स्वाध्याय, 9 वी, विज्ञान, 1 गतीचे नियम.
┈┉┅━ ❍❀🔘❀❍ ┈┉┅━
*~ माहिती 𓂃🌸विज्ञानांची🎷 ⸙𓂃🧿~*
t = 6 second
a = ?
t = 6 m/s
a = ?
v = 9 m/s
s = ?
➖♾️⭕✨🟤✨⭕♾️➖
*न कळत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर*
*तुमच्यामुळे आलेलं हसू हेच*
*तर खरं पुण्य आहे, कारण*
*पुण्य ठरवून करता येत नाही*
*निस्वार्थ केलेल्या कृतीतून*
*आपोआप तुमच्या पदरात पडत....* ▬▬▬▬▬
निव्वळ लिखाण📝 म्हणजे अभ्यास नव्हे.
अभ्यास करणाऱ्या📚 मुलांपेक्षा अभ्यास न करणारी मुलं ही दरी प्रचंड वाढत आहे.
बऱ्याच पालकांना असे वाटते की आपली मुलं लिहीत ✍️ आहेत म्हणजे अभ्यास करत आहेत. ती मुलं केवळ इकडून पाहून तिकडे लिहीत🖊️ असतात.
✨❀🔘❀✨
नम्र विनंती:- हा उपक्रम म्हणजे पूर्ण अभ्यास नव्हे. विद्यार्थ्याने खरोखर धडा व्यवस्थित वाचला आहे की नाही, त्याला धड्याचे आकलन झाले आहे का नाही यासाठी चा हा प्रयत्न आहे.
शिक्षकाच्या हातात प्रयत्न करणे हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे. मुलांना स्वाध्याय दिल्यावर मुलं नवनीत, कोहिनूर, इन माय पॉकेट..... यामधून पाहून लिहितात. असे कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा त्यांच्यात बदल करण्यासाठी धड्यातून स्वाध्याय दिल्यास तो धडा वाचणे मुलांना क्रमप्राप्त ठरेल.
धडा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधून लिहिल्यास त्यांचा लिखाण सरावा सोबत अभ्यास वाढेल.
पाठ्यपुस्तकातून प्रश्न देताना ही काळजी घेतली की धड्याप्रमाणे सलग प्रश्न न विचारता कोणत्याही पानावरचे प्रश्न हे क्रमशः राहणार नाहीत.
~*◄⏤͟͞✥➳
- एका तोफेचे वस्तुमान 500 kg असून त्यातून तोफगोळा उडवल्यानंतर तोफ 0.25 m/s वेगाने प्रतिक्षेपित होते, तर तोफेचा संवेग काढा.
- न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम लिहा.
- एकसमान गती व नैकमान गतीसाठी अंतर-काल आलेखत काय फरक आहे.?
- SI पद्धतीनुसार संवेगाचे एकक........ आहे.
- ......... गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापते.
- व्याख्या लिहा:- एक न्यूटन.
- चाल अंतराशी संबंधित आहे तर ...... विस्थापनाशी संबंधित आहे.
- दैनंदिन जीवनातील वर्तुळाकार गतीची दोन उदाहरणे लिहा.
- न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत लिहा.
- ...... ही सापेक्ष संकल्पना आहे.
- 1 N = ..... × ....
- त्वरणाची व्याख्या लिहा.
- पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ...... आहे.
- गतीविषयक दुसरे समीकरण लिहा.
- वस्तुचे ....... हे वस्तुमानाशी निगडित आहे.
- संवेग म्हणजे काय?
- संवेग अक्षय्यतेचा सिद्धांत लिहिला.
- अंतर - व्याख्या लिहा.
- प्रतिक्षेप म्हणजे काय?
- एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला ...... म्हणतात.
- एक गोल फिरणाऱ्या चकतीच्या कडेला एक पाच रुपयाचे नाणे ठेवल्यास नाण कोणत्या दिशेला फेकले जाते?
- एखाद्या वस्तूने एकक कालावधीत एकाच दिशेने कापलेल्या अंतरास ....... म्हणतात.
- व्याख्या लिहा- एक डाइन.
- ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विराम अवस्थेत येते त्यावेळी अंतिम वेग किती असेल?
- न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम लिहा.
- हवेतील ध्वनीची चाल ...... m/s आहे.
- न्यूटनचे गतीविषयक पहिला नियम लिहा.
- टक्कर होताना ......... नेहमी अक्षय्य राहतो.
- ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा ....... असे म्हणतात.
- SI पद्धतीत बलाचे एकक ........ आहे.
- एकसमान वर्तुळाकार गतीची व्याख्या लिहा.
- संवेगाचे सूत्र लिहा.
- समलंब चौकोन क्षेत्रफळ - सूत्र लिहिले.
- धनत्वरण केव्हा असते?
- v = 39 m/s
t = 6 second
a = ?
- जर वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला ........... गती म्हणतात.
- गतीविषयक तिसरे समीकरण लिहा.
- नैकसमान गतीची व्याख्या लिहा.
- s = 72 m
t = 6 m/s
a = ?
- चालीचे मापन अंतर/काल याप्रमाणे सर्वप्रथम ............ केले होते.
- विस्थापन- व्याख्या लिहा.
- त्वरणाचे सूत्र a = ........
- F = ...... × ......
- जर एखादी वस्तू सभोवतालच्या संदर्भात तिची जागा बदलत असेल तर ती ......... आहे असे म्हणतात.
- CGS पद्धतीत बलाचे एकक ........ आहे.
- प्रकाशाची निर्वात चाल .......... इतकी आहे.
- जेव्हा एखाद्या गोष्टीचा वेग कमी होतो तेव्हा त्वरण ........ असते.
- a = 2 m/s^2
v = 9 m/s
s = ?
- चाल आणि ...... यांची एकके सारखीच असतात.
- 1 डाइन = ..... × ......
*न कळत दुसऱ्याच्या चेहऱ्यावर*
*तुमच्यामुळे आलेलं हसू हेच*
*तर खरं पुण्य आहे, कारण*
*पुण्य ठरवून करता येत नाही*
*निस्वार्थ केलेल्या कृतीतून*
*आपोआप तुमच्या पदरात पडत....* ▬▬▬▬▬
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा