8 वी वीज्ञान, 7. धातू-अधातू, नोट्स.
━━═◆❃★❂★❃◆═━━.
*✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤*
विज्ञान विषयाच्या माहितीसाठी खालील लिंकला 🖇️ स्पर्श करा
⏤͟͟͞͞❅ *⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞❅⏤͟͟͞͞⏤͟͟͞͞❅ *⏤͟͟͞͞❅*⏤͟͟͞͞❅⏤͟͟͞͞
🚦 सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या तीन प्रकारांत करतात?
उत्तर: सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू, अधातू, आणि धातुसदृश (धातुसदृश्य) या तीन प्रकारांत केले जाते.
..•♡•..•♡•.🦅.•♡•.:•♡•.
💫 दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो?
- दैनंदिन जीवनात आपण लोखंड, तांबे, सोने, चांदी, ॲल्युमिनियम या धातूंचा वापर करतोत.
- दैनंदिन जीवनात कार्बन (इंधनामध्ये), ऑक्सिजन (श्वसनासाठी), नायट्रोजन (खते व स्फोटकांसाठी), क्लोरीन (पाणी शुद्धीकरणासाठी), आणि आयोडीन (मीठामध्ये) यांसारख्या अनेक अधातूंचा वापर होतो.
▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬
खाली मुद्द्याच्या रुपात धातू अधातूचे गुणधर्म दिले आहेत. त्याचबरोबर या मुद्द्यांचा वापर आपण फरक करण्यासाठी पण करू शकतो.
- सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत राहतात.
- सर्वसामान्य तापमानाला अधातू स्थायू, द्रव व वायुरूपात आढळतात.
- धातूंना तेज (चकाकी) असते. धातू तेजस्वी दिसतो.
- अधातूंना चकाकी नसते.
- सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात.
- स्थायुरूप अधातू ठिसूळ असतात. काही अधातू मऊ असतात.
- धातूंना ठोकून त्यांचा पातळ पत्रा तयार करता येतो या गुणधर्माला धातूची वर्धनीयता म्हणतात.
- अधातू वर्धनीय नसतात.
- छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते. या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात.
- अधातू तंतुक्षम नसतात.
- धातू उष्णतेचे सुवाहक असतात.
- अधातू उष्णतेचे दुर्वाहक असतात.
- धातू विजेचे सुवाहक असतात.
- अधातू विजेचे दुर्वाहक असतात.
- धातूंची घनता जास्त असते.
- अधातूची घनता कमी असते.
- सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक जास्त असतात.
- अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात.
- धातू नादमय असतात, म्हणजे धातूवर आघात झाल्यावर ते ध्वनी निर्माण करतात.
- अधातू नादमय नसतात,
- बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे तीन पर्यंत असते.
- बहुसंख्य अधातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते.
- धातूंमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन, धन-आयन म्हणजेच ‘कॅटायन’ निर्माण करण्याची प्रवृत्ती असते.
- अधातूंमध्ये त्यांच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारी आयन, ऋण- आयन म्हणजेच ‘ॲनायन’ निर्माण करण्याची प्रवृत्ती असते.
- धातूंची ऑक्साइडे आम्लारीधर्मी असतात.
- अधातूंची ऑक्साइडे ही आम्लधर्मी असतात.
- बहुतेक धातूंची विरल आम्लांबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात व हायड्रोजन वायू बाहेर पडतो.
- अधातूंची विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही.
- काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, काहींची गरम पाण्यासोबत, तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होते व हायड्रोजन वायूची निर्मिती होते.
- अधातूंची पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होत नाही.
▓▓▓▓🌟▓▓▓▓
☂️. धातुसदृश (Metalloids) :
- धातुसदृश्य या मूलद्रव्यांमध्ये धातू आणि अधातू या दोघांचेही गुणधर्म आढळतात. किंवा
- काही मूलद्रव्यांना धातू आणि अधातू यांच्या दरम्यानचे गुणधर्म असतात. अशा मूलद्रव्यांना धातुसदृश असे म्हणतात.
उदा. आर्सेनिक (As), सिलिकॉन (Si), जर्मेनिअम (Ge), अँटिमनी (Sb)
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
🚀 राजधातू (Noble Metal) :
- राजधातू निसर्गात मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात.
- राजधातूवर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही.
- राजधातूची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही.
उदा. सोने (Au), चांदी (Ag), प्लॅटिनम (Pt), पॅलेडिअम (Pd) व ऱ्होडिअम (Rh) यांसारखे काही धातू राजधातू आहेत. ते त्यांची क्षरण व ऑक्सिडीकरण अभिक्रिया ही कक्ष तापमानाला होत नाही.
राजधातूंचे उपयोग :
1. सोने, चांदी व प्लॅटिनम यांचा वापर मुख्यत: अलंकार बनवण्यासाठी होतो.
2. चांदीचा उपयोग औषधीमध्ये होतो. (Antibacterial property)
3. सोन्या चांदीची पदकेही तयार करतात.
4. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणात चांदी, सोने ह्यांचा उपयोग होतो.
5. प्लॅटिनम, पॅलेडिअम या धातूंचा उपयोग उत्प्रेरक (Catalyst) म्हणून सुद्धा होतो.
- 100 टक्के शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने.
- शुद्ध सोने मऊ असते.
🎷 सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी कमी कॅरेटचे सोने वापरतात.
उत्तर:
शुद्ध सोने मऊ असते.
शुद्ध सोने मऊ असल्यामुळे शुद्ध सोन्याने तयार केलेले दागिने दाबामुळे वाकतात किंवा तुटतात.
म्हणून त्यात सोनार तांबे (Cu) किंवा चांदी (Ag) विशिष्ट प्रमाणात मिसळतात.
म्हणून सोन्याचे दागिने तयार करण्यासाठी कमी कॅरेट चे किंवा 22 कॅरेट चे सोने वापरतात.
☕░━━━━━━━━─╗
क्षरण (Corrosion) :
╚─━━━━━━━━░
व्याख्या:- धातूंवर ओलाव्यामुळे हवेतील वायूंची प्रक्रिया होऊन धातूंची संयुगे तयार होतात. या प्रक्रियेमुळे धातूंवर परिणाम होऊन ते झिजतात. यालाच क्षरण असे म्हणतात.
उदा.
- लोखंडावर ऑक्सिजन वायूची अभिक्रिया होऊन तांबूस रंगाचा लेप तयार होतो.
- तांब्यावर कार्बन डायऑक्साइड वायूची अभिक्रिया होऊन हिरवट रंगाचा लेप तयार होतो.
- चांदीवर हायड्रोजन सल्फाइड वायूची अभिक्रिया होऊन काळ्या रंगाचा लेप तयार होतो.
- धातूंचे क्षरण होऊ नये म्हणून त्यांच्यावर तेल, ग्रीस, वारनिश, व रंगाचे थर दिले जाते.
- क्रियाशील धातूंवर दुसऱ्या न गंजणाऱ्या धातूचा मुलामा दिला जातो. लोखंडावर जस्ताचा मुलामा देऊन लोखंडाचे क्षरण थांबवता येते, यास गॅल्वनायझेशन असे म्हणतात..
🛞 संमिश्रे(Alloy) :
दोन किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव (समांगी) मिश्रणाला संमिश्र असे म्हणतात. आवश्यकतेनुसार घटक मूलद्रव्ये विविध प्रमाणात मिसळून विविध संमिश्रे तयार करता येतात.
उदा.
- घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड व कार्बन, क्रोमिअम, निकेल यांपासून बनलेले संमिश्र आहे.
- पितळ हे संमिश्र तांबे (Cu) व जस्त (Zn) यांपासून बनवतात.
- कांस्य हे संमिश्र तांबे (Cu) व कथिल (Sn) यांच्यापासून बनवतात.
🎺 कुतुबमिनार
दिल्लीत कुतुबमिनार परिसरात सुमारे 1500 वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला एक लोहस्तंभ आहे. इतकी वर्षे होऊनही तो स्तंभ आजही चकचकीत आहे. कारण आपल्या पूर्वजांनी तो संमिश्रापासून तयार केला आहे. त्या लोहामध्ये अत्यल्प प्रमाणात कार्बन (C), सिलीकॉन (Si), फॉस्फरस (P) मिसळले आहे.
*❀꧁❀꧂❀*
🌼 स्टेनलेस स्टील भांड्यांना उभ्या चिरा का पडतात?
स्वस्त किंमतीचे स्टेनलेस स्टील बनवताना कधीकधी महाग निकेल (Ni) ऐवजी तांब्याचा (Cu) वापर करतात.
*⋐⋑🔸 ✧ 🔸⋐⋑*
🪅 खाली गंजणे याची क्रिया दिली आहे. या क्रियेत तीनही परीक्षानळ्यांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
अ. परीक्षानळी 2 मधील खिळ्यावर गंज का चढला नाही?
उत्तर:-
- तेलाखाली उकळलेले पाणी असल्यामुळे त्यात हवा किंवा इतर कोणतेही वायू नाहीत.
- तेलामुळे हवेचा संपर्क तुटतो त्यामुळे लोखंडी खिळ्याचे ऑक्सिडीकरण होत नाही.
आ. परीक्षानळी 1 मधील खिळ्यावर खूप गंज का चढला असेल?
उत्तर
पाणी व हवेच्या संपर्कात लोखंडी खिळा आल्यामुळे परीक्षानळी 1 मधील खेळायला गंज चढलेला दिसून येतो.
इ. परीक्षानळी 3 मधील खिळ्यावर गंज चढेल का?
उत्तर:-
- कॅल्शियम ऑक्साईड (CaO) या पदार्थामुळे परीक्षा नळितील ओलावा, दमटपणा शोषून घेतला जातो.
- शुष्क कोरड्या हवेत खिळ्यावर गंज चढत नाही.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा