श्रीराम 🙏
सर्व राम भक्तांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🎷👏💐
भारतीय आणि राम हे एक अतूट नाते आहे. कितीही रामनाम घेतले, कितीही राम जप केला तरीही मन♥️ भरत नाही.
हे रोम रोम में बसने वाले राम,
जगत के स्वामी,
हे अन्तर्यामी,
मैं तुझ से क्या मांगू,
हे रोम रोम में बसने वाले राम ।।
मनाला तृप्ती, चित्ताला शांती केवळ ऐकण्याने मिळते....
सर्वात जुनं राम मंदिर महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये आहे. प्रभू श्रीराम आणि अगस्त्य ऋषी यांची भेट रामटेक मंदिरात झाली होती. गड मंदिर फक्त दगडांनी बनवलेले आहे, जे एकमेकांच्या वर ठेवलेले आहेत. भगवान श्रीरामाने माता सीता आणि बंधू लक्ष्मणासोबत वनवासातील चार महिने या ठिकाणी घालवले होते. याशिवाय माता सीतेने येथे पहिले स्वयंपाकघर बांधले होते, स्वयंपाक केल्यानंतर माता सीतेने स्थानिक ऋषींना भोजन 🌾 दिले.
ग. दि. माडगुळकर यांचे गीत रामायण हे मराठी सुश्राव्य भावगीतकाव्य गीत रामायण ऐकल्यावर जो आनंद मिळतो तो स्वर्गीयच🎷....
चैत्रमास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्त तरिही वात उष्ण हे किती!
दोन प्रहरीं कां ग शिरीं सूर्य थांबला
राम जन्मला ग सखी राम जन्मला,
रामनवमीच्या शुभेच्छा!
नवनाथ हे श्रीरामांचे परमभक्त होते.
विधीपूर्वक केवळ एका मंत्राचा जप केला असता संपूर्ण रामायण चे फळ मिळते. यास एक श्लोक की रामायण असे म्हणतात
आदि राम तपोवनादि गमनं,
हत्वा मृगं कांचनम्।
वैदीहीहरणं जटायुमरणं,
सुग्रीव संभाषणम्।।
काकभूशुंडीने:- वेद आणि पुराणांनुसार, काकभूशुंडीने 11 रामायण आणि 16 महाभारत पाहिले आहेत. भुशुंडी कल्पाच्या शेवटापर्यंत त्याच्या शाश्वत स्वरूपात जिवंत राहील.
काकभुशुंडी ज्याला भुशुंडी असेही म्हणतात, हे हिंदू साहित्यात चित्रित केलेले एक ऋषी आहेत .
+*+*+*+*+*+*+
श्री रोकडेश्वर देवस्थान माळकौठा
तालुका:- मुदखेड, जिल्हा:- नांदेड.
🎻 श्रीराम नवमी निमित्त काही रामायणांचा आज आपण परिचय करून घेणार आहोत.
- संवृत रामायण : हे सप्तसोपान रामायण नारदांनी सांगितले आहे. यात 24000 श्लोकांचे वर्णन आढळते. याचा रचना काळ हा रैवत मन्वंतरातील पाचवे सत्ययुग आहे.
- अगस्त्य रामायण : रामजन्म निमित्त या रामायणातील घटनावर्णन अगस्त्य ऋषींनी केले आहे. 16000 श्लोक असलेल्या या रामायणाचे लेखक महर्षी अगस्त्य यांनी स्वरोच्य मन्वन्तराच्या दुसऱ्या सत्ययुगात अगस्त्य रामायण रचले.
- लोमश रामायण : ऋषी लोमश यांनी लिहिलेल्या रामायणात जलंधराचे कारण रामावतार आहे असे म्हटले जाते. सीता म्हणजे मिथीलाधिपतीला दिसलेली योगमाया असे यात म्हटले आहे. स्वयंभू मन्वंतराच्या 162 व्या त्रेतामध्ये 32000 श्लोकांची माहिती मिळते.
- मंजुळ रामायण : मंजुळ रामायण यात सुतीक्ष्ण ऋषींनी भक्तिवर्णनात्मक रामायण लिहीले आहे. 1,20,000 हजार श्लोक असलेल्या मंजुळ रामायणाचा उल्लेख ऋषी सुतीक्ष्ण यांनी स्वरोच्य मन्वन्तराच्या 14 व्या त्रेतामध्ये केला आहे.
- सौपद्य रामायण : यात अत्री ऋषींनी भक्तिरसातून रामायण लिहीले आहे. सौपद्य रामायण यात 62,000 श्लोक आहेत. रैवत मन्वन्तराच्या 16 व्या त्रेतामध्ये अत्रि ऋषींनी हे निर्माण केले.
- महामाली रामायण : शिवपार्वती संवादातून याची निर्मिती झाली आहे.यात 56,000 श्लोक आहेत. त्याचा काळ तामस मन्वंतराचा दशम त्रेता आहे.
- सौहाद् रामायण : वैवस्वत मन्वन्तरच्या नवव्या त्रेतामध्ये ऋषी शरभंग यांनी सौहाद् रामायण निर्मिती केली. त्यात 40,000 श्लोक आहेत.विशेष म्हणजे हे बरेचसे वाल्मिकी रामायणासारखे आहे.
- मणिरत्न रामायण: वसिष्ठ-अरुंधती संवादात्मक रामायण आहे. यात 36,000 श्लोक आहेत. याच्या रचनेचा काळ तमस मन्वन्तराचा 14 वा त्रेता आहे.
- सौय्य रामायण : हनुमान आणि सूर्यात झालेला संवाद या रामायणात आहे आणि तेच याचे रचेते आहेत. यात 62,000 श्लोक आहेत. हा हनुमान आणि सूर्य यांच्यातील संवाद आहे. याचा काळ वैवस्वत मन्वंतराचा 20वा त्रेता आहे.
- चांद्र रामायण : चांद्र रामायण यामध्ये 75,000 श्लोक आहेत. हा हनुमान चंद्रमा संवाद आहे. त्याचा काळ रैवत मन्वंतराचे 32 वे त्रेतायुग आहे.
- मैन्द्र रामायण : या रामायणात मैन्द्र कौरव संवाद आहेत. याचा काळ रैवत मन्वंतराचे 21वे त्रेतायुग आहे व यात 52,000 श्लोक आहेत.
- स्वायंभुव रामायण : यात 18,000 श्लोक आहेत. त्याचा काळ स्वयंभु मन्वंतराचा 32वे त्रेता आहे. सीता हि मंदोदरीची कन्या, असे सांगणारे ब्रह्मदेव-नारद यांच्या संवादाचे हे रामायण आहे.
- सुब्रह्म रामायण : यात अनेक विषयांचा समावेश आहे तसेच प्रयाग सारख्या तीर्थक्षेत्राचे महत्त्वदेखील अधोरेखित केले आहे. याचे कर्ते कोण याचा उल्लेख नाही. 32,000 श्लोक असलेल्या या रामायणाचा काळ वैवस्वत मन्वन्तराचा 13 वे त्रेतायुग आहे.
- सुवर्चस रामायण :सुग्रीव तारा संवादाच्या या रामायणात 15,000 श्लोक आहेत. त्याचा काळ वैवस्वत मन्वंतराचा 18वे त्रेता आहे. वाली-रामसंवाद, धोबी-धोबीपत्नी संवाद, लवकुश- राम युद्ध, महारावण युद्ध व वध, इ. विषयांचे वर्णन सुग्रीव आणि तारा यांच्या संवादातून निर्माण झाले आहे.
- देव रामायण : रामपरीक्षा, कोप, रामशरणागती, रामविजय इ. सांगणारे हे रामायण, इंद्र-जयंत यांच्यातील संवाद आहे. यात 10,000 श्लोक आहेत. याचा काळ तामस मन्वन्तराचा 6 वे त्रेता आहे.
- श्रवण रामायण : चित्रकूटावर राम-भरत संवादाचा हा भाग आहे,(काही इंद्र जनक व वाली यांच्यातील हा संवाद सांगतात). इंद्र आणि राजा जनक यांच्या संवादाचे श्रवण रामायण रूप आहे.त्यात 1,25,000 हजार श्लोक आहेत. याचा कालखंड स्वयंभु मन्वंतराचा ४० वा सत्ययुग हा आहे.
- दुरन्त रामायण : राम परत आल्यावर भरताने रामाला राज्य देणे, कैकयी क्षोभ, किष्किंधावर्णन, श्रीरामाची वालीवध प्रतिज्ञा, रामप्रसादाचा प्रभाव, इ. विषय असणारे दीर्घ रामायण. वसिष्ठ मुनी आणि राजा जनक यांच्यातील संवाद आहे. 61,000 श्लोक असलेल्या या रामायणाचा काळ वैवस्वत मन्वंतराचा 25वा त्रेता आहे.
- चंपू रामायण : रामभक्ती प्रकार, रामध्यान इ. विषय सांगणारे रामायण संवाद, शिव नारद संवादकर्ते असून तेच या रामायणाचे निर्माते आहेत.यात 15,000 श्लोक आहेत.
मर्यादापुरुषोत्तम, त्याग कर्तव्य आणि न्यायाचे पालन कर्ते, सद्गुणसंपन्न आदर्श राजा, विष्णूचे अवतार,धर्म आणि मर्यादेचे प्रतीक, आर्य धर्माचे रक्षक, मानवतेचे रक्षणकर्ता, धैर्यवान आणि सहनशील लोकनेते,सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे सुपुत्र,सत्यवचनी, एकपत्नीव्रत व परम दयाळू श्री राम हे भारतीय भूमीच्या प्रत्येक कणा कणात व मना मनात आहेत.
श्री रामरक्षा स्तोत्र यासोबत काही स्तोत्र हे आपणास श्रीरामांच्या भक्तीसाठी उपयुक्त ठरतात.🙏
घरात एखादे लहान मुलं भिडले असेल तर... श्रीराम रक्षा म्हणून ते मंतरलेले पाणी चेहऱ्यावर तीन वेळेस मारल्यास त्याची भीती नाहीशी होते.
राम रक्षा व्हिडिओ 👇
- रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः
- ओम जानकी वल्लभाय स्वाहा
- ओम रामचंद्राय नमः
- ओम राम भद्राय नमः
- ॐ दाशरथये विद्महे, सीता वल्लभाय धीमहि, तन्नो रामा: प्रचोदयात्
- ॐ आपदामप हर्तारम दातारं सर्व सम्पदाम, लोकाभिरामं श्री रामं भूयो भूयो नामाम्यहम
- श्री राम रामेति रोमेति, रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं, श्री राम-नाम वरानने
जय श्रीराम 🙏👏🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा