10 वी, विज्ञान 1, पाठ 9. कार्बनी संयुगे 1.1
•─────●────━•
What's App Group
Join Now
●┈┉꧁●꧂┉┈●
- 🎣 कार्बन डाय ऑक्साइडचे रेणुसूत्र CO2 आहे. यावरून त्याच्या इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना (वर्तुळ विरहित) व रेषा संरचना यांचे रेखाटन करा.
•─────●────━•
- CO2 मध्ये C अणू प्रत्येक O अणूशी कोणत्या बंधाने जोडलेला आहे?
CO2 मधील कार्बन अणू ऑक्सिजन आणू सोबत दुहेरी सहसंयुज बंधने जोडलेला असतो. (कार्बनची संयुजा चार आहे व ऑक्सिजनची संयुजा दोन आहे.)
●~~•❅••❅•~~●
- गंधकाचे रेणुसूत्र S8 असून यात गंधकाचे आठ अणू एकमेकांना जोडून एक वलय तयार होते. S8 साठी इलेक्ट्रॉन ठीपका संरचना (वर्तुळ विरहित) रेखाटा.
- मीथेनची रेणूची रेषा संरचना व इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना.
- आजमितीस ज्ञात कार्बन संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष आहे. ही संख्या इतर सर्व मूलद्रव्यांपासून बनणाऱ्या संयुगांच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे .
- कार्बनपासन मिथेनसारख्या लहान साध्या रेणपासून ते डी. एन्.ए. सारख्या महाप्रचड रेण पूर्तयंत लक्षावधी प्रकारचे रेणू बनतात. कार्बनी संयुगाच्या रेणूवस्तुमानची व्याप्ती 1012 पर्यंत पसरलेली आहे.
- कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे ; त्यातून मोठे रेणूतयार होतात. कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखलाबंधन शक्ती म्हणतात. कार्बनी संयुगांमध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला असतात. मुक्त शृंखला ही सरल शृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते. बद्ध शृंखला म्हणजे वलयाकार रचना.
- दोन कार्बन अणूंमध्ये एकेरी बंध, दुहेरी बंध व तिहेरी सहसंयुज बंध तयार होऊ शकतात.
- चतु:संयुजी असल्याने एक कार्बन अणू इतर चार अणूंशी (कार्बन किंवा इतर) बंध तयार करू शकतो. यातून अनेक संयुगे निर्माण होतात.
- कार्बनी संयुगांच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य कार्बनमध्ये आहे. ते म्हणजे ‘समघटकता’.
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
- हायड्रोकार्बन : ज्या संयुगांमध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात.
- हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत.
- सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व चार हायड्रोजन अणूयांच्या संयोगाने झालेला मीथेन (CH4 ).
●┈┉꧁●꧂┉┈●
🚀. ईथेनची रेषा संरचना/रचनासूत्र व इथेनची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना.
(इथेन हा संपृक्त हायड्रोकार्बन असून, अल्केन मध्ये कार्बन-कार्बन एकेरी बंद असतो.)
●~~•❅••❅•~~●
🏀 एथिनची रेषा संरचना/रचना सूत्र व एथिनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना.
(एथिन हा असंपृक्त हायड्रोकार्बन असून अल्किन मध्ये कार्बन- कार्बन दुहेरी बंध असतो.)
●~~•❅••❅•~~●
🎷 असंपृक्त संयुगे .
- व्याख्या:- ज्या कार्बनी संयुगांतील दोन कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुग म्हणतात.
- कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनांना ‘अल्कीन’ म्हणतात.
- ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बनांना ‘अल्काइन’ असे म्हणतात.
- साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगांपेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.
•─────●────━•
🎻 एका पुढे एक कार्बन अणू जोडत गेल्यास कार्बन अणूंची सरलशृंखला तयार होते.
•─────●────━•
🏄जीवाष्म इंधन :
- लक्षावधी वर्षांपूर्वी समुद्रतळाखाली गाडल्या गेलेल्या मृत जीवांपासून काळाच्या ओघात कच्च्या तेलाचे साठे निर्माण झाले. आता तेलाच्या विहिरींमधून हे कच्चेतेल व नैसर्गिक वायू मिळवतात.
- नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने मीथेन असतो.
- कच्चेतेल हे हजारहून अधिक वेगवेगळ्या संयुगांचे जटिल मिश्रण आहे. त्यात प्रामुख्याने वेगवेगळे हायड्रोकार्बन असतात.
- प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने कच्च्या तेलाचे विलगीकरण करून वापरावयास उपयुक्त असे विविध घटक मिळवतात. उदा. CNG, LPG, पेट्रोल (गॅसोलीन), रॉकेल (केरोसीन), डिझेल, इंजिन ऑइल, वंगण.
•─────●────━•
💫. ब्युटेन रेणुसूत्र असलेली दोन समघटक संयुगे. दोन संभाव्य कार्बन शृंखला.
•─────●────━•
💥 C4H10 या रेणुसत्रासाठी दोन रचनासूत्र.
•─────●────━•
👏 रचना समघटकता : भिन्न रचनासूत्रे असणाऱ्या संयुगांचे रेणुसूत्र जेव्हा एकच असते तेव्हा या घटनेला ‘रचना समघटकता’
रेणुसूत्र एकच पण रचना सूत्रे भिन्न असल्यास ही वेगवेगळी संयुगे असतात.
•─────●────━•
🏊 सायक्लोहेक्झेनचे
रचनासूत्र .
•─────●────━•
🎾 प्रोपेन- संपृक्त हायड्रोकार्बन व प्रोपीन व प्रोपाइलन असंपृक्त हायड्रोकार्बन.
(प्रोपाइन हा अलकाइन आहे, त्यामुळे कार्बन - कार्बन तिहेरी बंध असतो.)
•─────●────━•
📞. संपृक्त हायड्रोकार्बन- आयसोब्यूटेन व असंपृक्त हायड्रोकार्बन- आयसोब्यूटिलीन.
●~~•❅••❅•~~●
💐 संपृक्त हायड्रोकार्बन- सायक्लोपेंटेन व असंपृक्त हायड्रोकार्बन- बेंझीन.
●~~•❅••❅•~~●
बेंझिन/ ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन:-
- बेंझिन हा वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.
- बेंझिन च्या संरचनेत सहा कार्बन अणूंच्या वलयात एक आड एक असे तीन दुहेरी बंध असतात.
- असा वैशिष्ट्यपूर्ण एक आड एक दुहेरी बंध ज्यांच्या संरचनेत असतो त्यांना ॲरोमॅटिक संयुग म्हणतात.
•─────●────━•
🛼 असंपृक्त हायड्रोकार्बन- सायक्लोहेक्झीन•─────●────━•
🎺 *जबाबदारीच्या काटेरी कुंपणात अडकलेली,**स्वतःपेक्षा जास्त कुटुंबाला महत्त्व देणारी,**प्रत्येक क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व साध्य करणारी,**आणि अहिंसात्मक प्रतीक असलेली प्रत्येक प्रेरणा म्हणजेच स्री**ज्याला स्त्री ‘बहिण’ म्हणून कळली, तो मुक्ताईचा ‘ज्ञानोबा’ झाला.**ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली, तो राधेचा ‘श्याम’ झाला.**ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली, तो सीतेचा ‘राम’ झाला.*_*जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!*_🎷 *आपला दिवस आनंदी जावो.*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा