मुख्य सामग्रीवर वगळा

नोट्स, 8वी विज्ञान - 11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था.


नोट्स,  8वी  विज्ञान - 11. मानवी शरीर व इंद्रिय संस्था.

▓▓▓▓👏▓▓▓▓🎷▓▓▓▓▓💫▓▓▓▓


..•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•..

🚁  आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील 👇लिंकला स्पर्श करा.
              

꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂

🔭🔒📌🔎🔦🌷🌸

🍒  इंद्रिये व इंद्रिय संस्था कशापासून बनलेली असतात?

उत्तर: इंद्रिये आणि इंद्रिय संस्था ऊतीं (tissues) पासून बनलेल्या असतात. समान कार्य करणाऱ्या ऊती मिळून अवयव (organs) तयार करतात आणि अनेक अवयव एकत्रित येऊन इंद्रिय संस्था (organ system) तयार होते, जी विशिष्ट कामे एकत्रितपणे पार पाडते.

████╗

████║

████╝


🐘 मानवी शरीरामध्ये कोणकोणत्या इंद्रिय संस्था आहेत?

मानवी  शरीरात पचनसंस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, स्नायू संस्था अशा अनेक इंद्रिय संस्था कार्यरत असतात.

━━━━•❀•━━━

🐟 आपण गाढ झोपेत असताना शरीरामध्ये सुरू असलेली कार्ये कोणती?

उत्तर:  आपण गाढ झोपेत असतानाही आपल्या शरीरामध्ये अनेक महत्त्वाच्या क्रिया सुरू असतात जसे रक्ताभिसरण, श्वसन, पचन व वृक्काचे कार्य.

━━═◆❃★❂★❃◆═━━

🐢 आपल्या शरीरात कोणकोणत्या जीवनक्रिया सतत सुरू असतात?

उत्तर: श्वसन, रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन, चयापचय या जीवनक्रिया सतत सुरू असतात.

✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤

1. बहिःश्वसन / बाह्यश्वसन:

अ. श्वास घेणे - नाकावाटे हवा आत घेतली जाते, तेथून ती श्वासनलिकेद्‍वारा दोन्ही फुफ्फुसांत जाते.

ब. उच्छ्‌वास (श्वास सोडणे) - फुफ्फुसात घेतलेल्या हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो. रक्त शरीरातील COफुफ्फुसांकडे पोहोचवते व ती हवा उच्छ्‌वासावाटे बाहेर टाकली जाते. फुफ्फुसावाटे होणाऱ्या या दोन क्रियांना एकत्रितपणे बहिःश्वसन म्हणतात.

2. अंतःश्वसन : शरीरातील सर्व पेशी आणि रक्त यादरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन म्हणतात. रक्तातून पेशींमध्ये O2जातो व पेशींतून रक्तामध्ये CO2 येतो.

3. पेशीश्वसन: ऑक्सिजनमुळे पेशींतील ग्लूकोजसारख्या विद्राव्य घटकांचे मंदज्वलन होऊन ATP च्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर CO2 व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ तयार होतात. या क्रियेला पेशीश्वसन असे म्हणतात. खालील समीकरणाच्या साहाय्याने पेशीश्वसन प्रक्रिया सारांश रूपाने मांडतात.

C6H12O6+6O2  ------>  6CO2+ 6H2O + ऊर्जा (38 ATP)

⋐⋑🔸 ✧ 🔸⋐⋑

🐓अमीबा, गांडूळ, झुरळ, वनस्पती, विविध जलचर प्राणी व पक्षी हे कशाच्या साहाय्याने श्वसन करतात?उत्तर: अमिबा पेशी पडद्याद्वारे / आवरण (cell membrane), गांडूळ त्वचेद्वारे, झुरळ श्वासनलिकांद्वारे (tracheal system), वनस्पती- पर्ण रंध्रद्वारे आणि पक्षी फुफ्फुसांद्वारे श्वसन करतात.

┅━═▣◆★✧★◆▣═━┅

🐑 पेशीत अन्नघटकांचे ज्वलन होत असताना ध्वनी व प्रकाश निर्मिती होत असेल काय? 

