स्वाध्याय, 10 वी. विज्ञान 1, 9. 2 कार्बनी संयुगे.
┅━━━•❀•━━━┅
आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 लिंकला🖇️ स्पर्श करा.
.•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
1. CH₃-CHO. ॲसिटाल्डिहायड चे आय. यू. पी. ए. सी. नाव लिहा.
2. ऑक्सिजनचा पुरवठा मर्यादित केला तर संपृक्त संयुगाच्या ज्वलनानेसुद्धा ... ज्योत मिळते.
3. ... म्हणजे असा पदार्थ की ज्याच्यामुळे एखाद्या अभिक्रियेला कोणताही धक्का न लागता तिचा दर वाढतो.
4. सामान्यपणे ईथेनॉइक ॲसिडला ... ॲसिड म्हणतात.
5. Br-CH₂-CH₃ bromoethane ब्रोमोइथेने चे क्रियात्मक गट/ संक्षिप्त नाव लिहा.
6. अल्केनांची नावे त्यांच्यातील ... संख्येवरून दिली गेली.
7. मूलद्रव्यरूपी कार्बनच्या ज्वलनानेकोणतेउत्पादित तयार होते?
8. नैसर्गिक महारेणू चे 3 उदाहरणे द्या.
9. व्हाइनाइल क्लोराइड चे रचना सूत्र लिहा.
10. 2-क्लोरोपेंटेन चे रचना सूत्र काढा.
11. CH₃-CO-CH₃ ॲसिटोन चे आय. यू. पी. ए. सी. नाव लिहा.
12. जेव्हा एखादे कार्बनी संयुग दुसऱ्या संयुगाबरोबर संयोग पावून दोन्ही अभिकारकांमधील सर्व अणू असलेले एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेला ... अभिक्रिया म्हणतात.
13. जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ... म्हणतात.
14. ऊसाच्या रसापासून साखर बनवताना जी मळी तयार होते तिचे किण्वन केल्यावर अल्कोहोल ... मिळते.
15. थर्माकोलच्या वस्तू तयार करण्यासाठी कोणते बहुवारिक वापरतात?
16. जेव्हा अभिकारकामधील एका प्रकारच्या अणूची / अणुगटाची जागा दुसऱ्या प्रकारचा अणू/ अणुगट घेतो तेव्हा त्या अभिक्रियेला ... अभिक्रिया म्हणतात.
17. सर्व अल्कोहोलांची सोडिअम धातूबरोबर अभिक्रिया होऊन ... वायू बाहेर पडतो.
18. ईथेनॉलचे ईथेनॉइक ॲसिडमध्ये रूपांतर हि ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे का?
19. ... ही एकाच एकवारिकाच्या पुनरावृत्तीने बनलेली आहेत.
20. CH₃-NH₂ मिथेनामीन चे क्रियात्मक गट/ संक्षिप्त नाव लिहा.
21. प्रोपेनच्या पूर्ण ज्वलनाची अभिक्रिया लिहा.
22. लाकडात सेल्युलोज हे बहुवारिक असते ,तर लाकडातील एकवारिकाचे नाव लिहा.
23. पेंटेन-2 - ओन चे रचना सूत्र काढा.
24. बायोगॅसचेज्वलन ही अभिक्रिया उष्माग्राही आहेकी ऊष्मादायी?
25. पिशव्या, खेळाडूंचे कपडे तयार करण्यासाठी कोणते बहुवारिक वापरतात?
26. CH₃-CH₂-OH (ईथेनॉल) चे क्रियात्मक गट/ संक्षिप्त नाव लिहा.
27. नेहमीच्या वापरातील काही ऑक्सिडीकारक संयुगांची नावे लिहा.
28. प्रोपेन-2-ऑल चे रचना सूत्र काढा.
29. पॉलीव्हाइनाइल क्लोराइड (PVC) बहुवारिकाचे चे उपयोग लिहा.
30. दोन किंवा अधिक एकवारिकांपासून बनलेल्या बहुवारिकांचा असतो. त्यांना ... (Copolymers) असे म्हणतात.
31. सोडिअम हायड्रॉक्साईडच्या द्रावणाबरोबर मेद तापवले असता ... व ग्लिसरीन
तयार होतात.
32. CH₃COOH + NaHCO₃ -----> ... + H₂O + CO₂
33. CH₃-COOH ईथेनॉइक ॲसिड चे क्रियात्मक गट/ संक्षिप्त नाव लिहा.
34. गरम कपडे, ब्लॅंकेट तयार करण्यासाठी कोणते बहुवारिक वापरतात.
35. कोणत्या घटकामुळे बायोगॅसचा इंधन म्हणून उपयोग होतो?
36. ईथेनाॅल या महत्त्वाच्या औद्योगिक द्रावकाचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात ... हे विषारी द्रव्य मिसळतात.
37. अतिरिक्त संहत सल्फ्यूरिक ॲसिडबरोबर 170° C तापमानाला ईथेनॉल तापवले असता त्याच्या एका रेणूमधून पाण्याचा एक रेणू बाहेर काढला जाऊन ... हे असंपृक्त संयुग तयार होते.
38. CH₃-CH₂-Cl chloroethane चे क्रियात्मक गट/ संक्षिप्त नाव लिहा.
39. इंजेक्शनची सिरींज, टेबल, खुर्च्या तयार करण्यासाठी कोणते बहुवारिक वापरतात.
40. रंगहीन ईथेनॉल कक्ष तापमानाला द्रव असून त्याचा उत्कलनांक ... C आहे.
41. ईथेनॉइक ॲसिडला ग्लेशिअल ॲसेटिक ॲसिड असे नाव का पडले?
42. लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने तयार होत असलेल्या महारेणूला ... म्हणतात.
43. CH₃ - CO - CH₃ चे क्रियात्मक गट/ संक्षिप्त नाव लिहा.
44. टेफ्लॉन बहुवारिकाचे उपयोग लिहा.
45. रबराच्या झाडाचा चीकात रबर हे बहुवारिक असते , तर त्यातील एकवारिकाचे नाव लिहा.
46. CH₃-CH₂-CHO चे क्रियात्मक गट/ संक्षिप्त नाव लिहा.
47. ज्या अभिक्रियेने एकवारीक रेणूंपासून बहुवारिक तयार होतो त्या अभिक्रियेला ... असे म्हणतात.
48. मीथेनॉल (CH₃OH) हा ईथेनॉलचा निम्न समजातक विषारी असून त्याच्या लहान राशीचेसेवन ... व प्रसंगी प्राणघातक ठरू शकते.
49. CH₂Cl₂ + Cl₂ → -----> ... + HCl
50. संयुगाला आय. यू. पी. ए. सी. नाव देताना त्या संयुगाच्या ... अल्केनचे नाव आधारभूत धरतात.
51. ज्या लहान घटकाच्या नियमित पुनरावृत्तीने बहुवरिक बनतो, त्या लहान घटकाला ... असे म्हणतात.
52. ... अल्केनच्या नावाला योग्य ते प्रत्यय व उपसर्ग जोडून संयुगाचे नाव तयार करतात.
53. लक्षावधी अणूंपासून बनलेल्या प्रचंड कार्बनी रेणूंना ... असे म्हणतात.
54. रचनासूत्रामध्ये एखादा क्रियात्मक गट असल्यास जनक नावातील शेवटचे ‘...’ हे अक्षर काढून त्याजागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडावे.
55. बऱ्याचशा फळांना असलेला स्वाद हा त्यांच्यात असलेल्या विशिष्ट ... मुळे असतो.
56. IUPAC चे दीर्घ रूप लिहा.
57. CH₃-CH₂-OH -----> ... + H₂O.
58. हॅलोजन या क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव नेहमीच ... म्हणून जोडतात.
59. आय. यू. पी. ए. सी. नावाचे तीन घटक कोणते.
60. सोडिअम ईथेनॉएट चे सामान्य नाव ... ॲसिटेट असे आहे.
●┈┉꧁●꧂┉┈●
उदासीनता के वजह तो बहोत है जिंदगी में,
पर
बेवजह खुश रहने का
मजा ही कुछ और है....!
🎷
●~~•❅• 🫐 •❅•~~●
पहिल्या चार अल्केनांची नावां लिहा.
जर प्रस्तुत संयुगांच्या कार्बन शृंखलेत तिहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट ‘ane’ ऐवजी ‘...’ ने करावे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा