10 वी, 12 वी 2026 परीक्षांच्या तारखा. 🪗
प्रथम सर्व 10 वी व 12 वी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा 🪕.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने
- पुणे,
- नागपूर,
- छ. संभाजीनगर,
- मुंबई,
- कोल्हापूर,
- अमरावती,
- नाशिक,
- लातूर व
- कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत आगामी फेब्रुवारी-मार्च 2026 मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेच्या लेखी, प्रात्यक्षिक व इतर परीक्षा पुढील तारखांना आयोजित करण्यात येणार आहेत.
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
🪗 12 वीच्या लेखी परीक्षा
10 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान.
🎷. प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन
शुकवार, दि. 23 जानेवारी 2026 ते सोमवार, 09 फेब्रुवारी 2026
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
✍️ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा कालावधी
- लेखी परीक्षा:
शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, दि. 18 मार्च 2026
- प्रात्याक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन:-
सोमवार, दि. 02 फेब्रुवारी 2026 ते बुधवार, दि. 18 फेब्रुवारी 2026
*✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤*
शाळा / कनिष्ठ महाविद्यालय व विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याचे हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याचे दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2026 परीक्षेच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षेच्या तारखा वरीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहेत. गेल्या वर्षीही 10 वी, 12 वी परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांची यावर्षी तशी मानसिक तयारी होतीच.
*⋐⋑🔸✧🔸⋐⋑*
परीक्षेसाठी उपलब्ध वेळ 👏🪕
- 12 वी परीक्षा:- 3 महिने 27 दिवसावर.
- 10 वी परीक्षा:- 4 महिने 7 दिवसांवर.
विषयाच्या काठीण्य पातळीनुसार व आपल्या अभ्यासाच्या नियोजनानुसार या दिवसांची योग्य विभागणी करून अभ्यास केल्यास यश गाठता येईल.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
उपरोक्त परीक्षांचे विषयनिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
*❀꧁꧂❀*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा