तयारी रासायनिक अभिक्रियेची🎷
▬▬▬۩۞۩▬▬▬
●~~•❅••❅•~~●
सर्वप्रथम आपणास भौतिक बदल व रासायनिक बदल हा फरक समजला पाहिजे.
रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधांचे विभाजन
होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते .
रासायनिक अभिक्रिया लिखाण करणे हे एक उत्तम आव्हान आहे. कारण रासायनिक अभिक्रिया याव्यात असे जर वाटत असेल तर त्यासाठी प्रथम आपणास मूलद्रव्यांची माहीत असणे गरजेचे आहे.
मूलद्रव्यांच्या माहितीनंतर त्या मूलद्रव्यांच्या संज्ञा आपणास आल्या पाहिजेत.
मूलद्रव्यांचे अणुअंक आले तरच त्या अणुअंकानुसार मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण लिहिता येईल.
इलेक्ट्रॉन संरूपण आल्यावर संयुजा इलेक्ट्रॉन आपणास समजते.
संयुजा इलेक्ट्रॉन वरून मूलद्रव्याची संयुजा काढता येते.
मूलद्रव्यांची संयुजा समजल्यावर त्या मूलद्रव्याचा मूलक आपणास लिहिता येतो.
मुलकाचे नाव कधीकधी मूलद्रव्याच्या नावासारखेच किंवा भिन्न असू शकते. त्यामुळे मुलंकाचे नाव आपणास माहीत असणे गरजेचे आहे.
""""----""""
- अभिक्रियाकारक
जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना 'अभिक्रियाकारक किंवा अभिकारक' असे म्हणतात. रासायनिक अभिक्रिया दर्शविण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात.
- उत्पादित
रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना 'उत्पादिते' म्हणतात.
यानंतर आपणास रासायनिक अभिक्रियेचे प्रकार माहित असणे गरजेचे आहे, जसे की,
- संयोग अभिक्रिया,
- अपघटन अभिक्रिया,
- विस्थापन अभिक्रिया,
- दुहेरी विस्थापन अभिक्रिया,
- ऑक्सिडीकरण अभिक्रिया,
- क्षपण अभिक्रिया,
- क्षरण अभिक्रिया,
- उष्मादायी अभिक्रिया,
- उष्माग्राही अभिक्रिया,
- रेडॉक्स रिएक्शन,
- उदासीनीकरण अभिक्रिया, इत्यादी....
- याच सोबत काही वेळेस उत्पादिताचा अंदाज बांधता आला पाहिजे.
=====©©©======
- संयोग अभिक्रिया
जेव्हा एखाद्या अभिक्रियेत दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित
तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात.
- अपघटन अभिक्रिया
ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या
अभिक्रियेला अपघटन म्हणतात.
- विस्थापन अभिक्रिया
जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वत: आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला ‘विस्थापन अभिक्रिया’ म्हणतात.
- दुहेरी विस्थापन अभिक्रिया
ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना
‘‘दुहेरी विस्थापन अभिक्रिया’ असे म्हणतात.
- व्याख्या ऑक्सिडीकरण अभिक्रिया
1. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकरकाचा ऑक्सीजनशी संयोग होतो किंवा ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियांना 'ऑक्सिडीकरण अभिक्रिया' म्हणतात.
- क्षपण
- रेडॉक्स अभिक्रिया:-
- क्षरण
परिसरातील पदार्थामुळे किंवा वातावरणातील घटकामुळे धातूंचे ऑक्सिडीकरण व पर्यायाने त्याची झीज होते त्या क्षरण म्हणतात.
=====©©©======
रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक
- . अभिक्रियाकारकांचे स्वरूप
अभिक्रियाकारकांचे स्वरूप (किंवा अभिक्रियाशीलता) रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम
करते. (धातूंची अभिक्रियाशीलता धातुविज्ञान या पाठातुन अभ्यासावी .
- अभिकारकांच्या कणांचा आकार
रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त
असतो..
- अभिकारकांची संहती
संहत आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद होते म्हणजेच अभिक्रियेचा दर हा अभिकिय्राकारकांच्या
संहतीच्या प्रमाणात बदलतो.
- अभिक्रियेचे तापमान.
आभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो.
तापमान वाढविले की, अभिक्रियेचा दर वाढतो.
- उत्प्रेरक
‘‘ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये मात्र कोणताही
रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात.’’
उत्प्रेरकाच्या सानिध्यात रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो.
●~~•❅••❅•~~●
रासायनिक समीकरण लिहिण्याच्या पायऱ्या आपणास माहित हव्यात.
रासायनिक समीकरणाचे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत.
- रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात.
अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण
या दोेघांच्या मध्ये काढतात. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवितो.
- जर दोन किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक (+) या चिन्हाचा वापर करतात.
- रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनविण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था
समीकरणात नमूद करतात. त्यांच्या वायुरूप, द्रवरूप व स्थायुरूप अवस्था अनुक्रमे (g), (l) व (s) ही अक्षरे कंसात
लिहून दर्शविल्या जातात. तसेच उत्पादित वायुरूप असेल तर (g) ऐवजी
असे वरची दिशा दाखवणा-या बाणाने दर्शवता येते.
- उत्पादित अविद्राव्य स्थायुरूपात तयार झाले असेल म्हणजेच अवक्षेप रूपात तयार झाले असेल तर (s)
ऐवजी असे खालची दिशा
दाखविणा-या बाणाने दर्शवता येते.
- जर अभिक्रियाकारके आणि उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशांना जलीय द्रावण म्हणतात व त्यांच्या पुढे (aq) ही अक्षरे कंसात लिहून त्यांची जलीय द्रावणाची अवस्था दर्शवितात.
- जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वर
हे चिन्ह काढून दर्शवतात.
- काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक, इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते.अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवितात.
- अभिक्रियाकारकांविषयी/उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात.
=====©©©======
रासायनिक समीकरणांचे संतुलन करणे
समीकरणामध्ये अभिक्रियाकारकांमधील
मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या ही उत्पादितांमधील त्या
त्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येइतकीच असेल तर अशा समीकरणाला ‘संतुलित समीकरण’ असे
म्हणतात.
जर प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या
रासायनिक समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान नसेल
तर अशा समीकरणाला ‘असंतुलित समीकरण’ असे
म्हणतात.
रासायनिक समीकरणाचे संतुलन पायरी पायरीने करावे.सरावाने हे सध्या होते .
●~~•❅••❅•~~●
शिकलेले धडे,
निर्माण केलेली सहनशक्ती,
आणि मिळवलेली वाढ
ही भविष्यातील यशस्वीतेच्या दिशेने टाकलेली पावले आहेत...
आपला दिवस आनंदी जावो.🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा