विजय.... विज्ञानाचा 🎷
●~~•❅••❅•~~●
केवळ आठ दिवसांसाठी अंतराळात गेलेल्या सुनिता विल्यम आणि बॅरी विलमोर यांचा अंतराळातील मुक्काम हा तब्बल 286 दिवसांपर्यंत वाढला. पण... अंतराळातील मुक्काम लांबण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत.भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांच्याशी आपण किती प्रमाणात बांधल्या गेलोत, कल्पने पलीकडचा प्रवास करून त्यांचे सुखरूप पृथ्वीवर येणे हे खूपच सुखद आहे. संपूर्ण पृथ्वीवरील मानव जातीस जो आनंद प्राप्त झाला तो कल्पने पलीकडचा.
दृढनिश्चयाची आणि धैर्य यांनी परिपूर्ण असे जगातील पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांनी मानवासाठी एक नवीन क्षेत्र उघडून दिले.
एका साध्या शेतकरी कुटुंबातील युरी अलेक्सेविच गागारिन हे अवकाश संशोधनाच्या इतिहासातील पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करणारा पहिला मानव.
युरी गॅगारिन यांनाच का निवडले गेले?
युरी गॅगारिनची शारीरिक तंदुरुस्ती💪, लहान उंची🤏 (5 फूट 2 इंच) आणि महत्त्वाचे म्हणजे मानसिक🧠 कणखरता यामुळे या मोहिमेसाठी युरी गॅगारिन एक आदर्श उमेदवार बनले. सकारात्मक विचारसरणी आणि कोणत्याही परिस्थितीत हसण्याची😀 सवय यामुळे निवडकर्ते प्रभावित झाले.
हिरो ऑफ द सोव्हिएत युनियन'म्हणजे युरी गॅगारिन यांनी अवकाशातून पृथ्वी पाहिली आणि म्हणाले, 'पृथ्वी निळी🌏 आहे, किती सुंदर😍 आहे!' प्रदीर्घ प्रशिक्षणानंतर, 12 एप्रिल 1961 रोजी, गॅगारिनची व्होस्टोक-1 अंतराळयानातून अंतराळात जाण्यासाठी निवड झाली. हे अभियान ऐतिहासिक होते, कारण यापूर्वी कोणताही मानव अंतराळात गेला नव्हता.
प्रसिद्ध🎷 अंतराळवीरांची यादी
- युरी गागारिन:- अंतराळात जाणारा पहिला मानव
- ॲलन शेपर्ड:- अवकाशात जाणारा पहिला अमेरिकन, चंद्रावर 🌙 चालणारा पाचवा व्यक्ती.
- नील आर्मस्ट्राँग:- चंद्रावर जाणारा पहिला मानव.
- व्हॅलेंटीना तेरेशकोवा:- अंतराळात जाणारी पहिली रशियन महिला. निवड का झाली?शारीरिक तंदुरुस्ती आणि एकाग्रते मुळे निवडली गेली.
- सॅली राइड:- अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला.विद्यार्थ्यांना STEM क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रोत्साहित केले.
- जॉन ग्लेन:- अंतराळातील सर्वात वयस्कर(77 व्या वर्षी) व्यक्ती.
- बझ ऑल्ड्रिन:- आर्मस्ट्राँगसोबत चंद्रावर जाणारा दुसरा व्यक्ती.
- सुनीता विल्यम्स:-चिकाटी आणि समर्पण हे महत्त्वाचे गुण. सर्वात जास्त काळ अंतराळात राहणारी महिला.
- ख्रिस हँडफिल्ड:- करिष्माई व्यक्तिमत्वाचे आणि आकर्षक संवाद कौशल्य असलेले पहिले कॅनेडियन.
- कल्पना चावला:- भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर.अवकाशात जाणारी पहिली भारतीय वंशाची महिला. दोन वेळेस अंतराळ उड्डाण.30 दिवसांहून अधिक काळ अंतराळात.
- पेगी व्हिटसन:- महिलेने सर्वाधिक काळ अंतराळात चालण्याचा विक्रम (62 तास आणि 1 मिनिट). सात अंतराळ मोहिमांमध्ये भाग.
- फ्योदोर युरचिखिन:- या व्यक्तीस प्रथम दंडवत. सर्वाधिक अंतराळयात्रा (70!) करण्याचा विक्रम. सहा मोहिमांमध्ये अवकाशात तब्बल 847 दिवस. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) देखभाल आणि असेंब्लीची कामे केली, त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे आणि लवचिकतेचे यथार्थ प्रदर्शन केले.
शांत स्वभाव आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यासाठी ओळखले जाणारे युरचिखिन यांनी अनेक आयएसएस मोहिमांच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
- कोइची वाकाटा:- पाच अंतराळ उड्डाणांवर जाणारा पहिला जपानी अंतराळवीर. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या अंतराळयानांवर उड्डाण करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक. अंतराळ स्थानकावर एकट्याने बेसबॉल खेळले.
- जेसिका वॉटकिन्स:- पहिली कृष्णवर्णीय महिला
- लिऊ यांग:- चीनमधील पहिल्या महिला अंतराळवीर. 13दिवस अंतराळात घालवले.
- राकेश शर्मा:-अंतराळात जाणारे पहिले भारतीय नागरिक.
- मे जेमिसन:- अंतराळात जाणारी पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला.
💚अंतराळात जाणारा पहिला सजीव कोणता?
अंतराळात जाणारा पहिला सजीव एक कुत्रा होता, ज्याचे नाव 'लायका'.
अंतराळयानातून पृथ्वीभोवती फिरल्यानंतर, लायकाचा काही तासांतच मृत्यू झाला, कारण अंतराळयानात तापमान वाढले होते.
यानंतर बेल्का आणि स्ट्रेलका या दोन कुत्र्यांनीही अंतराळात प्रवास केला, सुदैवाने ते जिवंत परतले हे मोठे यश .
👑 सर्वाधिक काळ अंतराळात राहणारा?
अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांच्या नावाने आहे, ज्यांनी 878 दिवसांपेक्षा जास्त काळ अंतराळात घालवला आहे.
📯 चंद्रावर 🌕 चालणारे 🙏
- अपोलो-11 मोहिमेचा भाग म्हणून नील आर्मस्ट्राँग यांनी 20 जुलै 1969 रोजी पहिल्यांदा1️⃣ चंद्रावर🌙 पाऊल ठेवले होते. आर्मस्ट्राँग चंद्रावर 2 तास 31 मिनिटे💪 होते.
- अपोलो-11 मोहिमेदरम्यान बझ आल्ड्रिन हे नील आर्मस्ट्राँगसोबत होते. चंद्रावर चालणारे👣 जगातील दुसरे2️⃣ व्यक्ती होते.
- पीट कॉनरॅड हा चंद्रावर चालणारा तिसरा3️⃣ माणूस होता. अमेरिकेने नोव्हेंबर 1969 मध्ये अपोलो 12 मोहीम फत्ते केली होती.
- ॲलन बीन हा पीट कॉनराडसोबत चंद्रावर गेला होता. तो अपोलो 12 मोहिमेचा भाग होता. ॲलन चंद्रावर चालणारा चौथा4️⃣ व्यक्ती ठरला.
- ॲलन शेपर्ड हा चंद्रावर चालणारा पाचवा5️⃣ माणूस होता. अपोलो 14 मोहिमेचा भाग म्हणून ते फेब्रुवारी 1971 मध्ये चंद्रावर गेले.
- एडगर मिशेल यांनी अपोलो 14 मोहिमेचा भाग म्हणून चंद्रावर पाऊल ठेवले. अशी कामगिरी करणारी ती सहावी6️⃣ व्यक्ती ठरली. त्यांनी चंद्राच्या पृष्ठभागावर नऊ तास काम केले.
- 7️⃣ डेव्हिड स्कॉट
- 8️⃣ जेम्स इर्विन
- 9️⃣ जॉन यंग
- 🔟 चार्ल्स ड्यूक
- 🕚 यूजीन सर्नन
- 🕛 हॅरिसन स्मिथ
अंतराळवीर काय खातात?
निर्जलीकरण केलेले, पॅकेज केलेले आणि लहान तुकड्यांमध्ये असलेले अन्न खातात. कारण ते सहजपणे खाऊ शकतील आणि अन्नपदार्थ तरंगणार नाहीत. ते ड्राय फ्रूट्स, पीनट बटर, चिकन, सी-फूड्स, कॅंडी आणि ब्राऊनींसारखे पदार्थ खातात. तसेच कॉफी, चहा आणि फळांचे रस देखील पिऊ शकतात.
पूरक आहार:- नासाने स्पायरुलिना (एक पोषक शैवाल) चा वापर अंतराळवीरांसाठी आहारातील पूरक म्हणून केला आहे.
सुनीता विल्यम्स गोष्ट आपल्या परीची
ड्रॅगन' या स्पेसएक्सच्या अंतराळयानामधून आणखी चार अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावले होते. भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे सर्व अंतराळवीर सुखरुपपणे परतले.
नऊ महिन्यांनंतर भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परत आल्या आहेत. मंथ एंडला आकाशाकडे तोंड करणाऱ्या व्यक्तींसाठी हा एक सुखद अनुभव होता.
पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर कॅप्सूल भोवतीचं बाहेरचं तापमान वाढत असताना PICA 3.0 हीटशील्डने ड्रॅगन फ्रीडमला योग्य संरक्षण दिलं.
दरम्यानच्या काळात अंतराळवीरांनी घातलेल्या स्पेससूट्समधून थंड हवा खेळवली गेली, जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान कमी राहायला मदत होते. ड्रॅगन फ्रीडमला थोडे न थोडके सर्वोच्च तापमान 1926.667° C इतकं प्रचंड होतं. मानवी बुद्धिमत्तेची कमाल म्हणजे
ड्रॅगन हे ऑटॉमॅटिक मोडवर प्रवास करत होतं. म्हणजे ड्रॅगन स्वतःचा मार्ग स्वतः ठरवतं. क्रू यावर फक्त लक्ष👁️ ठेवून होता.
ड्रॅगन फ्रीडम पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आपोआपच वेगवेगळ्या वेळी पॅराशूट्स उघडली. याने कॅप्सूलचा वेग कमी झाला. पॅराशूट्सची पहिली जोडी कॅप्सूल 18000 फुटांवर आल्यावर उघडलं. तर दुसरी मुख्य जोडी 6500 फुटांवर उघडली. यानंतर चार पॅराशूट्सच्या मदतीने ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूल तरंगत खाली आलं.
संजय दृष्टी:- WB57 हाय अल्टिट्यूड विमानाद्वारे ड्रॅगन फ्रीडमच्या पृथ्वी प्रवासाची दृश्यं दिसण्यासाठी मदत होत होती.
प्रवासाचा कालावधी:- अंतराळवीरांचा स्पेस स्टेशन ते पृथ्वीवरचा प्रवास हा सुमारे 17 तासांचा😲 होता.
स्वागताचे शब्द:- क्रू नाईन बॅक ऑन अर्थ🌏... वेलकम होम🎷" अशी घोषणा ग्राऊंड कंट्रोलने करत अंतराळवीरांचं स्वागत केलं.
ड्रॅगन कॅप्सूल समुद्रात कोसळल्यानंतर पॅराशूट्स ऑटोमॅटिकली कॅप्सूलपासून वेगळी झाली. यामागचे कारण पॅराशूट्सोबत कॅप्सूल समुद्र प्रवाहात ओढली जाणार नाही.
प्रथम संवाद पृथ्वीवरील:- रिकव्हरी क्रू ड्रॅगन फ्रीडम पर्यंत पोहोचे पर्यंत ग्राऊंड कंट्रोल आणि कॅप्सूलमधल्या अंतराळवीरांमध्ये संवाद सुरू होता. मुख्य रिकव्हरी टीम्सना इथे पोहोचेपर्यंत 30 मिनिटांचा काळ लागला.
सेफ्टी चेक्स:- रिकव्हरी टीम्स च्या अगोदर फास्ट बोट्स इथे पोहोचल्या त्यांनी समुद्रात पडलेली पॅराशूट्स गोळा केली. त्याच बरोबर समुद्रात तरंगणाऱ्या कॅप्सूलचे काही सेफ्टी चेक्सही करण्यात आले. पुढच्या रिकव्हरी टीमला स्पेसक्राफ्ट पर्यंत येणं सोपं आहे का, हे ही तपासण्यात आलं.
दरम्यान कॅप्सूल उचलण्यासाठीची तयारी सुरू झाली.
डॉल्फिन्स🐬:- तरंगणाऱ्या कॅप्सूलच्या आजूबाजूला डॉल्फिन्सही दरम्यानच्या काळात पहायला मिळाले.
मेगन आर्थर 🏋️♂️:- मेगन नावाच्या रिकव्हरी जहाजाला ही कॅप्सूल जोडण्यात आली. नासाच्या अंतराळवीर मेगन आर्थर यांच्यावरून या जहाजाला हे नाव देण्यात आले. जहाजाच्या जवळ ओढल्यानंतर ही कॅप्सूल उचलून🏋️♂️ जहाजाच्या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात आले.
तत्परता, विचारांची दूरदृष्टी:- स्पेसक्राफ्टच्या बाहेरच्या बाजूला समुद्राचं खारं पाणी लागल्याने या पत्र्याची झीज होते. म्हणूनच कॅप्सूलवर गोडं पाणी मारून समुद्राचं खारं पाणी काढलं होतं.
दरवाजा:- ड्रॅगन कॅप्सूलच्या एका बाजूला असणारा दरवाजा 'साईड हॅच' उघडण्यात आले. पृथ्वीवरून उड्डाण करताना कॅप्सूलच्या आत शिरण्यासाठी आणि पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या हॅचचा वापर केला जातो.
हॅच उघडल्यानंतर वैदयकीय टीमपैकी एकजण कॅप्सूलमध्ये गेला. तर रिकव्हरी टीमने अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी कॅप्सूलमधून बाहेर येणारा रॅम्प बसवला.
ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलमध्ये मधल्या दोन सीट्सवर बसलेल्या अंतराळवीरांना सुरुवातीला बाहेर काढण्यात आलं. सगळ्यात आधी नासाचे अंतराळवीर निक हेग यांना बाहेर काढलं गेलं. त्यानंतर रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह, नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना कॅप्सूल मधून बाहेर काढण्यात आले.
स्ट्रेचर:- क्रूला कॅप्सूलमधून बाहेर काढल्यानंतर अंतराळवीरांना स्ट्रेचरवर ठेवतात. हा नेहमीच्या प्रक्रियेचा भाग असतो.
प्राथमिक तपासणी:- रिकव्हरी टीम्समध्ये डॉक्टर्सचाही समावेश असतो. हे डॉक्टर्स पृथ्वीवर परतलेल्या अंतराळवीराच्या तब्येतीची प्राथमिक तपासणी करतात. दीर्घकाळ अंतराळात घालवून पृथ्वीवर परतणाऱ्या अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठीची आणि त्यानंतरची प्रक्रिया ठरलेली असते.
क्रू:- ड्रॅगन स्पेसक्राफ्ट उचलून क्रूला बाहेर करण्यासाठी साधारण तासाभराचा काळ लागला. मेडिकल चेकअप नंतर चार तासांत क्रू जमिनीवर येऊ शकतात. जर त्यांना अधिकची वैद्यकीय मदत लागली नाही तर क्रू नासाच्या विमानाने ह्यूस्टनला जातील आणि हे अंतराळवीर कुटुंबीयांना - मित्रमंडळीं सामान्यपणे भेटू शकतात.
परतलेले एकदचे अंतराळवीर सुखरूप. संपूर्ण मानव जातीने एक सुटकेचा निःश्वास सोडला.
वय वर्ष 59
😍अंतराळ स्थानकातील अविस्मरणीय भेट व झालेला आनंद पाहण्यासाठी खालील लिंक क्लास स्पर्श करा👇
🎻सुनीता विल्यम्स पृथ्वीवर 🌏
इतका मोठा कालावधी अंतराळात राहणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक असणारच.
नासाने 2030 पर्यंत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद करण्याची योजना आखली आहे. कारण आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे आयुष्य संपले आहे आणि नवीन तंत्रज्ञानासह अंतराळ स्थानकाची आवश्यकता असल्याने नवीन शोधांसाठी अधिक आधुनिक अंतराळ स्थानकाची आवश्यकता असेल.
अंतराळ स्थानकास कसे नष्ट केले जाईल?आयएसएसला बाहेर काढण्यासाठी एक विशेष अंतराळयान विकसित केले जाईल, जे अंतराळ स्थानकास पृथ्वीच्या कक्षेतून सुरक्षितपणे बाहेर काढेल.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक नेमके आहे तरी कसे?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक दर 90 मिनिटांनी पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. याचा अर्थ 24 तासात 16 वेळेस सूर्योदय व 16 वेळेस सूर्यास्त या स्थानकातून पहावस मिळते. याचाच दुसरा अर्थ या स्थानकावर 45 मिनिट दिवस व 45 मिनिटाची रात्र असते.
अंतराळ स्थानकाचा वेग 28163 km/h आहे.
पृथ्वीपासून जवळपास 400-415 किमी अंतरावर अंतराळात हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक स्थिरावलेलं आहे. या स्थानकाचा आकार एखाद्या फुटबॉल मैदानाएवढा आहे. अंतराळ स्थानक 109 मीटर लांबीचं असून, त्याचं वजन 400 टन म्हणजे चार लाख किलोहून अधिक आहे.
इलॉन मस्क यांच्या मते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला 2030 पर्यंतचा कालावधीदेखील देता कामा नये. याला दोन वर्षांच्या आतच बंद केलं पाहिजे. कारण उपकरणं आणि हार्डवेअरमुळे यात अनेक गुंतागुंतीच्या समस्या येऊ शकतात, ज्यांना दुरुस्त केलं जाऊ शकत नाही. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक बंद करून ते नष्ट करण्यासाठी एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची निवड केली होती. यासाठी या कंपनीसोबत 84.30 दशलक्ष डॉलर😮😯😲🫢 किमतीचा करार केला होता.
नासाच्या मते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे वातावरणात प्रवेश करताना, अति उष्णतेमुळं, बहुतेक भाग जळतील आणि स्वतःच नष्ट होतील. अंतराळ स्थानकाचे उर्वरित भाग पॅसिफिक महासागराच्या 'पॉइंट निमो' नावाच्या भागात पडेल. नासाचं म्हणणं आहे की, ते ठिकाण लोकवस्तीचं नसल्याने कोणतीही हानी होणार नाही. सहसा नको असलेले अवकाशयान पॅसिफिक महासागराच्या 'पॉइंट निमो' नावाच्या भागात पाडू नष्ट केले जातात.
🎺 भारतीय अवकाश संशोधन संघटना (इस्रो, ISRO) वर्ष 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्टेशन (BAS) विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवून आहे. हे कायम कक्षीय संशोधन केंद्र राहणार असून 400 ते 450 किलोमीटर अंतरावर पृथ्वीभोवती परिक्रमा करेल. सौर ऊर्जेवर चालणारे हे स्टेशन 2035 पर्यंत संपूर्ण कार्यशील होईल अशी आपण सर्व अपेक्षा करू.👏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा