स्वाध्याय- 8वी -विज्ञान. 10. पेशी व पेशीअंगके
┅━━━•❀•━━━┅
आपल्या विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील👇 लिंकला🖇️ स्पर्श करावा
🧿═ ❖• ✺ •❖ ═🧿
━━═◆❃★❂★❃◆═━━
1. ........ ही वर्णलवके असून इतर प्रकारच्या वर्णलवकांत रूपांतरित होऊ शकतात.
2. गॉल्गी काय कार्ये लिहा.
3. पेशीअंगकांव्यतिरिक्त असलेला पेशीतील भाग म्हणजे ..... .
4. समस्थिती- व्याख्या लिहा.
5. कालांतराने आवश्यकतेनुसार कोणती बहुवारिके पेशीभित्तिकेत तयार होतात?
6. पृष्ठभागावर ............ चे कण असतील तर तिला खडबडीत आंतर्द्रव्यजालिका म्हणतात.
7. हरितलवकांची कार्ये लिहा.
8. दृश्यकेंद्रकी पेशी व आदिकेंद्रकी पेशी यामधील फरक लिहा.
10. लयकारिका कार्ये लिहा.
11. विसरण - व्याख्या लिहा.
12. ........ म्हणजे पेशीपटलाभोवती असणारे मजबूत व लवचिक आवरण.
13. समपरासारी द्रावण - व्याख्या लिहा.
14. ‘काळी अभिक्रिया’ हे रंजन तंत्र ........ ...... यांनी विकसित केले व ह्या तंत्राने त्यांनी चेतासंस्थेचा सखोल अभ्यास केला.
15. पेशीच्या आतमध्येविविध पदार्थांचे वहन करणाऱ्या अंगकाला ....... म्हणतात.
16. अचूक शब्द लिहा.
वनस्पतीच्या भागाचा रंग रंगद्रव्य
- हिरवा (उदा. पाने)
- लाल (उदा. गाजर)
- पिवळा
- जांभळा, निळा
- गडद गुलबक्षी (उदा. बीट)
17. तंतूकणिका व लवके यांमध्ये DNA व रायबोझोम्स असल्याने ही अंगके स्वत:ची ....... तसेच तयार करू शकतात.
18. पेशीला ऊर्जा पुरविण्याचे काम ....... करतात.
19. रक्तातील लोहितरक्तकणिकांमधील (RBC) केंद्रक नष्ट झाल्याने .......... साठी अधिक जागा उपलब्ध होते.
व जास्त ऑक्सिजन वाहून नेला जातो.
20. लयकारिकांना आत्मघाती पिशव्या का म्हणतात?
21. पेशीद्रवात साठवलेले पदार्थ कोणते?
22. पेशीय भक्षण - व्याख्या लिहा.
23. सजीवांमध्येकिती प्रकारच्या पेशी आढळतात?
24. पेशीतील घटकद्रव्याची साठवण करणारे पेशीअंगक म्हणजे ....... होय.
25. पेशीत घडणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांची विल्हेवाट लावणारी संस्था म्हणजे ...... .
26. आंतर्द्रव्यजालिका कार्ये लिहा.
27. हिरवे कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते तर ....... तयार झाल्याने लाल रंग येतो.
28. रिक्तिका कार्ये लिहा.
29. उपासमारीच्या काळात ........ पेशीत साठविलेल्या प्रथिने व मेद यांचे पाचन करते.
30. वनस्पतीपेशीतील पेशीद्रव्यापेक्षा प्राणीपेशीतील पेशीद्रव्य हे अधिक कणयुक्त व ...... असते.
31. पेशी उत्सर्जन - व्याख्या लिहा.
32. अवपरासारी द्रावण - व्याख्या लिहा.
33. पेशींचे निरीक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपकरण वापरले होते ?
34. ....... हे साधे एकपटलाने वेष्टित कोश असून त्यांमध्ये पाचक विकरे असतात.
35. ........ ही पातळ दोऱ्यांसारखी असून पेशीविभाजनाच्या वेळी त्यांचे रूपांतर गुणसूत्रांमध्ये
होते.
36. प्राणीपेशीपेक्षा वनस्पतीपेशीत तंतुकणिकांची संख्या ..... असते.
37. पेशीभित्तिका मूलत: सेल्युलोज व ...... ह्या कर्बोदकांपासून बनलेली असते.
38. जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे ......... .
39. पेशी अंगकांची चार नावे लिहा.
40. नामनिर्देशित आकृती काढा, तंतुकणिका.
41. ........ सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात.
42. प्राणी पेशी नामनिर्देशित आकृती काढा.
43. अतिपरासारी द्रावण - व्याख्या लिहा.
44. केंद्रकाचे कार्ये लिहा.
45. हरितलवक नामनिर्देशित आकृती काढा.
46. वनस्पती पेशी व प्राणी पेशी फरक लिहा.
47. गुणसूत्रांवरील कार्यात्मक घटकांना ....... म्हणतात.
48. माझा रंग कोणामुळे ? अचूक पर्याय लिहा.
अ. लाल टोमॅटो 1. ......
आ. िहरवे पान 2. ......
इ. गाजर 3. ......
ई. जांभूळ 4. .......
49. तर काय झाले असते?
अ. लोहितरक्तकणिकेत तंतुकणिका असत्या.
आ. तंतुकणिका व लवके यांमध्ये फरक नसता.
इ. गुणसूत्रांवर जनुके नसती.
ई. पारपटल निवडक्षम नसते.
उ. वनस्पतीत ॲन्थोसायानिन नसते.
50. मला ओळखा
अ. ATP तयार करण्याचा कारखाना आहे.
आ. एकपदरी आहे, पण पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतो.
इ. पेशीला आधार देतो पण मी पेशीभित्तिका नाही. माझे शरीर तर जाळीसारखे आहे.
ई. पेशींचा जणू रसायन कारखाना.
उ. माझ्यामुळे तर आहेत पाने हिरवी.
51. वनस्पती पेशी नामनिर्देशित आकृती काढा.
52. पेशीभित्तिका कार्ये लिहा.
✤⊰❉⊱═⊰❀⊱═⊰❉⊱✤
विद्वानेवोपदेष्टव्यो नाविद्वांस्तु कदाचन ।
वानरानुपदिश्याथ स्थानभ्रष्टा ययुः खगाः ॥
सल्ला नेहमी जाणकार व्यक्तीलाच द्यावा,
मूर्खाला कधीही देऊ नये.
कारण माकडांना (मूर्खांना) सल्ला दिल्याने
पक्ष्यांनी आपले घर गमावले.
हा श्लोक शिकवतो की सल्ला देण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे महत्त्वाचे आहे. लायक नसलेल्या व्यक्तीला सल्ला दिल्याने चांगले परिणाम मिळत नाहीत, उलट नुकसान होऊ शकते.
⋐⋑🔸 ❀ 🔸⋐⋑

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा