10 वी, विज्ञान 1, पाठ 9. कार्बनी संयुगे 1.
●┈┉꧁●꧂┉┈●
आपल्या माहिती विज्ञानाची 🎷 या What's App समूहात सामील होण्यासाठी खालील निळ्या लिंकला स्पर्श करा👇
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
- संयुगांचे प्रकार कोणते ?
- सेंद्रिय संयुगे व
- असेंद्रिय संयुगे हे संयुगांचे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत.
- सर्व सेंद्रिय संयुगांमधील अत्यावश्यक मूलद्रव्य म्हणजे कार्बन.
- कार्बन हे घटकमूलद्रव्य असलेल्या सर्व संयुगांना कार्बनी संयुगे म्हणतात.अपवाद कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बाइड क्षार, कार्बोनेट क्षार व बायकार्बोनेट क्षार ही कार्बनची असेंद्रिय संयुगे आहेत.
- आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक उच्च असतात .
- वितळलेल्या व द्रावण स्थितीत आयनिक संयुगे विद्युतवाहक असतात.
- सामान्यतः कार्बनी संयुगांचे उत्कलनांक 300 0 C पेक्षा कमी असते .
- कार्बनी संयुगांमध्ये आंतररेण्वीय आकर्षण बल क्षीण असते .
- सर्वसाधारणपणे बरीच कार्बनी संयुगे विद्युतची दुर्वाहक असतात .
●~~•❅••❅•~~●
🎻 कार्बन अणू राजवायू संरूपण गाठण्यासाठी C4 + हा मार्ग घेत नाही.कारण लिहा .
•─────●────━•
🎷राजवायू संरूपण गाठण्यासाठी कार्बन अणू संदान (भागीदारी ) हा मार्ग घेतो.कारण लिहा .
संयुजा कवचातील चार इलेक्ट्रॉनांचे इतर अणूंच्या चार संयुजा इलेक्ट्रॉनांबरोबर संदान (भागीदारी ) करून निऑनचे संरूपण गाठणे, या पद्धतीमध्ये दोन अणू एकमेकांबरोबर संयुजा इलेक्ट्रॉनांचे संदान करतात. दोन्ही अणूंच्या संयुजा कवचांचे परस्परव्यापन होऊन त्यामध्ये कवचांचे संदान झालेले इलेक्ट्रॉन सामावतात. त्यामुळे प्रत्येक अणू राजवायू संरूपण गाठतो व कोणत्याच अणूवर निव्वळ विद्युतप्रभार निर्माण होत नाही, म्हणजेच अणू विद्युतदृष्ट्या उदासीन राहतात या सर्व बाबींमुळे अणू स्थायित्व प्राप्त करतात. त्यामुळे राजवायू संरूपण गाठण्यासाठी कार्बन अणू संदान (भागीदारी ) हा मार्ग घेतो.
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
- सहसंयुज बंध: दोन अणूंमध्ये दोन संयुजा इलेक्ट्रॉनांच्या संदानाने जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध म्हणतात.
- एकेरी सहसंयुज बंध: संदान केलेल्या इलेक्ट्रॉनांची एक जोडी म्हणजे एक सहसंयुज बंध होय.
- रचनासूत्र: दोन अणूंच्या संज्ञा जोडणाऱ्या एका छोट्या रेषेने सहसंयुज बंध दर्शवतात. रेषा संरचनेलाच रचनासूत्र असे म्हणतात.
- हायड्रोजन रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना व एकेरी बंध.
- हायड्रोजन रेणूची रेषा संरचना व एकेरी बंध.
दोन हायड्रोजन अणूंमध्ये दोन इलेक्ट्रॉनांच्या संदानाने /भागीदारी एक सहसंयुज बंध म्हणजे एकेरी बंध तयार होतो.
•─────●────━•
- दोन ऑक्सीजन अणूंच्या रासायनिक संयोगाने O2 हा रेणू तयार होतो. O2 रेणूमध्ये दोन ऑक्सीजन अणू एकमेकांना दोन सहसंयुज बंधांनी म्हणजेच दुहेरी बंधाने जोडलेले असतात.
•─────●────━•
- दोन नायट्रोजन अणूंच्या रासायनिक संयोगाने N2 हा रेणू तयार होतो. N2 मध्ये दोन नायट्रोजन अणू एकमेकांना तीन सहसंयुज बंधांनी म्हणजेच तिहेरी बंधाने जोडलेल असतात.
●~~•❅••❅•~~●- क्लोरीनचा अणुअंक 17 आहे. क्लोरीन अणूच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या किती असेल?
- उत्तर : इलेक्टोन संरूपण 2,8,7 म्हणून संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनांची संख्या न 7.
- क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 असे आहे, रेषा संरचना चे रेखाटन करा.
- क्लोरीनचे रेणुसूत्र Cl2 असे आहे, क्लोरीनच्या रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना
- पाण्याचे रेणुसूत्र H2O आहे. या त्रिअणु-रेणूची इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना काढा.
- पाण्याचे रेणुसूत्र H2O आहे. या त्रिअणु-रेणूची रेषा संरचना काढा.
- अमोनिआचे रेणुसूत्र NH3 आहे. अमोनिआसाठी रेषा संरचना काढा.
- अमोनिआचे रेणुसूत्र NH3 आहे. अमोनिआसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना काढा.
ज्याला वास्तव स्वीकारणे चांगले जमते,तोच मनुष्य आपल्या आयुष्यात,सदैव यशस्वी होतो. 🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा