स्वाध्याय,9 वी, धाराविद्युत.
___________________
______🔘 🔘 🔘______
- SI पद्धतीत रोधकतेचे एकक ..... ..... आहे.
- समांतर जोडणी चे सूत्र लिहा.
- विद्युत उपकरणांचे नुकसान न होऊ देण्यासाठी ...... वापरतात.
- ........ जोडणी परिपथातील रोध वाढवण्यासाठी वापरतात.
- अनओहमनीय वाहक म्हणजे काय?
- ...... हा मासा आपले भक्ष्य पकडण्यासाठी व स्वत:चे संरक्षण करण्यासाठी विजेचा वापर करतो.
- सामान्यपणे वीजयुक्त तार ....... रंगाच्या रोधी म्हणजेच विसंवाहक आवरणाची असते.
- विद्युत प्रभाराचे SI पद्धतीतील एकक ....... आहे.
- व्याख्या:- विद्युत परिपथ.
- वाहकाच्या टोकामध्ये विभवांतर प्रयुक्त करण्यासाठी ......... चा वापर करतात.
- रोधाच्या एकसर जोडणीचे सूत्र लिहा.
- अतिवाहक म्हणजे काय?
- परिपथातून जाणारी विद्युतधारा नियंत्रित करण्यासाठी ......... ...... चा वापर होतो.
- व्याख्या लिहा:- एक ओहम रोध.
- SI पद्धतीत विभवांतराचे एकक ........ हे आहे.
- विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे ........ होय.
- 1 mA° = ..... A
- वाहकाचा रोध R असेल तर रोधकतेचे सूत्र लिहा.
- रोध हवा तसा बदलून परिपथातील विद्युतधारा हवी तशी बदलणे यासाठी ........ ...... घटक वापरला जातो.
- ......... जोडणे प्रत्येक रोधातून समान विद्युत धारा वाहते.
- घरगुती विद्युत उपकरणे नेहमी ......... जोडणीत जोडलेली असावीत.
- 47.1 × 10^-6 = 4.71* 10^..?....
- 0.3 × 300 = ?
- 2.4 + 1.2 + 0.46 = ?
- व्याख्या लिहा:- अतिवाहक.
- ...... जोडणी परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरतात.
- 27/0.9 = ?
- परिपथातील विद्युत धारा मोजण्यासाठी ...... हा घटक वापरतात.
- 1 mV = ...... V
- वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युतधारा (I) व त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) यांच्यामधील संबंध जर्मन शास्त्रज्ञ ...... ....... यांच्या नियमानुसार काढता येतो.
- 39 / 130 = ?
- व्याख्या लिहा- ॲम्पियर
- रोधकतेचे SI एकक ........ आहे.
- परिपथातील विभवांतर मोजण्यासाठी ........ घटक वापरतात.
- विद्युत विभव म्हणजे काय?
- व्याख्या लिहा: वाहक
- 60×3.14×30×10^6/90×10^-3 = ?
- रोधांच्या समांतर जोडणीत प्रत्येक रोधांच्या टोकांदरम्यानचे ...,...... समान असते.
- व्याख्या लिहा- एकसर जोडणी.
- 390/ 1000 = ?
- दोन बिंदू मधील विभवांतर काढण्याचे सूत्र लिहा.
- व्याख्या लिहा- विसंवाहक.
- एका इलेक्ट्रॉनवरील प्रभार ............ कूलोम (C) असतो.
- 0.3 × 600 = ?
- विद्युतधारा मोजण्याची सूत्र लिहा.
- वाहकाची भौतिक अवस्था म्हणजे काय?
- व्याख्या लिहा: समांतर जोडणी.
- 18/60 = ?
- रोधांच्या ........ जोडणीचा परिणामी रोध हा त्या जोडणीतील रोधांच्या स्वतंत्र किंमतीपेक्षा कमी असतो.
- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना वाहकामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या वाहकाच्या दोन टोकांमधील ........... समानुपाती असते.
- रोधांच्या एकसर जोडणीचा परिणामी रोध हा जोडणीतील प्रत्येक रोधापेक्षा ...... असतो.
या पाठावरील प्रत्यक्ष गणित न देता केवळ गणिती क्रिया करता आल्या तरीही पुरेसे ठरणार आहे 🙏.
*
**
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा