मुख्य सामग्रीवर वगळा

नोट्स- इयत्ता 8 वी. विज्ञान, 4. धाराविद्युत आणि चुंबकत्व


नोट्स- इयत्ता 8 वी. विज्ञान, 4. धाराविद्युत आणि चुंबकत्व

▬▬▬۩۞۩▬▬▬


What's App Group Join Now

 

*།།◆️___✨___◆️།།*

अणूमध्ये कोणकोणते घटक असतात?

अणूमध्ये अणु केंद्रकात धनप्रभारित प्रोटॉन व प्रभार रहित न्यूट्रॉन तर अणु केंद्रकाभोवती ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन असतात.

*✦-------✦*

काचेची कांडी रेशमी कपड्यावर घासल्यावर काय होते?

काचेची कांडी धन प्रभारीत होते.

रेशीम कापडावर ऋण प्रभार निर्माण होतो.

वस्तू प्रभारित कशा होतात. 

वस्तू प्रभारित दोन प्रकारे होतात: घर्षणाने किंवा प्रेरणेने वस्तू प्रभारित होऊ शकतात.

1. घर्षणाने

उदा. जेव्हा आपण प्लास्टिकचा कंगवा  केसांवर घासतो, तेव्हा कंगवा ऋणप्रभारित होतो आणि केस धनप्रभारित होतात.  

2. प्रेरणेने

जेव्हा एक प्रभारित वस्तू  दुसऱ्या प्रभाररहित वस्तूजवळ आणली जाते, तेव्हा ती प्रभाररहित वस्तू देखील प्रभारित होते, याला प्रेरण म्हणतात. 

*།།◆️______◆️།།*

स्थिर प्रभार कशाला म्हणतात?

स्थिर प्रभार म्हणजे पदार्थाच्या पृष्ठभागावर साठलेला विद्युत प्रभार, जो एका विशिष्ट ठिकाणी स्थिर असतो.  स्थिर प्रभार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे वाहत नाही. 

उदा. जेव्हा आपण एखादा फुगा केसांवर घासतो, तेव्हा फुगा आणि केस यांच्यामध्ये स्थिर प्रभार तयार होतो. 


..•♡•.:◆️:.•♡•.


 चल प्रभार म्हणजे काय?

इलेक्ट्रॉन्सच्या स्थानांतरणामुळे जो प्रभार निर्माण होतो, त्याला चल प्रभार म्हणतात.

उदा. जेव्हा एखादी काचेची वस्तू रेशमी कपड्यावर घासू, तेव्हा काचेवरील काही इलेक्ट्रॉन रेशमी कपड्यावर जातात. त्यामुळे काचेचा तुकडा धनप्रभारित होतो.


████╗

████║

████╝


चल ऋणप्रभारित कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात. 


⭐▬۩🧿۩▬⭐

विद्युत धारा कशी निर्माण करता येते?

एखाद्या सुवाहकांमधील इलेक्ट्रॉन्सना  जर गती देऊन वाहते केले तर आपल्याला विद्युत धारा मिळवता येते. 

धनप्रभाराची प्रवृत्ती अधिक विद्युत पातळीच्या बिंदूपासून कमी विद्युतपातळीचे बिंदूपर्यंत वाहण्याची असते.


❄️: ⁣⋱ 🎺⋰:❄️


विद्युतस्थितिक विभव म्हणजे काय?

एखाद्या विद्युत क्षेत्रात, कोणतेही त्वरण निर्माण होऊ न देता एका विशिष्ट बिंदूपर्यंत एका धन प्रभारित कणाला अनंत अंतरावरून आणण्यासाठी करावे लागणारे कार्य.


✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿


विभवांतर म्हणजे काय? 

दोन बिंदूंच्या विभवामधील फरकाला विभवांतर म्हणतात.                          किंवा.

एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत एकक धन प्रभार स्थानांतरित करण्यासाठी करावे लागणारे कार्य म्हणजे त्या दोन बिंदूंमधील विभवांतर.

विभवांतराचे SI पद्धतीतील एकक होल्ट आहे.

विद्युतप्रवाहाचे एकक कूलोम प्रति सेकंद म्हणजे ॲंपियर आहे.

1 ॲंपियर = 1 कूलोम / 1 सेकंद 

▬▬▬۩🧿۩▬▬▬

कोरडा विद्युतघट:-


कोरड्या विद्युतघटात  जस्ताचे, Zn एक पांढऱ्या रंगाचे आवरण असते हे घटाचे ऋण टोक होय.

कोरड्या विद्युत घटात झिंक क्लोराइड ZnCl2 आणि अमोनियम क्लोराईड NH4Cl या विद्युत अपघटनीचा ओल्या मिश्रणाचा लगदा असतो.

कोरड्या विद्युत घटात मध्यभागी धन प्रभारीत ग्रॅफईट ची कांडी असते.

कोरड्या विद्युत घटातून मोठा विद्युत प्रवाह मिळवता येत नाही.

✿¸.•*¨`*•..¸✿✿¸.•*¨`*•..¸✿


लेड आम्ल विद्युतघट:-


लेड आम्ल विद्युतघटात लेड ऑक्साईड

  PbO2 धन अग्र म्हणून कार्य करते.

लेड आम्ल विद्युतघटात शिसे Pb कांडी ऋण अग्र म्हणून कार्य करते.

लेड आम्ल विद्युतघटात  सेल्फ्युरिक आम्ल H2SO4 विद्युत अपघटनी म्हणून कार्य करते.

लेड आम्ल विद्युतघटाद्वारे सुमारे दोन होल्ट इतके विभवांतर मिळते. 

लेड आम्ल विद्युतघटांची मोठा विद्युत प्रवाह पुरवण्याची क्षमता असते.

लेड आम्ल विद्युतघटाचा वापर मोटारी, ट्रक, मोटारसायकली, अखंड विद्युतशक्ती पुरवठा यंत्रे (UPS) यामध्ये केला जातो.

❄️: ⁣⋱ ⋮ ⋰:❄️

निकेल-कॅडमिअम घट 


निकेल-कॅडमिअम घटाद्वारे 1.2 V विभवांतर मिळते. 

निकेल-कॅडमिअम घट पुन्हा प्रभारीत करता येतात.

निकेल कॅडमिअम घाटात निकेल हा धनप्रभार म्हणजेच ॲनोड म्हणून कार्य करतो तर कॅडमियम हा ऋणप्रभार म्हणजे कॅथोड म्हणून कार्य करतो.


 𝄅𝄄𝄅𝄈✿*~> ~*✿⃝𝆭⧗⃪ ꯭𝄈𝄅𝄄𝄅🪈꯭


विद्युत परिपथ 


विद्युत परिपथ  म्हणजे विद्युत प्रवाहाचा एक बंद मार्ग, ज्यात ऊर्जा स्त्रोत, विद्युत उपकरणे, आणि जोडणाऱ्या तारा, कळ या मार्गाने विद्युत धारा वाहते. 


✿¸.•*¨◆️`*•..¸✿


लिथिअम (Li) आयन विद्युत घट आधुनिक साधनांमध्ये वापरले जातात.

 उदा. स्मार्टफोन, लॅपटॉप, इत्यादी. 

 लिथिअम आयन विद्युत घट पुनःप्रभारित करता येतात.  

लिथिअम आयन विद्युत घटामध्ये Ni-Cd घटांपेक्षा अधिक विद्युत ऊर्जा साठविली जाते.

*✦----✿---✦*

बॅटरी

एकापेक्षा अधिक घट एकापाठोपाठ एक एकसर जोडणीत जोडल्यास त्यामुळे अधिक विद्युत प्रवाह मिळतो त्यास घटांची बॅटरी असे म्हणतात.

1.5 व्होल्ट चे तीन घट एकसर जोडल्यास एकूण विभवांतर 4.5 होल्ट (V) होईल.


..•♡•🎷•♡•.

 


तारेतून विद्युत प्रवाह गेल्यास तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे हांस ओरस्टेड यांनी प्रथम दाखवून दिले.


*✦----✿---✦*

विद्युत चुंबक:-



विजेच्या साहाय्याने तयार होणारा चुंबक. जेव्हा एखाद्या तारेतून विद्युत प्रवाह जातो, तेव्हा त्या तारेच्या सभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते. जर अशी तार एखाद्या लोखंडी वस्तूवर गुंडाळली, तर ती लोखंडी वस्तू तात्पुरती चुंबक बनून जाते.


✿¸.•*¨◯`*•..¸✿


विद्युत घंटा


तांब्याची तार एका लोखंडी तुकड्यावर गुंडाळलेली असते. हे कुंतल विद्युतचुंबक म्हणून कार्य करते.

एक लोखंडी पट्टी टोलासहित विद्युतचुंबकाजवळ बसवलेली असते. ह्या पट्टीच्या संपर्कात संपर्क स्क्रू असतो. स्क्रू पट्टीच्या संपर्प असताना परिपथातून विद्युतप्रवाह वाहतो व त्यामुळे कुंतलाचा विद्युतचुंबक होतो व तो लोखंडी पट्टीला खेचून घेतो. त्यामुळे घंटेवर टोला आदळून ध्वनी निर्माण होतो. मात्र त्याच वेळी संपर्क स्क्रूचा लोखंडी पट्टीशी संपर्क तुटतो आणि

परिपथातील विद्युतप्रवाह खंडित होतो. अशा स्थितीत विद्युत चुंबकाचे चुंबकत्व नाहिसे होते व लोखंडी पट्टी पुन्हा मागे येऊन संपर्क स्क्रू ला चिकटते. त्यामुळे लगेच पुन्हा विद्युतप्रवाह सुरू होतो व पुन्हा वरील क्रियेने टोला घंटेवर आदळतो. ही क्रिया वारंवार होते आणि घंटा वाजत राहते.


 ~*- _ ❥_ -*~


जो व्यक्ती आव्हानांचा सामना करतो, 

तो प्रत्यक्ष यश प्राप्त करतो.


अपयशाला घाबरायचे नाही, 

त्यात शिकण्याची संधी दडलेली असते.


..•♡•🎷•♡•..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎸

 12 वी , 10 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक🎷 🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅 ┈┅━❀꧁꧂❀━•┈        ✍🏻  दहावी बारावी बोर्ड निकालावरूनच विद्यार्थी जीवनाला एक वेगळे वळण मिळते.  वर्षभर केलेला अभ्यास मोजक्या वेळेत व्यवस्थित मांडून वर्षभराच्या मेहनतीचे फलित निकालात मिळवणे ही एक कला आहे.  आपली ठरलेली उद्दिष्ट व ध्येयाप्रत जाण्यासाठी परीक्षा हा एक मार्ग आहे. आता आपण जेवढे कष्ट करू तेवढे कष्ट आपल्याला पुढे कमी करावे लागतील याची जाण विद्यार्थ्यांनी ठेवल्यास यशाकडे ते जातील.  🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴 💫 12 वी बोर्ड परीक्षा वेळापत्रक  🎷  👉  बारावी बोर्ड प्रात्यक्षिक व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा  23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत होईल.   10 फेब्रुवारी - इंग्रजी 11 फेब्रुवारी - हिंदी 12  फेब्रुवारी - मराठी  16 फेब्रुवारी- भौतिकशास्त्र / Physics 18 फेब्रुवारी- रसायनशास्त्र / Chemistry 21 फेब्रुवारी- गणित / Mathematics 25 फेब्रुवारी- जीवशास्त्र / Biology ⌛  बारावी विज्ञान  सर्व पेपर 11 a.m. ते 2 p.m. या वेळेत आहेत. ●┈┉꧁...

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.

10th Science II, Environmental management, 10 वी विज्ञान 2, पर्यावरणीय व्यवस्थापन.             __[♡!!...🥀⛓️...!!♡]__ दररोज थोडी थोडी वैज्ञानिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या  व्हाट्सॲप  ग्रुपला जॉईन होऊ शकता. Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हावे . What's app link 👇 --> 🔴  माहिती विज्ञानाची 🎷  🔴          :⋯ ◯ ⋯ : 🏈  ग्रुप वर जॉईन का व्हावे ? याचे कारण.... आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतोत ,मग चला तर दररोज थोडे थोडे विज्ञान शिकू. शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरील CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) किंवा राज्यस्तरीय TET ( शिक्षक पात्रता परीक्षा ) उत्तीर्ण करावी लागते, जी तुम्हाला शिक्षक म्हणून पात्र करते.  कोणत्याही स्पर्धा परीक्षे त विज्ञान विषय हा असतोच.याची तयारी दररोज थोडी थोडी आपल्या विज्ञान लेखातून नक्की होईल. दररोजच्या जीवनात खूप विज्ञान आहे, या प्रयत्नातून काही विज्ञान आपणास समजले. ज्ञानात भर पडली तर आनंद वाढतो. एखाद्या...

इयत्ता 10वी निकालाबाबत🎻

 इयत्ता 10वी निकालाबाबत🎷   फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. 10 वी) परीक्षेचा निकाल  मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर  🎷  शुक्रवार, दिनांक 08 मे, 2026 रोजी 🎸    दुपारी 01:00 वाजता   ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.  अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते खालीलप्रमाणे आहेत. 1.  https://results.digilocker.gov.in 2.  https://mahahsscboard.in 3.  https://sscresult.mkcl.org 4.  https://results.targetpublications.org 5.  https://results.navneet.com 6.  https://www.tv9marathi.com 7. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-results . परीक्षेस प्र...