10 वी, विज्ञान 1, पाठ 9. कार्बनी संयुगे 1.2
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
What's App Group
Join Now
●┈┉꧁●꧂┉┈●
🛼 टीप:- काही रेणूसुत्रांची नावे इंटरनेट म्हणजेच आंतरजालावर चुकीची आहेत कृपया काळजी घ्यावी. 🙏
🎷 कार्बनी संयुगांमधील क्रियात्मक गट
- विविध हॅलोजन (F2, Cl2, Br2, I2), ऑक्सीजन (O2), नायट्रोजन (N2), गंधक अशा मूलद्रव्यांबरोबर कार्बनचे बंध तयार होऊन आणखी अनेक प्रकारची कार्बनी संयुगे तयार होतात.
- हायड्रोकार्बन साखळीमधील एक किंवा अधिक हायड्रोजन अणूंच्या जागी या मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतियोजन होते व त्यामुळे कार्बनच्या चतुःसंयुजेची पूर्तता होते.
- हायड्रोजनला प्रतियोजी अशा मूलद्रव्याच्या अणूचा उल्लेख विषम अणू असा करतात.
- काही वेळा हे विषम अणू एकटे नसतात तर विशिष्ठ अशा अणुगटांच्या रूपात असतात. या विषम अणूंमुळे व विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांमुळे त्या संयुगाला विशिष्ठ रासायनिक गुणधर्म प्राप्त होतात, मग त्या संयुगातील कार्बन साखळीची लांबी व स्वरूप काहीही असो. म्हणून या विषम अणू किंवा विषम अणूंनी युक्त अशा अणुगटांना क्रियात्मक गट म्हणतात.
- क्रियात्मक गटाची मुक्त संयुजा लहान रेषेने दर्शविली जाते . हायड्रोजनची जागा घेणारा क्रियात्मक गट या संयुजेच्या सहाय्याने कार्बन साखळीला जोडला जातो.
●~~•❅• 🫐 •❅•~~●
🎸 समजातीय श्रेणी: -
- कार्बन शृंखलांची लांबी वेगवेगळी असली तरी त्यांच्यातील क्रियात्मक गट एकच असेल तर त्यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्ये खूप साधर्म्य असते.
- व्याख्या:- क्रमाक्रमाने वाढत जाणारी लांबी असणाऱ्या शृंखलांवर विशिष्ट हायड्रोजनच्या जागी समान क्रियात्मक गट जोडल्यामुळे संयुगांची जी श्रेणी तयार होते तिला समजातीय श्रेणी म्हणतात.
- क्रियात्मक गट कोणता आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या समजातीय श्रेणी असतात. उदा. अल्कोहोलांची समजातीय श्रेणी, कार्बॉक्सिलिक आम्लांची समजातीय श्रेणी, अल्डिहाइडांची समजातीय श्रेणी इत्यादी.
- एका समजातीय श्रेणीचे सर्व सदस्य हे एकमेकांचे समजातक असतात.
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
🎹 अल्केनांची समजातीय श्रेणी
🎾अल्काइन समजातीय श्रेणी
●~~•❅ 🔅 ❅•~~●
🎻अल्कोहोलांची समजातीय श्रेणी
श्रीमंत कोण?
- ज्याला तव्यावरची पोळी, भाकरी, चपाती ताटात मिळते तो श्रीमंत.
- जो दररोज एक मोसमी फळ व एक मोसमी भाजी खातो तो श्रीमंत.
🔅~~●●○○ 🫐○○●●~~ 🔅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा