मुख्य सामग्रीवर वगळा

स्वाध्याय, 10 वी. विज्ञान 1, 8. धातुविज्ञान.

 

स्वाध्याय, 10 वी. विज्ञान 1,  8. धातुविज्ञान. 

┅━━━•❀•━━━┅



✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤

आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 लिंकला🖇️ स्पर्श करावा

                                          👉       माहिती विज्ञानाची

   .•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..

       स्वाध्याय तयार करत असताना धड्याला जास्त प्राधान्य दिलेले आहे.त्यामुळे सखोल संपूर्ण विचार करून धड्यातून जास्तीत जास्त प्रश्न उत्तरे एका वाक्यात किंवा रिकाम्या जागा च्या स्वरूपात घेतले आहेत. या स्वाध्याय मधून धड्याला न्याय मिळेल ही अपेक्षा.🙏💫

                                

  • आपली पृथ्वी अंदाजे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली.🙏💫
  •  मूलद्रव्यांचे वर्गीकरण प्रारंभीच्या काळात त्यांच्या रासायनिक आणि भौतिक गुणधर्मांनुसार धातू, अधातू आणि धातुसदृश ह्या प्रकारांमध्ये करण्यात आले.
 ꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂  

1. तांब्याची विरल  नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन ... वायू बाहेर पडतो.
2. .... संयुगे ही स्फटिकरूप असतात.
3. आम्लराज टीप लिहा.
4. धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी म्हणजे काय? 
5. धातूंना हवेमध्येतापविले असता हवेतील ऑक्सिजनशी ते संयोग पावतात व धातूंच्या .... ची निर्मिती होते.
6. पाण्याच्या वाफेशी रसायनिक अभिक्रिया करणाऱ्या 2  धातूंची नवे लिहा.
7.  केवळ पारा आणि .... (29.76 0C) हे धातू कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत असतात.
8. ल्युमिनिअम संज्ञा : ....
9. झिंक ब्लेंड (ZnS) आणि कॉपर पायराइट (CuFeS2) च्या संहतीकारणासाठी .... पद्धतीचा वापर करतात.
10. हवेत उघडा ठेवल्यावर सोडीअम धातू सहज पेट घेतो त्यामुळे प्रयोगशाळेत तसेच इतर ठिकाणी होणारा अपघात टाळण्यासाठी तो .... मध्ये ठेवतात.
11. ... मध्ये सिलिका (SiO2), फेरिक ऑक्साइड (Fe2O3) आणि टिटॅनिअम ऑक्साइड (TiO2) या अशुद्धी असतात.
12. ल्युमिनिअमचे त्याच्या मुख्य धातुक .... (Al2O3.nH2O) पासून निष्कर्षण केले जाते.
13. सोडिअम, कॅल्शिअम व मॅग्नेशिअम हे धातू त्यांच्या वितळलेल्या .... क्षारांच्या अपघटनाने मिळवतात.
14. मध्यम अभिक्रियाशीलतेचेधातू निसर्गत: कोणत्या स्वरूपात आढळतात?
15. कमी अभिक्रियाशील धातू कोणते? 
16. .... चे मुख्य धातुक बॉक्साइट आहे.
17. व्याख्या लिहा: निस्तापन.
18. चांदीच्या वस्तूंचा हवेशी संपर्क आल्यास कालांतराने त्या वस्तू .... पडतात,
19. .... (HgS) या पाऱ्याचा  धातुक आहे.
20. .... (Tinning) या पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूंवर चढविण्यात येतो.
21. ऑक्सिजन आणि सिलिकॉन नंतर .... हे तिसरे मूलद्रव्य आहे जे भूपृष्ठामध्ये मुबलक प्रमाणात आढळते.
22. क्षरण प्रतिबंधासाठी 2 मार्ग लिहा.
23. 1. नावे लिहा.
अ. सोडीअमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र.
आ. ल्युमिनिअमच्या सामान्य धातुकाचे रेणूसूत्र
इ. आम्ल आणि आम्लारी या दोन्हींबरोबर अभिक्रिया करून क्षार आणि पाणी तयार करणारे ऑक्साईड
ई. धातुक भरडण्यासाठी वापरण्यात येणारे साधन.
उ. विद्युत सुवाहक अधातू.
ऊ. राजधातूंना विरघळवणारे अभिक्रियाकारक.
24.  व्याख्या लिहा: विद्युत विलेपन.
25. ल्युमिनिअम संयुजा : .... 
26. धातूच्या सल्फाइड किंवा कार्बोनेटपेक्षा त्यांच्या ....पासून धातू मिळवणे सोपे असते.
27. व्याख्या लिहा: थर्मिट अभिक्रिया.
28. विशिष्ट .... धातुकांचे कण प्राधान्याने तेलाने भिजल्याने फेसासोबत पाण्यावर तरंगतात.
29. मध्यम अभिक्रियाशीलतेचे धातू कोणते?
30. धातुकांचे संहतीकरण करण्याच्या सामान्य पद्धती कोणत्या?
31. भाजणे(Roasting) व्याख्या लिहा. 
32. ल्युमिनिअम इलेक्ट्रॉन संरूपण : ....
33. .... किंवा साबणास पाणी चिकटते म्हणजेच पाण्याने ते भिजतात.
34. कॅसिटराइट हे .... ह्या धातूचे धातुक आहे.
