8 वी विज्ञान, नोट्स, 10.1 पेशी व पेशीअंगके.
┅━━━•❀•━━━┅
- विज्ञान विषयाच्या माहितीसाठी,
- स्पर्धा परीक्षेसाठी,
- NMMSपरीक्षेच्या तयारीसाठी, व
- मूळ ज्ञान वाढवण्यासाठी आपल्या ग्रुपला सामील व्हावे.
🧿═ ❖• ✺ •❖ ═🧿
1. सजीवांमध्ये किती प्रकारच्या पेशी आढळतात?
उत्तर: सजीवांमध्ये दोन प्रकारच्या पेशी आढळतात दृश्यकेंद्रकी व आदिकेंद्रकी.
वनस्पती पेशी व प्राणी पेशी असे पेशींचे दोन प्रकार करता येतात.
2. पेशींचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपकरण वापरले होते ? का ?
उत्तर: पेशी या अत्यंत लहान असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकांचा उपयोग करावा लागतो.
❀꧁꧂❀
प्राणी पेशी
- पेशीपटल असते.
- पेशीभित्तिका नसते.
- लयकारिका असतात.
- हरितलवके नसतात.
- अंतर्द्रव्यजालिका असते.
- रिक्तिका लहान लहान असून संख्येने अनेक असतात.
- गॉल्गीसंकुल असते.
- तंतुकणिका असते.
- पेशीपटल असते.
- पेशीभित्तिका असते.
- लयकारिका नसतात.
- हरितलवके असतात.
- अंतर्द्रव्यजालिका असते.
- रिक्तिका मध्यभागात एकच मोठी रितिका असते.
- गॉल्गीसंकुल असते.
- तंतुकणिका असते.
✺❖• ✺ •❖✺
━━═◆❃★❂★❃◆═━━
✤⊰❉⊱═⊰❀⊱═⊰❉⊱✤
⋐⋑🔸 ❀ 🔸⋐⋑
अ. समपरासारी (Isotonic) द्रावण : पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हींतील पाण्याचे प्रमाण सारखे असते. त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही.
ब. अवपरासारी (Hypotonic) द्रावण : पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. याला अंतःपरासण (Endosomis) म्हणतात.
उदा. बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात.
क. अतिपरासारी (Hypertonic) द्रावण : पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे
प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते.
उदा. फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडींतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात.
अतिपरासरी द्रावणात ठेवल्याने प्राणीपेशी किंवा वनस्पतीपेशीतील पाणी बहिःपरासरण (Exosmosis) प्रक्रियेमुळे बाहेर पडते आणि पेशीद्रव्य आकसते. ह्या क्रियेला रससंकोच (Plasmolysis) म्हणतात.
☬°══✺══°☬
🎺 पेशीद्रव्य :
- प्रद्रव्यपटल व केंद्रक यांमधील तरल पदार्थाला पेशीद्रव्य म्हणतात.
- पेशीद्रव्य हा चिकट पदार्थ असून तो सतत हालचाल करीत असतो.
- पेशीद्रव्यत अनेक पेशीअंगके विखुरलेली असतात.
- पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी पेशीद्रव्य हे माध्यम आहे.
- पेशीअंगकांव्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजे पेशीद्रव्य (Cytosol).
- पेशीद्रवात अमिनो आम्ले, ग्लुकोज, जीवनसत्त्वे साठवलेली असतात.
- मोठ्या केंद्रीय रिक्तिकेमुळे वनस्पतीपेशीत पेशीद्रव्य कडेला सारलेले असते.
- वनस्पतीपेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणीपेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व दाट असते.
00:01●━━━━━━━━━● 00:21
🎾 पेशी अंगके (Cell organelles) ः
- विशिष्ट कार्य करणारे पेशीतील उपघटक म्हणजे पेशीअंगके होत.
- पेशीअंगके म्हणजे ‘पेशीचे अवयव’ आहेत.
- प्रत्येक अंगकाभोवती मेदप्रथिनयुक्त पटल असते.
- केंद्रक व हरितलवक यांव्यतिरिक्त इतर सर्व अंगके ही इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीनेच पाहता येतात.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
🎷 केंद्रक (Nucleus)
- इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीने पाहिल्यास केंद्रकाभोवती दुहेरी आवरण व त्यावर केंद्रकी छिद्रे दिसतात.
- केंद्रकाच्या आतबाहेर होणारे पदार्थांचे वहन या छिद्रांमधून होते.
- केंद्रकामध्ये एक गोलाकार केंद्रकी (Nucleolus) असते व रंगसूत्रांचे जाळे असते.
- रंगसूत्रे ही पातळ दोऱ्यांसारखी असून पेशीविभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये होते.
- गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना जनुके (Genes) म्हणतात.
कार्ये
- पेशींच्या सर्व चयापचय क्रिया व पेशीविभाजन यांवर नियंत्रण ठेवणे.
- जनुकांद्वारे आनुवंशिक गुणांचे संक्रमण पुढील पिढीकडे करणे.
⇆ㅤㅤ◁ㅤㅤ❚ ❚ㅤㅤ▷ㅤㅤ↻
🏈 माहीत आहे का तुम्हांला?
रक्तातील लोहितरक्तकणिकांमधील (RBC) केंद्रक नष्ट झाल्याने हिमोग्लोबीनसाठी अधिक जागा उपलब्ध होते
व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो.
वनस्पतींच्या रसवाहिन्यांतील चाळणी नलिकांमधील केंद्रक नष्ट झाल्याने त्या पोकळ होतात व अन्नपदार्थांचे
वहन सोपे होते.
‷[🌎][🎷][👀][🏈]_[💭]‴
"काक चेष्टा, बको ध्यानं, श्वान निद्रा तथैव च। अल्पाहार गृहत्यागी, विद्यार्थी पंच लक्षणं।।
" या श्लोकाचा अर्थ असा आहे की,
एका आदर्श विद्यार्थ्यामध्ये पाच लक्षणे असावी लागतात:
कावळ्याप्रमाणे चिकाटीने प्रयत्न करणे,
बगळ्याप्रमाणे ध्यानासारखी एकाग्रता ठेवणे,
कुत्र्याप्रमाणे झोपेतही सतर्क राहणे,
कमी खाणे (अल्पाहार) आणि
आपले घर व त्यातील चिंता सोडून शिक्षणासाठी दूर राहणे (गृहत्यागी).
❚ ❚✺❖• ✺ •❖✺❚ ❚



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा