अबब 💯 % 🎷
सर्वप्रथम दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 🏆🎷✈️.
_*वर्तमान काळ आखीव असल्यास, भविष्यकाळ रेखीव बनतो...!*🎷
▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
10 वी च्या परीक्षेत 100 % गुण मिळवणारे ‘हुश्शार विद्यार्थी🎷'
यश छप्पर फाडके .....
काही पालकांना मुलाला केवळ 35 % गुण मिळाले तरीही खूप आनंद🚁 होतो. त्याच आनंदात ते पेढे पण वाटतात.
तर..... काही पालकांना त्यांचा आनंद गगनात☁️ मावत नाही कारण त्यांच्या मुलांनी बोर्ड परीक्षेत 100 टक्के गुण ✈️ मिळवलेले असतात.
.... चा अर्थ आनंद☺️ हा आपल्या मानण्यावर असतो.
▬▬▬۩۞۩▬▬▬
नुकत्याच बोर्ड परीक्षेत भीम पराक्रम केलेल्या विद्यार्थ्यांबद्दल आपण बोलत आहोत. हे वाटते तेवढे सहज शक्य झालेले नसते. यामागील सातत्य आपल्याला माहीत नसते.
काही विद्यार्थ्यांच्या मार्क मेमो सोबत अधिक + ..... चे गुणही दिसतात. बऱ्याच जणांना असे वाटेल की या अधिकच्या गुणामुळे यांना शंभर टक्के गुण मिळाले. पण हे अधिकचे गुण मिळवण्यासाठी त्यांनी जे परिश्रम घेतलेले असतात ते पण वाखाणण्याजोगे असते.
SSC बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना कला, क्रीडा आणि इतर सह-शैक्षणिक क्रियाकलाप आणि सामाजिक सेवा यांमध्ये सहभाग नोंदवता येतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना 15 गुणांपर्यंत अतिरिक्त गुण मिळू शकतात.
पण वाटते तेवढे हे सहज सोपे नाही.... सुरुवातीला ही मुलं गुणांसाठी एखादी क्रिया करत नाहीत. केवळ आवड, छंद म्हणून कला जोपासली जाते. अंदाजे सात वर्ष, आठवड्यातले 4 (किंवा त्यापेक्षा जास्त) दिवस या कलेसाठी दिल्यावर 15 गुण मिळू शकतात.
ही कला/क्रीडा जोपासण्यासाठी दिलेला वेळ, केलेला खर्च या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर .......
हे कला/ क्रीडा अभ्यासून 3 ते 15 गुण + चे गुण सर्वांना दिसतात पण त्यामागचा त्याग, परिश्रम, खर्च, पालकांची उडालेली तारांबळ हे पण विचारात घेतलेच पाहिजे.
पण या कलाक्रेडेचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे छंद जोपासला, जातो चालू अभ्यासक्रमात विषय बदल होतो, मन fresh होते. कला / क्रीडा चे सर्टिफिकेट व मेडल्स 🏆,🏅 यांच्याकडे पाहिल्यावर जो आनंद होतो तो शब्दात व्यक्त करता येत नसतो.
®®®💠®®®
महाराष्ट्रात लातूर पॅटर्न फेमस झाला. आता नांदेड पॅटर्न सुद्धा फेमस होत आहे. लातूर पॅटर्न चा परिणाम असा आहे की या ठिकाणी गुणातून यश मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.
💯 टक्के गुण मिळवण्यात लातूर आघाडीवर आहे. यावर्षीच्या निकालात एकूण 211 विद्यार्थ्यांना 100 % गुण मिळाले आहेत. 100 % गुण मिळवणारे विद्यार्थी लातूर जिल्ह्यातील जास्त आहेत. लातूर विभागात एकूण 113 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत, त्यामुळे यशाच्या बाबतीत हा जिल्हा अव्वल ठरला आहे.
SSC बोर्ड परीक्षेसाठी राज्यभरातून 9 शिक्षण विभाग पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी विभागातून कोणत्या विभागात किती विद्यार्थी हे पाहू.
- पुणे: 13
- नागपूर: 3
- छत्रपती संभाजीनगर: 40
- मुंबई: 8
- कोल्हापूर: 12
- अमरावती: 11
- नाशिक: 2
- लातूर: 113
- आणि
- कोकण: 9
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा