स्वाध्याय- 1. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण, इयत्ता 10 वी, भाग 1
▬▬▬۩۞۩▬▬▬
➖♾️⭕🟤⭕♾️➖
विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती व प्रयत्न वाढवल्यास ते यशाच्या जवळ जातात.
निव्वळ लिखाण📝 म्हणजे अभ्यास नव्हे.
अभ्यास करणाऱ्या📚 मुलांपेक्षा अभ्यास न करणारी मुलं ही दरी प्रचंड वाढत आहे.
बऱ्याच पालकांना असे वाटते की आपली मुलं लिहीत ✍️ आहेत म्हणजे अभ्यास करत आहेत. ती मुलं केवळ इकडून पाहून तिकडे लिहीत🖊️ असतात.
नम्र विनंती:- हा उपक्रम म्हणजे पूर्ण अभ्यास नव्हे. विद्यार्थ्याने खरोखर धडा व्यवस्थित वाचला आहे की नाही, त्याला धड्याचे आकलन झाले आहे का नाही यासाठी चा हा प्रयत्न आहे.
शिक्षकाच्या हातात प्रयत्न करणे हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे. मुलांना स्वाध्याय दिल्यावर मुलं नवनीत, कोहिनूर, इन माय पॉकेट..... यामधून पाहून लिहितात. असे कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा त्यांच्यात बदल करण्यासाठी धड्यातून स्वाध्याय दिल्यास तो धडा वाचणे मुलांना क्रमप्राप्त ठरेल. धडा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधून लिहिल्यास त्यांचा लिखाण सरावासोबत अभ्यास वाढेल.
पाठ्यपुस्तकातून प्रश्न देताना ही काळजी घेतली की धड्याप्रमाणे सलग प्रश्न न विचारता कोणत्याही पानावरचे प्रश्न हे क्रमशः राहणार नाहीत.
┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━
- अल्कधर्मी मृदा धातूंची दोन नावे लिहा.
- आवर्तसरणीच्या तळाशी असलेल्या दोन स्वतंत्रपणे ओळींना काय म्हणतात?
- धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून ...,... बनण्याची असते.
- मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म कोणता?
- अल्कधर्मी मृदा धातू ....... ची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही.
- आधुनिक आवर्ती नियम लिहा.
- गण 13 ते गण 18 हे ...... -खंडामध्ये येतात.
- मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील एका-ॲल्युमिनियम, एका- बोरॉन व एका सिलिकॉन या मूलद्रव्यांना नंतर शोध लागल्यावर क्रमशः कोणती नावे देण्यात आली?
- मानवनिर्मित मूलद्रव्यांचे दोन गुणधर्म लिहा.
- न्यूलँड्ज अष्टकाचा नियम कोणत्या मूलद्रव्यापर्यंत व्यवस्थित लागू होतो.
- गण 17 मध्ये ....... कुलाचे सदस्य आहेत.
- अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी लहान असे ........ (pm) हे एकक वापरतात.
- आधुनिक आवर्तसारणीत गण .... ते गण ..... म्हणजे डी -खंड.
- मेंडेलीव्हचा आवर्ती नियम प्रतिपादन करा. किंवा मेंडेलीव्हचा आवर्ती नियम लिहा.
- अणुअंक 92 असलेल्या ....... ह्या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये मानवनिर्मित आहेत.
- न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम लिहा.
- आवर्तसारणीमध्ये एक नागमोडी रेषेच्या किनारीने ........ या प्रकारच्या मूलद्रव्यांची मांडणी झालेली दिसते.
- Si, C, P, Cl, या मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची रेणूसुत्रे लिहा.
- मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत बेरिलिअमचे आधी ठरविलेले 14.09 हे अणुवस्तुमान बदलून ....... असे दुरुस्त केले.
- मूलद्रव्याची विद्युत धनता किंवा विद्युत ऋणता जेवढी जास्त तेवढी त्याची ........ जास्त.
- आधुनिक आवर्तसारणी म्हणजे काय?
- धातू गुणधर्म म्हणजे काय?
- आधुनिक आवर्तसारणीचे चार खंड कोणते?
- मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत कोणत्या दोन मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान आहेत?
- डोबरायनर त्रीकाचा नियम लिहा.
- .......... हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म प्रमाण मानून मेंडलीव्हने त्याकाळ ज्ञात असलेली 63 मूलद्रव्य त्यांच्या अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमाने आवर्तसारणीत मांडली.
- क्लोरीनची दोन समस्थानिके लिहा.
- डी-खंडातील मूलद्रव्यांना ..,. मूलद्रव्य म्हणतात.
- आधुनिक आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्यांची मांडणी त्यांच्या ......... नुसार केलेली आहे.
▬▬▬۩۞۩▬▬▬
*आयुष्यात आपल्यालाजे चांगले मिळाले आहेते दुसऱ्यालाही मिळावंहा विचार ज्या वेळीआपल्या मनात जन्म घेतो,*_*तेव्हापासून आपला प्रवासनिरपेक्ष माणुसकीच्याआणि
आपुलकीच्या दिशेने सुरु होतो...!!*_
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷श्री ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा