मुख्य सामग्रीवर वगळा

नोट्स, 8वी विज्ञान - 11.2 मानवी शरीर व इंद्रिय संस्था.

 

नोट्स,  8वी  विज्ञान - 11.2  मानवी शरीर व इंद्रिय संस्था.

..•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..

🚁  आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील 👇लिंकला स्पर्श करा.
              
                                                 
                                                    👉      माहिती विज्ञानाची 🎷

✺༺☬༒☬༻✺

🏂  रक्ताभिसरण म्हणजे काय?
उत्तर: 
व्याख्याहृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या अाणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस ‘रक्ताभिसरण’ म्हणतात. 
 रक्ताभिसरण म्हणजे शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्तामार्फत पाणी, संप्रेरके, ऑक्सिजन, विद्राव्य अन्नघटक, टाकाऊ पदार्थ फिरण्याची प्रक्रिया आहे, जी हृदय आणि रक्तवाहिन्यांद्वारे केली जाते.

✧°══✺══°✧

👏  रक्ताभिसरण संस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो ?
उत्तर: रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या आणि केशिकांचा समावेश होतो.
❀꧁✧꧂❀
💛 हृदय: रचना व कार्ये:
  • स्थान : छातीच्या पिंजऱ्यामध्ये जवळजवळ मध्यभागी हृदय असते. ते बरगड्यांमागे, दोन्ही फुप्फुसांच्यामध्ये आणि थोडेसे त्याच्या डाव्या बाजूला कललेले असते. 
  • आकार: पल्या हृदयाचा आकार आपल्या मुठीएवढा असतो.
  •  मानवी हृदयाचे वजन साधारणपणे 360 ग्रॅम असते. 
  • आवरण: आपल्या हृदयाभोवती दुपदरी हृदयावरण असते. या हृदयावरणाच्या दोन थरांमध्ये एक द्रवपदार्थ असतो, त्यामुळे घर्षणापासून व धक्क्यांपासून हृदयाचे संरक्षण होते.
  • मानवी हृदय हा एक स्नायूमय, मांसल अवयव आहे. हृदय हे हृदयस्नायूंचे बनलेले असते. हृदय स्नायू अनैच्छिक असतात. त्यांचे आकुंचन व शिथिलीकरण एका निश्चित तालात होत असते. यालाच हृदयाचे स्पंदन म्हणतात.
  • कप्पे हृदयाचे आतील उभ्या पडद्यामुळे डावे व उजवे असे दोन भाग पडतात. या भागांचे परत दोन-दोन कप्पे पडतात. अशा प्रकारे हृदयाचे चार कप्पे असतात
  • हृदयाच्या वरच्या कप्प्यांना अलिंद तर खालील कप्प्यांना निलय असे म्हणतात.
┅━━━━━•❀•━━━━━┅

🏁  रक्तवाहिन्या - रचना व कार्ये: 
 हृदयाची स्पंदने सतत चालू असते. त्यामुळे रक्तवाहिन्यांत सतत रक्त फिरत राहते.
रक्‍तवाहिन्‍या प्रामुख्याने दोन प्रकारच्या आहेत.

🏀  रोहिणी/धमन्या: 
  1. व्याख्या : हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे रक्त नेणाऱ्या वाहिन्यांना धमन्या म्हणतात.
  2. धमन्या शरीरामध्ये खोलवर असतात. 
  3. फुप्फुसधमनी व्यतिरिक्त इतर सर्व धमन्या ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेतात. 
  4. धमन्यांची भित्तिका जाड असते.  
  5. धमन्यांच्या भित्तिकाच्या पोकळीमध्ये झडपा नसतात.
💧 नीला (शीरा): 
  1. व्याख्याशरीराच्या विविध भागांकडून हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या वाहिन्यांना नीला म्हणतात. 
  2. फुप्फुसशिरांव्यतिरिक्त उरलेल्या सर्व नीलांमधून विनाक्षजती (कार्बनडायऑक्साइड युक्त) रक्त वाहून नेले जाते. 
  3. बहुतेक नीला या त्वचेलगतच असतात. 
  4. शीरांची भित्तिका पातळ असते. 
  5. शीरांच्या पोकळीमध्ये झडपा असतात.
 
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

🎾  असे होऊन गेले:
  • 1628 साली विल्यम हार्वे या ब्रिटिश डॉक्टरने शरीरातील रक्ताभिसरण कसे होते याचे वर्णन केले.
  • आपले हृदय म्हणजे एक स्नायूमय पंप असून या पंपाद्वारे आपल्या शरीरात रक्ताभिसरण केले जाते, असा सिद्धान्त मांडला. 
  • कार्य: रक्तवाहिन्यांमधील झडपांचे काम कसे चालते हे हार्वे यांनी शोधून काढले.

⋐⋑🔸✧ 🔸⋐⋑

🏉  केशवाहिन्या (केशिका) (Capillaries)
धमन्या शरीरभर पसरताना त्यांना फाटे फुटतात त्यांचा व्यास लहान लहान होत जाऊन त्या केसासारख्या दिसतात त्यांना केशिका म्हणतात. 
रचना: केशिकांच्या भित्तिका अत्यंत बारीक, एकसरी आणि पातळ असतात. त्यामुळे केशिका आणि पेशी यांच्या दरम्यान पदार्थांची देवाणघेवाण सुलभ होते. या देवाणघेवाणीत रक्तातील ऑक्सिजन, अन्नघटक, संप्रेरके व जीवनसत्त्वे पेशींत मिळतात, तर पेशींतील टाकाऊ पदार्थ रक्तात येतात. 
केशिका एकमेकींना जोडल्या जाऊन जास्त व्यासाच्या वाहिन्या तयार होतात. त्यांनाच आपण शिरा म्हणतो. 
प्रत्येक अवयवांमध्ये केशवाहिन्यांचे जाळे पसरलेले असते.


✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤

💫  माहीत आहे का तुम्हांला?
  1. हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे 75 मिलिलीटर रक्त ढकलते.
  2. हृदयाचे ठोके पडत असताना दोन प्रकारचे आवाज येतात. यांतील एका आवाजाचे वर्णन ‘लब्ब’ तर दुसऱ्या आवाजाचे वर्णन ‘डब्ब’ असे करतात. 
  3. 💓 सामन्यपणे निरोगी मानवाच्या हृदयाचे दर मिनिटास 72 ठोके  पडतात. 
  4. व्यायाम वा काम केल्याने तसेच मनात निर्माण होणाऱ्या भावनांमुळे हृदयाचे ठोके वाढतात. तसेच माणूस आराम करत असताना वा झोपला असताना ते कमी होतात असे आढळून आले आहे.
  5. लहान बालकांच्या हृदयाच्या ठोक्यांची संख्या जास्त असते.
████╗
████║
████╝

🎤 हृदयातील रक्ताभिसरण / हृदयाचे कार्य
व्याख्याहृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचविण्याच्या णि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस ‘रक्ताभिसरण’ म्हणतात. 
रक्त सतत फिरते राहण्यासाठी हृदयाच्या आकुंचन आणि शिथिलीकरण या एकांतरीत क्रिया
घडत असतात. 
हृदयाचे लागोपाठचे एक आकुंचन व एक शिथिलीकरण मिळून हृदयाचा एक ठोका होतो.

━━═◆❃★❂★❃◆═━━

🎯  रक्त (Blood):
  • व्याख्यारक्त ही द्रायू संयोगी ऊती आहे. 
  • रक्त हा लाल रंगाचा एक प्रवाही पदार्थ आहे. 
  • ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग लाल भडक असतो आणि चव खारट असते.
  •  रक्ताचा सामू (pH) 7.4 असतो. 
  • रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते.
  1. रक्तद्रव (Plasma)  
  2. रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)
🎺  रक्तद्रव 
 रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. 
 रक्तद्रवात सुमारे 90 ते 92% पाणी, 6 ते 8% प्रथिने 1 ते 2 % असेंद्रिय क्षार व इतर घटक असतात.

🏈 अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.

🎻 ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.

👐 फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.

 असेंद्रिय आयने - कॅल्शिअम  (Ca), सोडिअम (Na), पोटॅशिअम(K) हे चेता आणि स्नायू कार्याचे नियंत्रण ठेवतात.

꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂

🐜  रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)

1. लोहित रक्तपेशी (RBC)
  1. रचना: आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी.
  2. रंगलोहित रक्तपेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते.
  3. संख्या: रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. 
  4. निर्मितीRBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते. 
  5. आयुष्य: लोहित रक्तपेशी सुमारे 100 ते127 दिवस जगतात.
  6. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो.

2. श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC)
  1. रचनाआकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त.
  2. रंग:रंगहीन पेशी.
  3. संख्यारक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात.
  4. निर्मिती पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते. 
  5. आयुष्यपांढऱ्या रक्त पेशी (WBC) साधारणपणे 13 ते 20  दिवस जगतात
  6. प्रकारया पेशींचे 5 प्रकार आहेत - बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील, मोनोसाईट्स, लिम्फोसाईट्स
  7. कार्य - पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.

3. रक्तपट्टीका (Platelets)
रचनारक्तपट्टीका या अतिशय लहान आणि तबकडीच्या कारासारख्या असतात
संख्यारक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्येया सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात.
कार्य रक्तपट्टीका या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

▓▓▓▓👐▓▓▓▓▓▓💓 ▓▓▓▓▓▓





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...