मुख्य सामग्रीवर वगळा

8 वी विज्ञान, नोट्स, 10.2 पेशी व पेशीअंगके.

8 वी विज्ञान, नोट्स,  10.2 पेशी व पेशीअंगके.

┅━━━•❀•━━━┅

आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील 👇 लिंकला 🖇️ स्पर्श करा.
            


⋐⋑🔸 ❀ 🔸⋐⋑

━━═◆❃★❂★❃◆═━━

🎯आंतर्द्रव्यजालिका (Endoplasmic Reticulum)

  1. पेशीच्या आतमध्येविविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला आंतर्द्रव्यजालिका म्हणतात. 
  2. आंतर्द्रव्यजालिका म्हणजे तरल पदार्थांनी भरलेल्या सूक्ष्मनलिका व पट एकमेकांना जोडले जाऊन बनलेली जाळ्यासारखी रचना असते. 
  3. आंतर्द्रव्यजालिका आतील बाजूने केंद्रकाला तर बाहेरील बाजूने प्रद्रव्यपटलाला जोडलेली असते.
  4. पृष्ठभागावर रायबोझोम्सचे कण असतील तर तिला खडबडीत आंतर्द्रव्यजालिका म्हणतात. 

कार्ये   
1. पेशीला आधार देणारी चौकट.
2. प्रथिनांचे वहन करणे.
3. अन्न, हवा, पाणी यांमार्फत शरीरात आलेल्या विषारी पदार्थांना जलद्रावणीय करून शरीराबाहेर टाकणे.

✤⊰❉⊱═⊰❀⊱═⊰❉⊱✤

🎺 गॉल्गी काय (गॉल्गी संकुल) - Golgi Complex :
एकमेकांना समांतर रचलेल्या 5-8 चपट्या, पोकळ कोशांपासून गॉल्गी संकुल बनते. या कोशांना ‘कुंडे’
म्हणतात. 
कुंडांमध्ये विविध प्रकारची विकरे असतात.
आंतर्द्रव्यजालिकेकडून आलेली प्रथिने गोलीय पीटिकांमध्ये बंदिस्त होतात. 
पेशीद्रव्यामार्फत ह्या पीटिका गॉल्गी संकुलापर्यंत येतात, त्याच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पावून त्यांतील द्रव्य कुंडांमध्ये पाठवले जाते.
कार्ये
1. गॉल्गी संकुल हे पेशीतील ‘स्त्रावी अंगक’ आहे.
2. पेशीत संश्लेषित झालेल्या विकरे, प्रथिने, वर्णके इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून त्यांची विभागणी
करणे, त्यांना पेशीमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचविणे.
3. रिक्तिका व स्त्रावी पीटिका यांची निर्मिती करणे.
4. पेशीभित्तिका, प्रद्रव्यपटल व लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे.

🧿═ ❖• ✺ •❖ ═🧿

🎻  परिचय शास्त्रज्ञांचा कॅमिलिओ गॉल्गी
  1. कॅमिलिओ गॉल्गी या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम गॉल्गी संकुलाचे वर्णन केले.  
  2. ‘काळी अभिक्रिया’ हे रंजन तंत्र त्यांनी विकसित केले व ह्या तंत्राने त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला.
  3. ‘चेतासंस्थेची रचना’ या अभ्यासासाठी सँटियागो काजल या शास्त्रज्ञाबरोबर त्यांना 1906 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅

🏄 लयकारिका (Lysosomes)
पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे
लयकारिका.
 लयकारिका हे साधे एकपटलाने वेष्टित कोश असून त्यांमध्ये पाचक विकरे असतात. 

कार्ये
1. रोगप्रतिकार यंत्रणा - पेशीवर हल्ला करणाऱ्या जिवाणू व विषाणूंना नष्ट करते.
2. उद्ध्वस्त करणारे पथक - जीर्ण व कमजोर पेशीअंगके, कार्बनी कचरा हे टाकाऊ पदार्थ लयकारिकेमार्फत बाहेर टाकले जातात.
3. त्मघाती पिशव्या - पेशी जुनी किंवा खराब झाली की लयकारिका फुटतात व त्यातील विकरे स्वत:च्याच पेशीचे पचन करतात.
4. उपासमारीच्या काळात लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते.

❀꧁꧂❀


🏈  तंतुकणिका (Mitochondria)

  1.  पेशीला ऊर्जा पुरविण्याचे काम तंतुकणिका करतात. 
  2. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीखाली पाहिल्यास तंतुकणिका दुहेरी आवरणांची बनलेली दिसते.
  3. तंतुकणिकेचे बाह्य आवरण सच्छिद्र तर आतील आवरण घड्यांनी (शिखांनी) बनलेले असते.
  4. तंतुकणिकेच्या आतील पोकळीत असलेल्या जेलीसदृश द्रव्यात रायबोझोम्स, फॉस्फेट कण व डीऑक्सीरायबो न्युक्लिक आम्ल (DNA) रेणू असल्याने त्या प्रथिने संश्लेषित करू शकतात. 
  5. तंतुकणिका पेशींतील कर्बोदके व मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते व ह्या प्रक्रियेत मुक्त झालेली ऊर्जा ATP (ॲडेनोसाईन ट्राय फॉस्फेट) च्या रूपात साठवते. 
  6. प्राणीपेशीपेक्षा वनस्पतीपेशीत तंतुकणिकांची संख्या कमी असते.
कार्ये
1. ATP हे ऊर्जासमृद्ध संयुग तयार करणे.
2. ATP मधील ऊर्जा वापरून स्वतःसाठी प्रथिने, कर्बोदके, मेद यांचे संश्लेषण करणे.

══❖°•✺•°❖══

🏁  माहीत आहे का तुम्हांला?
लोहितरक्तकणिकेत तंतूकणिका नसतात. त्यामुळे त्या पेशी जो ऑक्सिजन वाहून नेतात, तो त्यांच्या स्वतःसाठी वापरला जात नाही.

☬°══✺══°☬
 
🏃 रिक्तिका (Vacuoles)

  • रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. 
  • पेशीच्या गरजेनुसार रिक्तिकेची रचना बदलत असते. 
  • रिक्तिकेचे पटल एकपदरी असते.
कार्ये
  1. पेशीतील घटकद्रव्याची साठवण करणारे पेशीअंगक म्हणजे रिक्तिका होय.
  2. पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे.
  3. चयापचय क्रियेत बनलेली उत्पादिते (ग्लायकोजेन, प्रथिने, पाणी) साठवणे.
  4.  प्राणीपेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमिबाच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जाते.
  5.  वनस्पतीपेशीतील रिक्तिका पेशीद्रवाने भरलेल्या असून त्या पेशीला ताठरता व दृढता देतात.
✺❖• ✺ •❖✺

🏀 लवके (Plastids) :
 वनस्पतीच्या पानांना हिरवा रंग, तर फुलांना लाल, पिवळा, केशरी, निळा असे अनेक रंग असतात. असे रंग देणारे एक अंगक फक्त वनस्पतीपेशींत आढळते, ते म्हणजे लवक. 
लवके ही द्विपटलयुक्त असून दोन प्रकारांची असतात.

..•♡•.:•♡•.🧿.•♡•.:•♡•...


वनस्पतीच्या भागाचा रंग                         रंगद्रव्य

  1. हिरवा (उदा. पाने)                    a. हरितद्रव्य (क्लोरोफिल)
  2. लाल (उदा. गाजर)                   b. कॅरोटीन
  3. पिवळा                                    c. झॅन्थोफिल
  4. जांभळा, निळा                        d.ॲन्थोसायनिन
  5. गडद गुलबक्षी (उदा. बीट)       e. बिटालीन्स
1. अवर्णलवके (पांढरी/रंगहीन लवके/Leucoplasts)
2. वर्णलवके (रंगीत लवके/Chromoplasts)
हरितलवके ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकांत रूपांतरित होऊ शकतात. 
उदा. हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते तर लायकोपीन (Lycopene) तयार झाल्याने लाल रंग येतो.


████╗
████║
████╝

🎾  हरितलवक (Chloroplast)

वनस्पतींच्या पानांत चालणाऱ्या प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेसाठी हरितलवके फार महत्त्वाची आहेत. हरितलवके सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात.
हरितलवकाच्या पिठिकेमध्ये प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक विकरे, DNA , रायबोझोम्स व पिष्टमय पदार्थ
असतात.

लवकांची कार्ये
1. हरितलवके सौर ऊर्जा शोषून तिचे रासायनिक ऊर्जेत म्हणजे अन्नात रूपांतर करतात.
2. वर्णलवकांमुळे फुले व फळे यांना रंग प्राप्त होतो.
3. अवर्णलवके ही पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनांचे संश्लेषण व साठवण करतात.

꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂

  • तंतूकणिका व लवके यांमध्ये DNA व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वत:ची प्रथिने तसेच तयार करू शकतात.
  • विकसित पेशींना दृश्यकेंद्रकी पेशी म्हणतात. 
  • जिवाणूंच्या  पेशी आदिकेंद्रकी  पेशी असतात.
▓▓▓▓▓▓▓▓🙏▓▓▓▓▓▓▓▓▓

कार्य संस्थाचे :
 राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र (National Centre for cell Science -NCCS) ही भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागा अंर्तगत कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे कार्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असून पेशीजीव विज्ञानामध्ये संशोधन करते, राष्ट्रीय प्राणी पेशी भांडारासाठी सेवा देण्याचे प्रमुख कार्य करते तसेच कॅन्सरसारख्या रोगावर सुद्धा उपचाराबाबतचे संशोधन कार्य करत आहे.

╚─━━━━━━░★░━━━━━━─╝

फरक
दृश्यकेंद्रकी पेशी व आदिकेंद्रकी पेशी यामधील फरक मुद्द्यांच्या रूपात आपण पाहणार आहोत.
 पण लिहीत असताना फरक एकमेकांसमोरच लिहावा.
                         
· आकार - 5-100 मायक्रोमीटर 
 1-10 मायक्रोमीटर         
· गुणसूत्र संख्या - एकापेक्षा जास्त  
गुणसूत्र संख्या - एकच       
· केंद्रक - केंद्रकपटल, केंद्रकी व केंद्रकद्रव्य असलेले सुस्पष्ट केंद्रक असते.
केंद्रकसदृश केंद्रकाभ असतो.    
· तंतूकणिका, लवके - असतात.      
आवरणयुक्त अंगके नसतात.
· उदाहरणे - उच्चविकसित एकपेशीय व बहुपेशीय वनस्पती व प्राणी यांमध्ये आढळतात.
उदाहरण - जीवाणू.

╭──────╯❤‍🩹╰──────╮

सुलभाः पुरुषाः राजन् सततं प्रियवादिनः । अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः।।
 
तात्पर्य : हे राजा, गोड बोलणारे लोक सहज सापडतात, पण अप्रिय आणि हितकारक बोलणारे लोक सापडणे कठीण आहे.

- __[♡🤞🏻♡]__  -









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

10 वी बोर्ड निकाल आज 🎷

 10 वी बोर्ड निकाल आज 🎷 ®®®💠®®® व्हॉट्स ॲप ग्रुप आता सामील व्हा   ▬▬▬۩۞۩▬▬▬ इयत्ता 10 वीच्या परीक्षेच्या निकालाची (10th examination results)वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली 👏. 10 वीचा निकाल येत्या मंगळवारी म्हणजे दि.13 मे रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल दुपारी 1 वाजता पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार.🎺 विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण या निकालातून त्यांना पाहता येतील. राज्यातील 23,492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी 10 वी बोर्ड परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विद्यार्थी 'महा एचएससी बोर्ड डॉट इन' (mahahsscboard.in) या संकेतस्थळासह विविध वेबसाईटवर निकाल पाहू शकतील.  ®®®💠®®® 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ.👇   https://sscresult.mahahsscboard.in   https://results.digilocker.gov.in   https://www.aajtak.in/education/board-exam-resul   http://sscresult.mkcl.org   https://results.targetpublications.org   https://results.navneet.com   http...

दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025

 दहावी बोर्ड (SSC) वेळापत्रक 2025 प्रथम सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना वर्ष 2024-25 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🎆🎇🎷. विद्यार्थ्यांसाठी टर्निंग पॉईंट असणारे, ज्यातून आयुष्य पुढे घडणार असते त्या इयत्ता दहावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश,   आयटीआय व पॉलिटेक्निक साठी ऍडमिशन प्रक्रिया वेळेवर सुरू व्हावी, यामधील ताळमेळ  करण्यासाठी बोर्डाने परीक्षा दरवर्षीपेक्षा अंदाज 15 दिवस अगोदर घेण्याचे ठरवले आहे. त्याचबरोबर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा या पण लवकर होणार आहेत याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. परीक्षांच्या तारखे प्रमाणे विषयांच्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे. ______________________ विषय: मराठी. 21 फेब्रुवारी 2025 - शुक्रवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय:- संस्कृत 27 फेब्रुवारी 2025 - गुरुवार वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: इंग्रजी 1 मार्च 2025 - शनिवार  वेळ:- 11.00 am ते 2.00 pm. ______________________ विषय: हिंदी 3 मार्च 2025 - सो...

11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷

  11 वी केंद्रीय प्रवेश नोंदणी 2025-26 🎷 🎷 11th Admission Registration  ●~•❅•۞•❅•~● इयत्ता अकरावी साठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया  ऍडमिशन 19- 05 -2025 पासून सुरू. भाग 1 कसा भरावा   Part 1 Fill Up Guidene संपूर्ण महाराष्ट्र मध्ये यावर्षी सन 2025 पासून 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया.  ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्र मध्ये तसेच महाराष्ट्रामधील सर्व कॉलेजमध्ये लागू होणार.   यावर्षी आपल्याला 11 वीला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे असेल तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे ऍडमिशन घ्यावे लागणार ┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━.  रजिस्ट्रेशन कसे करावे  11 वी प्रवेशाच्या Website वर जाणे✈️  visit 11 th admission website   मोबाईल 📱 वरून जर रजिस्ट्रेशन करणार असाल तर.....  क्रोम वर जाऊन तीन डॉट स्पर्श करावा व डेस्कटॉप निवडावे. ▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬ स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठी सर्वप्रथम खालील लिंक वर स्पर्श करा. https://mahafyjcadmissions.in/ {[( टिप :- मागील वर्षीपर्यंत विद्यार्थी https://11thadmission.org.in/ या वेबसाईट वर रजिस्ट्रेशन करत होते. आता व...