उत्तर: नाही, पेशींमध्ये अन्न घटकांचे ज्वलन होत नाही, तर त्यांचे पेशीश्वसन (cellular respiration) होते, ज्याला 'मंद ज्वलन' असे म्हटले जाते.

❀꧁✧꧂❀

🐒 श्वसनसंस्थेमध्ये कोणकोणत्या इंद्रियांचा समावेश होतो?

उत्तर: श्वसन संस्थेमध्ये नाक, तोंड, घसा, व्हॉइस बॉक्स (स्वरयंत्र), श्वासनलिका, फुफ्फुसे आणि डायाफ्राम (मध्यपटल) या इंद्रियांचा समावेश होतो.

═◆✧°══✺══°✧◆═

💫 जेवताना बोलू नये. असे का ?

उत्तर:  जेवताना बोलल्याने अन्न चुकीच्या मार्गात म्हणजे श्वास नलिकेत जाण्याची शक्यता असते, ज्यामुळे ठसका लागणे, गुदमरण्याचा धोका निर्माण होतो.

✺༺☬༒☬༻✺

🌻 श्वसन संस्था (Respiratory system): रचना व कार्य

1. नाक (Nose): श्वसनक्रियेची व श्वसनसंस्थेची सुरुवात नाकापासून होते. नाकातील केसांच्या व चिकट पदार्थांच्या

साहाय्याने हवा गाळून आत घेतली जाते.

2. घसा (Pharynx): घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. श्वासनलिका अन्ननलिकेच्या पुढे असते.

श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस एक झाकण असते. अन्ननलिकेत अन्न जाताना या झाकणामुळे श्वासनलिका झाकली जाते. त्यामुळे श्वासनलिकेत बहुधा अन्नाचे कण शिरत नाहीत. इतर वेळी श्वासनलिका उघडी असते. यामुळे हवा घशातून श्वासनलिकेत जाते.

3. श्वासनलिका (Trachea): श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे व दुसरा डाव्या फुफ्फुसाकडे जातो.

4. फुप्फुसे (Lungs):  छातीच्या पोकळीत हृदयाच्या डाव्या व उजव्या बाजूस एकेक फुफ्फुस असते. छातीच्या पोकळीचा बराचसा भाग फुप्फुसांनी व्यापला असून हृदयाचा बराचसा पृष्ठभाग त्यांच्यामुळे झाकला जातो. प्रत्येक फुप्फुसावर दुपदरी आवरण असते. त्यास फुप्फुसावरण (Pleura) म्हणतात. फुप्फुसे स्पंजाप्रमाणे स्थितिस्थापक असतात. फुप्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात. त्यांना वायुकोश म्हणतात. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असते. तसेच केशवाहिन्यांचे आवरणही फार पातळ असते. या पातळ आवरणातून वायूची देवघेव सहज होऊ शकते. फुप्फुसात असंख्य वायुकोश असल्यामुळे वायूंच्या देवघेवीसाठी फार विस्तृत पृष्ठभाग उपलब्ध होतो.

फुप्फुसांमध्ये होणारी वायूंची देवघेव:  फुप्फुसातील वायुकोशांभोवती रक्त वाहत असताना वायूंची सतत देवघेव चालू असते. रक्तातील तांबड्या पेशी (RBC) मध्येहिमोग्लोबीन हे लोहयुक्त प्रथिन असते. वायुकोशात आलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबीन शोषून घेते. त्याचवेळी CO2 व जलबाष्प रक्तातून वायुकोशात जातात व तेथील हवेत मिसळतात. ऑक्सीजन रक्तात घेतला जातो. CO2 आणि जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन उच्छ्‌वासावाटे बाहेर टाकले जातात.

5. श्वासपटल (Diaphragm): बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल म्हणतात. श्वासपटल हे उदरपोकळी व छातीची पोकळी (उरोपोकळी) यांच्या दरम्यान असते. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे आणि श्वासपटल खाली जाणे, या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसांमध्ये जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो. त्यातील हवा नाकावाटे बाहेर ढकलली जाते. श्वासपटल सतत वर आणि खाली होण्याची हालचाल श्वासोच्छ्‌वास घडण्यासाठी गरजेची असते.

┏-─-━--─-━-⦀

 


                          ⦀━--─-━-─-┛





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...