35.ज्या खनिजांपासून सोयीस्करपणे आणि फायदेशीररीत्या धातू वेगळा करता येतो त्यांना .... म्हणतात. 
36. .... संयुगे केरोसिन, पेट्रोल यांसारख्या द्रावकात अद्रावणीय असतात.
37. सामान्यत: अधातू ऑक्सिजनबरोबर संयोग पावून आम्लधर्मी ऑक्साइड तयार होते. पण यास अपवाद .... ऑक्साइड उदासीन ऑक्साइड आहे.
38. कशाच्या आधारे वैज्ञानिकांनी अभिक्रियाशीलता श्रेणी विकसित केली?
39. धातूंच्या सल्फाइडचे कण त्यांच्या जलविरोधी गुणधर्मामुळे प्राधान्याने .... ने भिजतात,
40. विलगीकरणाच्या विल्फ्ली पद्धतीत .... चे अरुंद पातळ असे तुकडे कमी उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फ्ली टेबल तयार केले जाते.
41. दोन अभिकर्षिताची उदाहरणे द्या.
42. .... विद्युत दुर्वाहक असतो पण उष्णतेचा सुवाहक असतो.
43. .... चे विद्युतचुंबकीय पद्धतीने विलगीकरण केले जाते.
44. ल्युमिनिअम निष्कर्षणाच्या दोन पायऱ्या कोणत्या? 
45. फेन निर्माण करण्याकरता कोणकोणते तेल पाण्यात टाकतात?
46. अशुद्ध धातूंपासून शुद्ध धातूमिळवण्यासाठी .... .... पद्धत वापरतात. 
47. धनाग्रीकरण का करावे? 
48. तांब्याच्या भांड्याच्या पृष्ठभागावर दमट हवेतील कार्बन डायऑक्साइडची अभिक्रिया होते.या अभिक्रियेत तांब्यावर कॉपर कार्बोनेटचा (CuCO3) .... थर जमा झाल्यामुळे तांब्याची चकाकी जाते.
49. मुक्तावस्थेत आढळून येणाऱ्या 2 धातूंची नवे लिहा.
50. .... या धातुकात मुख्यत्वे स्टनिक ऑक्साइड (SnO2) हा अचुंबकीय घटक आणि फेरस टंगस्टेट (FeWO4) हा चुंबकीय घटक असतो.
51. क्षरण म्हणजे काय?
52. लोखंड किंवा पोलादाचे क्षरण रोखण्यासाठी त्यावर ....चा पातळ थर देण्यात येतो.
53. धनाग्रीकरण प्रक्रियेत विद्युत  अपघटनी म्हणून कोणते द्रावण वापरतात?
54. रजत पारद संमिश्राचा उपयोग बहुतकरून .... करतात.
55. धातुकांपासून मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेस धातुकांचे .... म्हणतात.
56. विद्युतधन म्हणजे काय?
57. न गंजणारे स्टील हे 74 % लोह, 18% क्रोमिअम व 8 % .... यांच्यापासून तयार केलेले संमिश्र आहे.
58. पारदसंमिश्र म्हणजे काय?
59. धातुकांपासून धातूंचे शुद्ध स्वरूपात निष्कर्षण करण्याच्या क्रियेचा .... समावेश होतो.
60. धन आयन व ऋण आयन ह्या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना ....संयुगे म्हणतात.
61. धातुकांमध्ये धातूच्या संयुगाबरोबर माती, वाळू आणि खडकीय पदार्थ अशा अनेक प्रकारच्या अशुद्धी असतात.या अशुद्धींना .... अशुद्धी असे म्हणतात.
62. विद्युत विलेपन प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट करा.
63. विरल सल्फ्युरीक किंवा हायड्रोक्लोरीक आम्लाबरोबर धातूंची अभिक्रिया  घडवून आणली तर धातूंचे सल्फेट किंवा क्लोराइड क्षार मिळतात. या अभिक्रियेमध्ये .... वायू मुक्त होतो.
64. कथिलीकरण का करावे.  
65. आयनिक संयुगांचे सामान्य गुणधर्म लिहा.
66. व्याखा  लिहा धातुविज्ञान.
67. Cl2 (g)+ H2O(l) ---->  .... (aq)+HCl(aq)
68. नाणी बनविण्यासाठी कोणते  विशिष्ट संमिश्र वापरतात.
69. धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना .... असे म्हणतात.
70. टंगस्टेट आयनावरील प्रभार किती? 
71. .... (Anodization) या पद्धतीत तांबे, 
ल्युमिनिअम यांसारख्या धातूंवर विद्युत अपघटनाद्वारे त्यांच्या ऑक्साइडचा पातळ, मजबूत असा लेप देतात.
72. ... अशुद्धी ह्या त्यांच्या जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्याने  भिजतात.
73. .... हे 90 % तांबे व 10 % कथील यांच्यापासून तयार केलेले संमिश्र आहे.
74. .... पारद्संमिश्राचा उपयोग सोन्याच्या निष्कर्षणासाठी केला जातो.
75. गंज- रेणुसूत्र लिहा. 
76. तांब्याचे कळकणे म्हणजे काय? 
77. कल्हई करणे म्हणजे काय?
78. रासायनिक समीकरण लिहा - झिंक ऑक्साइड हे विरल हायड्रोक्लोरीक आम्लामध्ये विरघळविले.
79. Cu, Zn, Ca, Mg, Fe, Na, Li या धातूंची विभागणी क्रियाशील, मध्यम क्रियाशील व कमी क्रियाशील अशा तीन गटांमध्ये करा.
80. नामनिर्देशित आकृती काढा. ल्युमिनाचे विद्युत अपघटन.
81. शास्त्रीय कारण लिहा. फेनतरणात पाईन वृक्षाचे तेल वापरले जाते.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...