मुख्य सामग्रीवर वगळा

8 वी, विज्ञान, 6. द्रव्याचे संघटन, नोट्स.

8 वी, विज्ञान, 6. द्रव्याचे संघटन नोट्स.


╭✺༺☬༒☬༻✺╮


🖌️ माहिती विज्ञानाची या विज्ञान विषयी ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील👇 कम्युनिटी लिंकला🔗 स्पर्श करा.

       ✺◆★✧★◆✺

🎨 द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या?

उत्तर:- 

  1. स्थायू,
  2.  द्रव, 
  3. वायू 
  4. प्लाझ्मा आणि 
  5. बोस-आईन्स्टाईन कंडेन्सेट या द्रव्याच्या अवस्था आहेत.

┅━═▣◆★✧★◆▣═━┅

🎯 बर्फ, पाणी व वाफ यांच्यातील फरक सांगा.

उत्तर:- 

या पाण्याच्या तीन अवस्था आहेत.

  • बर्फ हा स्थायू अवस्थेत आहे.
  •  पाणी हे द्रव अवस्थेत आहे. 
  • वाफ ही वायू अवस्थेत आहे.


🎲 द्रव्याच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात?

उत्तर:-

 अणू

           **⋱✨⋮✨⋰**

🎳  द्रव्याचे प्रकार कोणते?

उत्तरः 

  1. मूलद्रव्य, 
  2. संयुग व 
  3. मिश्रण हे द्रव्यांचे तीन प्रकार आहेत.

            ..•♡•.:🧿:•♡•..

🏊  द्रव्याच्या कणांमध्ये (अणु किंवा रेणूंमध्ये आंतररेण्वीय आकर्षण बल कार्यरत असते.


🏉 स्थायूंमध्ये आंतररेण्वीय बल अतिशय प्रभावी असते.


🏈 स्थायूंना ठराविक आकार व आकारमान प्राप्त होतात.


🏇  द्रव अवस्थेमध्ये आंतररेण्वीय बलाची सक्षमता मध्यम असते.


🏄  द्रवामध्ये आकारमान ठराविक राहते.


🏂 द्रवांचा आकार ठराविक न राहता धारकपात्राप्रमाणे बदलतो.


🏁 वायूंमध्ये आंतररेण्वीय बल अती क्षीण असते.


🏀 वायूंना ठराविक आकार किंवा ठराविक आकारमान हे दोन्ही नसतात.

        ✺༺☬ ◆★✧★◆✺༺☬

🎿 द्रव्याचे तीन प्रकार कोणते?

 ‘मूलद्रव्य’ (element), ‘ संयुग (Compound) व ‘मिश्रण’ (Mixture) असे तीन प्रकार पडतात.


🎾 मूलद्रव्याच्या लहानात लहान कणांमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात.


🎷 संयुगाचे लहानात लहान कण (रेणू) हे दोन किंवा अधिक प्रकारचे अणू एकमेकांना जोडून बनलेले असतात.


🎧 पाण्याच्या प्रत्येक रेणूमध्ये हायड्रोजनचे दोन अणू हे ऑक्सिजनच्या एका अणूला जोडलेल्या स्थितीत असतात. 


🎤 मिश्रणाचे लहानात लहान कण म्हणजे दोन किंवा अधिक मूलद्रव्य/संयुगांचे अणू/रेणू असतात.


████╗
████║
████╝

🎠 हवा ह्या मिश्रणात 

  • N2 (78%),
  • O(21%),
  • Ar,
  • H2O(g),
  • CO2 (0.03%) हे हवा मिश्रणातील प्रमुख घटक रेणू आहेत.


🎢 पितळ ह्या मिश्रणात (संमिश्रात) तांबे (Cu) व जस्त (Zn) ह्या मूलद्रव्यांचे अणू असतात.


👉ब्राँझमध्ये तांबे (Cu) व कथिल (Sn) ह्या मूलद्रव्यांचे अणू असतात.

           ❄️: ⁣⋱  ⋰:❄️

 ✌पाणी

  •  पाणी  एक संयुग - शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे. 
  •  पाण्याचा स्त्रोत कोणताही असला तरी त्यातील ऑक्सिजन व हायड्रोजन ह्या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण 8:1 असेच असते. 
  • हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे तर 
  • ऑक्सिजन वायू ज्वलनाला मदत करतो. मात्र,
  • हायड्रोजन व ऑक्सिजन ह्या वायुरूप मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले पाणी हे संयुग द्रवरूप असून ते ज्वलनशीलही नसते व ज्वलनास मदतही करत नाही; उलट 
  • पाण्यामुळे आग विझायला मदत होते.
      __[♡🥀⛓️♡]__

दूध : एक मिश्रण

  • दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि आणखी काही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण आहे. 
  • दुधाच्या स्रोताप्रमाणे दुधातील विविध घटक पदार्थांचे प्रमाण वेगवेगळे असते. 
  • गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण 3-5% असते, तर 
  • म्हशीच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण 6-9% असते. 
  • दुधात निसर्गत:च पाणी हा घटकपदार्थ मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे दूध द्रव अवस्थेत आढळते. 
  • दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील दुग्धशर्करा (Lactose) ह्या घटक पदार्थामुळे असते.  म्हणजेच घटक पदार्थांचे गुणधर्म दुधात राखले जातात.

╰✺༺☬༒☬༻✺╯






टिप्पण्या