स्वाध्याय-10 विज्ञान भाग 1, 6. प्रकाशाचे अपवर्तन
✺༺☬༒☬༻✺
माहिती विज्ञानाची या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील लिंकला स्पर्श करा.
████╗
████║
████╝
1. जांभळ्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात कमी म्हणजे ...... nm च्या जवळ असते.
2. हवेचा अपवर्तनांक- व्याख्या लिहा
3. व्याख्या लिहा- प्रकाशाचे अपवर्तन
4. होळीच्या वेळी होळीच्या ज्वालांच्या पलीकडील काही वस्तू हलताना तुम्ही पाहिलं, असे का घडत असेल?
5. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.33 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती ?
(प्रकाशाचा निर्वातातील वेग 3 x10
8 m/s)
6. ..... हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन या तीनही घटनांचा एकत्रित परिणाम आहे.
7. ....... यांनी सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळविण्यासाठी काचेच्या लोलकाचा (Prism) उपयोग केला.
8. अपवर्तनाचे नियम लिहा.
9. जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो ....... कडे झुकतो.
10 आपले डोळे ज्या प्रारणांना संवेदनशील आहेत त्या प्रकाशाची तरंग लांबी ..... nm ते ...... nm च्या दरम्यान असते.
11. व्याख्या लिहा- पूर्ण आंतरिक परावर्तन.
12. जर एका माध्यमातून 1.5 x 10 8m/s वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास व त्याचा वेग
0.25 x 10 8 m/s होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल?
13. जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपाती असतो तेव्हा वेगवेगळे रंग वेगवेगळ्या कोनातून वळतात. या सात
रंगापैकी ....... रंग सर्वाधिक वळतो.
14. प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर .......आपात होत
असल्यास त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही.
15. प्रकाश परावर्तनाचे नियम कोणते?
16. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. चूक की बरोबर ते लिहा.
17. तांबड्या किरणांची तरंगलांबी सगळ्यात अधिक म्हणजे ...... nm च्या जवळ असते.
18. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय?
19. प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची ......... निर्माण होते.
20. काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन - आकृती काढा.
21. व्याख्या लिहा- प्रकाशाचे अपस्करण
22. प्रकाश ज्या वेगाने हवेतून जाऊ शकेल त्याच वेगाने काचेच्या लादी तून जाऊ शकेल का?
23. जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून ...... जातो.
24. sin i / sin r = ?
25. दोन लोलकांच्या साहाय्याने पांढऱ्या आपाती प्रकाशापासून पांढरा निर्गत प्रकाश कसा मिळवता येईल?
26. सर्वच माध्यमांसाठी प्रकाशाचा वेग सारखाच असेल का ?
27. दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाश किरण त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिमेकडून आल्यासारखे भासतात. यालाच ...... असे म्हणतात.
28. व्याख्या लिहा- आंशिक परावर्तन
29. नामनिर्देशित सुबक आकृती काढा- प्रकाशाचे अपस्करण.
꧁●○≛⃝ ≛⃝ 🌍○●꧂
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा