8 वी विज्ञान, 5.4 - अणूचे अंतरंग- नोट्स.
*❀꧁✦꧂❀*🎷
╔════ ▓▓ ࿇🧿࿇ ▓▓ ════╗
- ‘K’ कवचाची इलेक्ट्रॉन धारकता ही ‘दोन’ आहे.
- ‘L’ कवचाची इलेक्ट्रॉन धारकता ‘आठ’ आहे.
- निष्क्रीय वायूंच्या संयुजा कवचात आठ इलेक्ट्रॉन असतात.
- निष्क्रीय वायूंचे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयुजा शून्य असते.
- हायड्राेजनच्या बाबतीत असे म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक अपूर्ण आहे.
- निष्क्रीय वायू वगळता इतर सर्व मूलद्रव्यांच्या अणूंमध्ये इतर अणूंबरोबर संयोग पावण्याची प्रवृत्ती असते.
- सोडिअमच्या 2, 8, 1 ह्या संरूपणावरून समजते की सोडिअमच्या संयुजा कवचात ‘एक’ इलेक्ट्रॉन आहे.
*✦---🧿----✦*
🎺 संयुजा व इलेक्ट्रॉन संरूपण यांतील संबंध
- ‘‘ज्या मूलद्रव्यात संयुजा इलेक्ट्रॉन संख्या चार किंवा त्यापेक्षा कमी असते त्या मूलद्रव्याची संयुजा त्यातील संयुजा इलेक्ट्रॉन संख्येएवढी असते.
- ज्या मूलद्रव्यात चार किंवा त्याहून अधिक इलेक्ट्रॉन असतात तेव्हा अष्टक पूर्ण होण्यासाठी जितके इलेक्ट्रॉन कमी असतात, ती उणीवेची संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा असते.’’
_______[♡🤞🏻♡]_______
🦅 पुढे काही मूलद्रव्यांचे अणुअंक (Z) दिले आहेत. त्या मूलद्रव्यांच्या बाह्यतमकक्षेत प्रत्येकी किती इलेक्ट्रॉन आहेत ते लिहा.
━━━━✧❂✧━━━━
🌹 पुढे काही मूलद्रव्यांची इलेक्ट्रॉन संख्या दिली आहे. त्यावरून त्या त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण, संयुजा इलेक्ट्रॉन संख्या व संयुजा लिहा.
𝄅𝄄𝄅𝄈⧗⃝✿*~> ~*✿⃝𝆭⧗⃪ ꯭𝄈𝄅𝄄𝄅🪈꯭
🌞 अणुक्रमांक व अणुवस्तुमानांक नेहमी पूर्णांकातच का असतात ?
उत्तर:-
- अणुक्रमांक व अणुवस्तुमानांक नेहमी पूर्णांकातच असतो, कारण तो अणु केंद्रकातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकूण संख्या असते, जी नेहमी एक पूर्ण संख्या असते.
- प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे मूलभूत कण आहेत आणि त्यांची संख्या मोजताना ती नेहमीच एक पूर्ण (पूर्णांक) संख्या असते. त्यामुळे, त्यांची एकूण बेरीजही पूर्णांकातच येते
✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿
🪽 सल्फरमध्ये 16 प्रोटॉन व 16 न्यूट्रॉन असतात तर त्याचा अणुअंक व अणुवस्तुमानांक किती असेल?
उत्तर:-
अणुअंक:- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉनच्या संख्येला अणुअंक असे म्हणतात.
सल्फरमध्ये 16 प्रोटॉन म्हणून सल्फर/ गंधक चा अणुअंक 16
अणुवस्तुमानांक:- मूलद्रव्याच्या अणुतील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या बेरजेला अणुवस्तुमानांक असे म्हणतात.
A = p + n
= 16 + 16
= 32
..•♡•:.:✦:.:•♡•..
😎 मूलद्रव्यांचा अणुअंक हा मूलद्रव्याचा मूलभूत गुणधर्म व त्याची रासायनिक ओळख आहे.
████╗
████║
████╝
🪔. समस्थानिक:
- व्याख्या:- निसर्गातील काही मूलद्रव्यांमध्ये अणुअंक समान असतात पण अणुवस्तुमानांक भिन्न असतात त्यांना त्या मूलद्रव्यांची समस्थानिके म्हणतात
- उदा. कार्बन. कार्बनची तीन समस्थानिके आहेत. ती म्हणजे उदा. C - 12, C - 13, C - 14.
- समस्थानिकांची प्रोटॉन संख्या समान असते परंतु न्यूट्रॉन संख्या भिन्न असते.
▬▬▬۩۞۩▬▬▬
🥳 हायड्रोजनची एकूण तीन समस्थानिके आहेत, त्यांना हायड्रोजन, ड्युटेरिअम व ट्रीटिअम अशी स्वतंत्र नावे आहे.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
🎁. समस्थानिकांचे उपयोग:
काही मूलद्रव्यांची समस्थानिके किरणोत्सारी असतात. त्यांचा उपयोग विविध क्षेत्रांत केला जातो. उदा. औद्योगिक क्षेत्र, कृषी क्षेत्र, वैद्यक क्षेत्र, संशोधन क्षेत्र.
1.U- युरेनिअम - 235 चा उपयोग केंद्रकीय विखंडन व वीजनिर्मितीसाठी होतो.
2. कॅन्सरसारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये काही मूलद्रव्यांच्या किरणोत्सारी
समस्थानिकांचा उपयोग होतो. उदा. कोबाल्ट - 60.
3. गॉयटर या थायरॉईड ग्रंथींच्या आजारावरील उपचारांमध्ये आयोडिन I -131 चा उपयोग होतो.
4. किरणोत्सारी मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चीरा शोधण्यासाठी
होतो. उदा. सोडिअम-24.
5. अन्नपदार्थांचे सूक्ष्म जीवाणूपासून परिरक्षण करण्यासाठी किरणोत्सारी मूलद्रव्यांचा उपयोग होतो.उदा. कोबाल्ट-60
6. C-14 ह्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग जीवाश्मांचे वय FossilEra ठरविण्यासाठी होतो.
*།།◆️___🧿___◆️།།*
⚛️. अणुभट्टी :
अणुऊर्जेच्या वापराने मोठ्याप्रमाणावर वीजनिर्मिती करण्याचे संयत्र म्हणजे अणुभट्टी.
अणुभट्टीमध्ये अणुइंधनावर केंद्रकीय अभिक्रिया घडवून आणतात व अणूमधील केंद्रकीय ऊर्जा मुक्त करतात.
मंद गतीच्या न्यूट्रॉनांचा मारा केला असता युरेनिअम - 235 ह्या समस्थानिकाच्या केंद्रकाचे विखंडन होऊन क्रिप्टॉन - 92 व बेरिअम - 141 ह्या वेगळ्या मूलद्रव्यांची केंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन निर्माण होतात. ह्या न्यूट्रॉनांची गती कमी केल्यावर ते आणखी U- 235 केंद्रकांचे विखंडन घडवतात. अशा प्रकारे केंद्रकीय विखंडनाची शृंखला अभिक्रिया होते यामध्ये केंद्रकातून मोठ्या प्रमाणात केंद्रकीय ऊर्जा म्हणजेच अणुऊर्जा मुक्त होते.
संभाव्य विस्फोट टाळण्यासाठी शृंखला अभिक्रिया नियंत्रित ठेवतात. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पुढील गोष्टींचा वापर केला जातो.
1. संचलक / मंदक ः न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईट किंवा जड पाणी यांचा संचलक किंवा मंदक म्हणून वापर केला जातो.
2. नियंत्रक : ः न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी बोरॉन, कॅडमिअम, बेरिलिअम
इत्यादींच्या कांड्या नियंत्रक म्हणून वापरतात.
विखंडन प्रक्रियेत निर्माण झालेली उष्णता पाण्याचा शीतक म्हणून वापर करून बाजूला काढली जाते. त्या उष्णतेने पाण्याची वाफ करून वाफेच्या साहाय्याने टर्बाइन्स चालविले जातात व वीजनिर्मिती होते.
भारतामध्ये आठ ठिकाणच्या अणुवीजनिर्मिती केंद्रांमध्ये एकूण बावीस अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत.
‘अप्सरा’ ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे.
भारतात थोरिअम- 232 ह्या मूलद्रव्याचे साठे मोठ्या प्रमाणात.
भारतीय वैज्ञानिकांनी पुढील काळासाठी Th - 232 पासून U- 233 ह्या समस्थानिकाच्या निर्मितीवर आधारित अणुभट्ट्यांची योजना विकसित केली आहे.
*╰✺༺☬༒☬༻✺╯*
━━━━✧❂✧━━━━
🚀 रंजक माहिती 🛞
🎷 न्यूट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या वस्तुमानापेक्षा सुमारे ०.14% जास्त आहे.
💐 हायड्रोजन आणु मध्ये न्यूट्रॉन नाहीत कारण एकच प्रोटॉन असल्यामुळे तो एक स्थिर आहे, प्रोटॉन प्रोटॉन मधील प्रतिकर्ष नसल्यामुळे न्यूटनची गरज नाही.
━━━━✧✿✧━━━━
🔥. वस्तुमान
1 amu = 1.66 × 10⁻²⁷ kilograms.
1 Dalton (Da) = 1.66053906660×10⁻²⁷ kg
Mass of proton= 1.672621898(21)×10⁻²⁷ kg
∴ H = p = n = 1 amu
✿¸.•*¨🔥`*•..¸✿
🪔 मूलद्रव्यात तीन मूलभूत अवअणुकण असतात- प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन त्याचसोबत अणुकेंद्रकात आणखीनही काही अवुअणुकण असतात....
जसे leptons (like muons and taus), bosons (including photons and gluons), and neutrinos
लेप्टॉन (म्युऑन्स आणि टाउस सारखे), बोसॉन (फोटॉन आणि ग्लुऑन्ससह), आणि न्यूट्रिनो
*┅━━━━━•❀•━━━━━┅*
Life goals
Until it's done, tell none.🎷
✤⊰❉⊱═⊰⊱═⊰❉⊱✤*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा