8 वी विज्ञान, 5.2- अणूचे अंतरंग- नोट्स.
*❀꧁✦꧂❀*🎷
━━━━✧❂✧━━━━
*╭✺༺☬༒☬༻✺╮*
🏈 अणूची संरचना
केंद्रक व केंद्रकाबाहेरील भाग यांचा मिळून अणू बनतो. अणूत तीन प्रकारच्या अवअणुकणांचा
समावेश असतो.
*•..¸✿✨✿¸.•*
🎻 केंद्रक
- अणूचे केंद्रक धनप्रभारित असते.
- अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान केंद्रकात एकवटलेले असते.
- केंद्रकामध्ये दोन प्रकारचे अवअणुकण असतात, एकत्रितपणे त्यांना न्युक्लिऑन म्हणतात.
- प्राेटॉन व न्यूट्रॉन हे न्यूक्लिऑनचे दोन प्रकार आहेत.
*།།◆️___🧿___◆️།།*
🎢 प्रोटॉन (p)
- प्रोटॉन हा अणुकेंद्रकात असणारा धनप्रभारित अवअणुकण आहे.
- केंद्रकावरील धनप्रभार हा अणुकेंद्रकातील प्रोटॉनांमुळे असतो.
- प्रोटॉनचा निर्देश ‘p’ ह्या संज्ञेने करतात.
- एका प्रोटॉनचे वस्तुमान सुमारे 1u (unified mass) इतके असते.
- प्रत्येक प्रोटॉनवरील धनप्रभार +1e एवढा असतो.
- केंद्रकावरील एकूण धनप्रभार ‘e’ ह्या एककामध्ये व्यक्त केल्यास त्याचे परिमाण केंद्रकातील प्रोटॉनसंख्येएवढे असते.
𝄅𝄄𝄅𝄈✿*~> ~*✿⃝𝆭⧗⃪ ꯭𝄈𝄅𝄄𝄅🪈꯭
🎿 1e = 1.6 *10-19 कूलॉम.
🎶 अणूअंक: अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनसंख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणूअंक असून तो ‘Z’ ह्या संज्ञेने दर्शवतात.
🎬 1 डाल्टन म्हणजे 1 u =1.66 *10-27 kg
🏀हायड्रोजनच्या H एका अणूचे वजन सुमारे 1 u इतके आहे.
✿¸.•*¨`🧿¨`*•..¸✿
🎾 न्यूट्रॉन (n)
- न्यूट्रॉन हा विद्युतप्रभारदृष्ट्या उदासीन असलेला अवअणुकण आहे.
- न्यूट्रॉन चा निर्देश ‘n’ ह्या संज्ञेने करतात.
- केंद्रकातील न्यूट्रॉन संख्येसाठी ‘n’ ही संज्ञा वापरतात.
- 1 u इतके अणुवस्तुमान असलेल्या हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात.
- एका न्यूट्रॉनचे वस्तुमान सुमारे 1 u इतके आहे. म्हणजेच जवळजवळ प्रोटॉनच्या वस्तुमानाइतकेच आहे.
*✦---🧿----✦*
🎺केंद्रकाबाहेरील भाग
अणूच्या संरचनेत केंद्रकाबाहेरील भागात परिभ्रमण
करणारे इलेक्ट्रॉन आणि केंद्रक व इलेक्ट्रॉन यांच्या दरम्यान
असलेली पोकळी यांचा समावेश होतो.
❄️: ⋱ ⋮ ⋰:❄️
🎏 इलेक्ट्रॉन (e-)
- इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित अवअणुकण असून त्याचा निर्देश ‘e-’ ह्या संज्ञेने करतात.
- प्रत्येक इलेक्ट्रॉनवर एक एकक ॠणप्रभार (-1e) असतो.
- इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तूमानापेक्षा 1800 पटीने कमी आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य मानता येते.
- अणूच्या केंद्रकाबाहेरील भागातील इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती असलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये परिभ्रमण करतात.
- भ्रमणकक्षेचे स्वरूप त्रिमित असल्याने ‘कक्षा’ ह्या पदाऐवजी ‘कवच’ (shell) हे पद वापरतात.
- इलेक्ट्रॉनची ऊर्जा तो ज्या कवचात असतो त्यावरून ठरते.
- अणुकेंद्रकाबाहेरील इलेक्ट्रॉनांची संख्या केंद्रकामधील प्रोटॉनसंख्येइतकीच (Z) असते. त्यामुळे विद्युतप्रभारांचे संतुलन होऊन अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो.
..•♡•:.:✦:.:•♡•..
अणुवस्तुमानांक ‘A’ ह्या संज्ञेने दर्शवितात.
████╗
████║
████╝
🎓 अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेतरूपात दर्शविण्याची पद्धत कोणती?
उत्तर:-
ह्या चिन्हांकित संकेताचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच प्रोटॉनसंख्या 6 व कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. कार्बनच्या केंद्रकात (12-6) म्हणजे 6 न्यूट्रॉन आहेत.
▬▬▬۩🧿۩▬▬▬
🏁 ऑक्सीजनची संज्ञा ‘O’ असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सीजनचा अणुअंक (Z) व अणुवस्तुमानांक (A) ठरवा, तसेच त्यांची चिन्हांकित संकेताने मांडणी करा.
उत्तर:-
अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनसंख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणूअंक म्हणून ऑक्सिजनचा अनुअंक 8.
अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक म्हणून ऑक्सिजनचा अणुवस्तुमानांक 16.
अणूच्या केंद्रकातील प्रोटॉनसंख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणूअंक
*✦---🧿----✦*
🏇 कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणूत किती इलेक्ट्रॉन असतील?
उत्तर:-
कार्बनचा अणुअंक 6 म्हणजेच कार्बन मधील प्रोटॉनची संख्या सहा.
अणुमध्ये जेवढे प्रोटॉन असतात तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे कार्बनच्या अणुत 6 इलेक्ट्रॉन असतात.
┅━═▣◆★✧★◆▣═━┅
🎯 सोडिअमच्या अणूत 11 इलेक्ट्रॉन आहेत. सोडिअमचा अणुअंक किती ?
उत्तर:-
अणुत प्रोटॉन व इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते.
सोडियमच्या Na अणुत अकरा इलेक्ट्रॉन आहेत म्हणून सोडियम चा अणुअंक 11.
▬▬▬۩۞۩▬▬▬
🎲 मॅग्नेशिअमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 व 24 आहे. चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही ते कसे दर्शवाल ?
उत्तर:-
✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿
🎳 कॅल्शिअमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 व 40 आहे. यावरून कॅल्शिअमच्या केंद्रकात किती न्यूट्रॉन असतील ते काढा.
उत्तर:-
अणुअंक (Z) , अणुवस्तुमानांक(A), न्यूट्रॉन(n)
n = A - Z
= 40 - 20
= 20
कॅल्शियमच्या केंद्रकात वीस न्यूट्रॉन असतील.
*╰✺༺☬༒☬༻✺╯*
_*कामात इमानदारी आणि
जबाबदारी असली की ,*_
_*अपयशाची उधारी
चुकवत यश आपल्या दारी येतं...*_
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
*།།◆️___◯___◆️།།*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा