इयत्ता 8 वी, स्वाध्याय, 1. सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण.
अभ्यास करणाऱ्या📚 मुलांपेक्षा अभ्यास न करणारी मुलं ही दरी प्रचंड वाढत आहे.
बऱ्याच पालकांना असे वाटते की आपली मुलं लिहीत ✍️ आहेत म्हणजे अभ्यास करत आहेत. ती मुलं केवळ इकडून पाहून तिकडे लिहीत🖊️ असतात.
नम्र विनंती:- हा उपक्रम म्हणजे पूर्ण अभ्यास नव्हे. विद्यार्थ्याने खरोखर धडा व्यवस्थित वाचला आहे की नाही, त्याला धड्याचे आकलन झाले आहे का नाही यासाठी चा हा प्रयत्न आहे.
शिक्षकाच्या हातात प्रयत्न करणे हे सगळ्यात मोठे शस्त्र आहे. मुलांना स्वाध्याय दिल्यावर मुलं नवनीत, कोहिनूर, इन माय पॉकेट..... यामधून पाहून लिहितात. असे कॉपी-पेस्ट करण्यापेक्षा त्यांच्यात बदल करण्यासाठी धड्यातून स्वाध्याय दिल्यास तो धडा वाचणे मुलांना क्रमप्राप्त ठरेल. धडा वाचून प्रश्नांची उत्तरे शोधून लिहिल्यास मुलांचा लिखाण सरावासोबत अभ्यास वाढेल.
पाठ्यपुस्तकातून प्रश्न देताना ही काळजी घेतली की धड्याप्रमाणे सलग प्रश्न न विचारता कोणत्याही पानावरचे प्रश्न हे क्रमशः राहणार नाहीत.
◄⏤͟͞✥➳🎸◄⏤͟͞✥➳
- कवकांची पेशीभित्तिका ‘.........’ या जटील शर्करेपासून बनलेली असते.
- तंबाखू मोझाईक विषाणू .......... वनस्पतीवर परिणाम करतो.
- लहान काडीसारखे सूक्ष्मजीव लॅक्टोबॅसिलाय जीवाणू ....... आढळतात.
- .........चा आकार 1 मायक्रो m ते 10 मायक्रो m असतो.
- प्लाज्मोडिअम व्हायवॅक्स मुळे ....... हा आजार होतो.
- ओळखा पाहू मी कोण ? मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो.
- इ.स. 1866 साली ....... यांनी 3 सृष्टी कल्पिल्या त्या म्हणजे प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी.
- .......... चा आकार सुमारे 10 nm ते 100 nm यादरम्यान असतो.
- विषाणू म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेला लांबलचक रेणू असून त्याला ....... चे आवरण असते.
- ......... चे प्रजनन बहुधा द्विखंडीभवनाने होते.
- बहुसंख्य ....... मृतोपजीवी आहेत ते कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात.
- इ.स. 1938 मध्ये ......... यांनी सजीवांना 4 सृष्टी मध्येविभागले - मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती व प्राणी.
- 1 मीटर = ......... मायक्रोमीटर.
- इ.स. 1735 मध्ये ...... ........ यांनी सजीवांना 2 सृष्टीत विभागले. वनस्पती व प्राणी सृष्टी.
- राष्ट्रीय विषाणू संस्था, ...... विषाणु संदर्भातील संशोधनाचे कार्य करते.
- रॉबर्ट हार्डींग व्हिटाकर यांनी इ.स. 1969 मध्ये सजीवांची ....... गटांत विभागणी केली.
- 1 मीटर = ......... नॅनोमीटर (nm)
- बॅक्टेरिओफाज हे विषाणू ......... वर हल्ला करतात.
- कवकांची कोणतीही दोन उदाहरणे द्या.
- आकारानुसार पुढील नावे उतरत्या क्रमाने लिहा. जिवाणू, कवक, विषाणू, शैवाल.
- आदिजीवांचा आकार सुमारे ....... मायक्रो मिटर इतका असतो.
- 2011 च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे ....... दशलक्ष जाती ज्ञात आहेत.
- प्रचलनासाठी छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका असणारी सृष्टी ......... .
- ...... ना साामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव-निर्जिवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात.
🪘 जैविक वर्गीकरण- व्याख्या लिहा.
_*तुमची ताकद
तुमच्या आवाजात नाही ,
तर तुमच्या शब्दात ठेवा.*_
_*कारण पिके
पावसात वाढतात,
पुरात नाही.*_
*आपला दिवस आनंदी जावो.*🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा