6. ऑक्सिजनला मालिकाबंधन शक्ती आहे किंवा कसे ते सांगा.

7. COमध्ये C अणूप्रत्येक O अणूशी कोणत्या बंधानेजोडलेला आहे?

8. कार्बनची संयुजा किती ?

9. कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये चढत्या क्रमानेजाताना भौतिक गुणधर्मांमध्ये एका दिशेनेबदल होत जातो, म्हणजेच भौतिक गुणधर्मांमध्ये ... दिसून येते.

10. दोन अणूंमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संदानानेजो रासायनिक बंध तयार होतो त्याला ... बंध म्हणतात.

11. ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना ... म्हणतात.

12. ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बनांना ‘...’ असे म्हणतात.

13. प्राेपीन चे रेणुसूत्र व संक्षिप्त रचनासूत्र लिहा.

14. अल्कीन श्रेणीच्या पहिल्या सदस्याचे रेणुसूत्र लिहा.

15. प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने कच्च्या तेलाचे विलगीकरण करून वापरावयास उपयुक्त असे कोणकोणते विविध घटक मिळवतात? 

16. संपृक्त संयुगे- व्याख्या लिहा.

17. कार्बनचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहा.

18. ... बंधाचेरेखाटनस्पष्टपणेकरण्यासाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना काढतात.

19. हायड्रोजन पेरॉक्साइडचे पुढे दिलेल्या अभिक्रियेप्रमाणेआपोआप अपघटन होते.

H-O-O-H ----> 2 H-O-H + Oयावरून O-O या सहसंयुज बंधाच्या प्रबळतेविषयी काय अनुमान बांधाल?

20. गंधकाचे रेणुसूत्र S8 असून यात गंधकाचे आठ अणू एकमेकांना जोडून एक वलय तयार होते. S8 साठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना (वर्तुळेन दर्शविता) रेखाटा.

21. सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणूव चार हायड्रोजन अणूयांच्या संयोगाने झालेला ... . 

22. ज्या कार्बनी संयुगांतील दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना ... संयुग म्हणतात.

23. C4H10  या  रेणुसूत्रासाठी दोन समभाव्य रचनासूत्रे काढा.

24. बेंझीनच्या रचनासूत्रावरून समजते की तो ... असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.

25. कार्बनी संयुगांमधील कोणतेही  4 क्रियात्मक गट नावे  व रचनासुत्रासह लिहा.

26. अल्कीन समजातीय श्रेणीमधील तिसऱ्या सदस्यापेक्षा दुसऱ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलिन घटक कमी आहेत?

27. सायक्लोपेंटेन चे रेणुसूत्र लिहून रचनासूत्र काढा.

28. अमीन चे मुक्त संयुजेसह रचनासूत्र लिहा.

29. .ईथेनची रेषा संरचना / रचनासूत्र काढा.

30. क्लोरीनचा अणुअंक 17 आहे. क्लोरीन अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या किती असेल?

31. कार्बन हे मूलद्रव्य आवर्तसारणीत कोणत्या गणात आहे?  कार्बनची संयुजा किती ?

32. एका अणूनेदुसऱ्या अणूबरोबर केलेला सहसंयुज बंध दर्शवण्यासाठी दोन्हीअणूंच्या संज्ञांभोवतीची ... एकमेकांना छेदतातअसेदर्शवतात.

33. हायड्रोजनचा अणुअंक 1 असल्यानेत्याच्या अणूमध्ये ... कवचात 1 इलेक्ट्रॉन असतो.

34. शृंखलाबंधन शक्ती म्हणजे काय? 

35. कार्‌बॉक्सिलिक आम्लाचे मुक्त संयुजेसह रचनासूत्र लिहा.

36. कार्बनची असेंद्रिय संयुगे कोणती? 

37. एथीनचे रेणुसूत्र व संक्षिप्त रचनासूत्र लिहा.

38. अल्केनच्या समजातीय श्रेणीचे सामान्य सूत्र  लिहा.

39. राजवायू संरूपण गाठण्यासाठी कार्बन अणूसाठी कोणता मार्ग उत्तम? 0

40. कार्बन डाय ऑक्साइडचे रेणुसूत्र CO2 आहे. यावरून त्याची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना (वर्तुळ विरहित) व रेषा संरचना यांचेरेखाटन करा.

41. पेंटेन- कार्बन अणूंची सरलशृंखला काढा.

42. ईस्टर चे मुक्त संयुजेसह रचनासूत्र लिहा.

43. अल्कोहोल समजातीय श्रेणीच्या तिसऱ्या सदस्यापेक्षा चौथ्या सदस्याच्या सूत्रामध्ये किती मेथिलिन घटक जास्त आहेत?

44. दोन हायड्रोजन अणूंमध्ये दोन इलेक्ट्रॉनांच्या संदानाने ... बंध तयार होतो.

45.  ... संरचनेलाच रचनासूत्र असेही म्हणतात.

46. कार्बनी संयुगांमधील रासायनिक बंधांमुळे ...ची निर्मिती होत नाही.

47. पाण्याचेरेणुसूत्र H2O आहे. या त्रिअणु-रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना व रेषा संरचना काढा. (ऑक्सिजन अणूच्या इलेक्ट्रॉनसाठी ठिपका व हायड्रोजनच्या अणूंमधील इलेक्ट्रॉनसाठी फुली वापरा.)

48. अल्कोहोलचे मुक्त संयुजेसह रचनासूत्र लिहा.

49. अन्नपदार्थ, धागे, कागद, औषधे, लाकूड, इंधने या नेहमीच्या वापरातील वस्तू अनेकविध संयुगांच्या बनलेल्या आहेत. या संयुगांमध्ये सामाईक असलेली घटकमूलद्रव्ये कोणती?

50. संपृक्त हायड्रोकार्बनला ‘...’ असेही म्हणतात.

51. बेंझीन चे रेणुसूत्र लिहून रचनासूत्र काढा.

52. मीथेनॉल  चे रेणुसूत्र व संक्षिप्त रचनासूत्र लिहा.

53. अल्काइनांच्या समजातीय श्रेणीसाठी सामान्य रेणुसूत्र ....  लिहा.

54. ईथर चे मुक्त संयुजेसह रचनासूत्र लिहा.

55. सरलशृंखला व शाखीय शृंखलांच्या व्यतिरिक्त काही कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या ... शृंखला असतात.

56. कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये कार्बन शृंखलेच्या लांबीच्या चढत्या क्रमानेजाताना दर वेळी एक ... घटक (-CH2-) वाढत जातो.

 57. अमोनिआचे रेणुसूत्र NH3 आहे.अमोनिआसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना व रेषा संरचना काढा.

58. सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे ... होय.

59. कार्बनच्या संयुजा कवचात ... इलेक्ट्रॉन असतात.

60. नायट्रोजन मधील रेषा संरचना व इलेक्ट्रॉन बंध काढा. 

61. समजातीय श्रेणी व्याख्या लिहा. 

62. सायक्लोहेक्झेनचे रेणुसूत्र लिहून रचनासूत्र काढा.

63. विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अणुगटांना ... गट म्हणतात.

64. क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 असे आहे. क्लोरीनच्या रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना व रेषा संरचना यांचे रेखाटन करा.

65. सामान्यतः कार्बनी संयुगंाचे उत्कलनांक 300 0C पेक्षा कमी असल्याचे आढळते.

66.  N2 मध्ये दोन नायट्रोजन अणू एकमेकांना ... बंधाने जोडलेले आहेत.

67. सेंद्रिय संयुगांची नवी ओळख कोणती? 

68. नैसर्गिक वायूमधील प्रमुख घटक प्रामुख्याने ... असतो.

69. संयुगांचे प्रकार कोणते?

70. समजातीय श्रेणींची 2 वैशिष्ट्ये लिहा.

71.  कीटोन चे  मुक्त संयुजेसह रचना सूत्र लिहा.

72. कोणत्याही समजातीय श्रेणीमध्ये लांबीच्या चढत्या क्रमानेजाताना सदस्यांचा रेणुवस्तुमानात ... u इतकी वाढ होत असते.

73. समजातीय श्रेणी व्याख्या लिहा.

74. O2  रेणूमध्ये दोन ऑक्सिजन अणू एकमेकांना ... बंधाने जोडलेले आहेत.

75. एथिनची रेषा संरचना/रचना सूत्र काढा.

76. पेंटेन चे रेणुसूत्र व संक्षिप्त रचनासूत्र लिहा.

77. अल्कीन श्रेणीच्या दुसऱ्या सदस्याचेरेणुसूत्र लिहा.

 

╔════ ▓▓ ࿇🧿࿇ ▓▓ ════╗


जीभ 👅

  • जायंट अँटिटरची जीभ प्राण्यांच्या जगात सर्वात लांब असते, जी मुंग्या आणि वाळवीच्या घरट्यांमध्ये खोलवर पोहोचण्यासाठी 60 सेंटीमीटरपर्यंत पसरू शकते.
  • जिराफची जीभ सुमारे 45 ते 50 सेंटीमीटर लांब असते. ही जीभ गडद निळ्या-काळ्या रंगाची असते , जी जिराफ बराच वेळ अन्न खाण्यात घालवतो तेव्हा उन्हापासून संरक्षण करण्यास मदत करते असे मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जीभ घट्ट धरून ठेवता येते, म्हणजेच ती फांद्यांभोवती गुंडाळण्यासाठी आणि पाने अचूकपणे ओढण्यासाठी पुरेशी मजबूत आणि लवचिक असते,
  • गिरगिटा  च्या शरीराच्या लांबीपेक्षा दुप्पट लांबीपर्यंत पसरू शकते ! हा अति-लवचिक अवयव एका सेकंदापेक्षा कमी वेळात बाहेर पडून आश्चर्यकारक अचूकतेने कीटकांना पकडतो. जिभेच्या टोकावर सक्शन-सारख्या पॅडने सुसज्ज आहे जे त्याला सुरक्षितपणे शिकार पकडण्यास आणि धरण्यास मदत करते.
  •  सूर्य अस्वल ची जीभ आश्चर्यकारकपणे लांब आहे जी २५ सेंटीमीटरपर्यंत वाढू शकते . हे वैशिष्ट्य त्याच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचे आहे, ज्यामुळे ते झाडांच्या खोडांमध्ये आणि मधमाश्यांच्या पोळ्यांमध्ये खोलवर जाऊन त्याचे आवडते अन्न: कीटक, मध आणि अळ्या काढू शकते.
  • पँगोलिनची जीभ 40 सेंटीमीटरपर्यंत लांब असू शकते.

🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...