🔴धातुविज्ञान - रासायनिक अभिक्रिया .1.1
●~~•❅••❅•~~●
What's App Group Join Now
🔴┈┉❀🏵||🏵❀┉┈🔴
- कक्ष तापमानाला सोडियम धातू हवेत उघड ठेवला .
4Na(s) + O2 ----- > 2Na2O(s)
- कक्ष तापमान म्हणजेच सामान्य तापमानाला सोडियम धातू हा हवेतील ऑक्सिजन सोबत संयम पावतो व या क्रियेत सोडियम ऑक्साईड तयार होते.
- ●┈┉꧁●꧂┉┈●
- मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता.
2Mg + O2 ------
> 2MgO
मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता मॅग्नेशियम ऑक्साईड ची पांढरी पूड तयार होते.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
🔴 धातूंच्या ऑक्साईड ची पाण्याबरोबर अभिक्रिया.
~●●○○○○●●~
- सोडियम ऑक्साईड पाण्यात टाकले
Na2O + H2O ----- > 2NaOH
सोडियम ऑक्साईड पाण्यात द्रवणीय असून पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया होऊन अल्क (alkali) तयार होते.
•─────●────━•
- मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्यात टाकले
MgO +H2O ----- > Mg(OH)2
मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्याबरोबर अभिक्रिया पावते व मॅग्नेशियम हायड्रॉक्साइड (milk of magnesia) हा अल्क (weak alkali) तयार होतो.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
🔴धातूंची पाण्याबरोबर होणारीअभिक्रिया
- सोडियम धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया केली.
2Na(s) + 2 H2O(l) 2 NaOH(aq) + H2(g) +
उष्णता
●┈┉꧁●꧂┉┈●
- पोटॅशियम धातूची पाण्याबरोबर अभिक्रिया केली.
2K(s) + 2H2O(l) -----> 2KOH (aq) + H2(g) + उष्णता
पोटॅशियम धातूची पाण्याबरोबर अतिशय जलद अभिक्रिया होऊन जलीय पोटॅशियम हायड्रॉक्साइड तयार होते व हायड्रोजन वायू मुक्त होतो, या क्रियेत प्रचंड उष्णता बाहेर पडते.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
- कॅल्शियम धातू पाण्यात टाकला.
2 Ca(s) + 2 H2O(l) -----> 2 Ca(OH)2(aq) + H2(g)
कॅल्शियम धातूची पाण्याबरोबर मंद गतीने व कमी जोमाने अभिक्रिया होऊन कॅल्शियम हॅड्रॉक्साइड तयार होते व हायड्रोजन वायू बाहेर पडतो.
•─────●────━•
- ॲल्युमिनियम धातू वरून पाण्याची वाफ जाऊ दिली असता.
2Al(s) + 3 H2O(g) ---à Al2O3(s) + 3H2(g)
•─────●────━•
- लोहा वरून पाण्याची वाफ जाऊ दिली असता.
3Fe(s) + 4 H2O(g) ---à Fe3O4(s) + 4H2(g)
लोहा वरून पाण्याची वाफ जाऊ दिली असता आयर्न (II,III) ऑक्साईड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.
●┈┉꧁●꧂┉┈●
- जस्तावरून पाण्याची वाफ जाऊ दिली
Zn(s) + H2O(g) ----- > ZnO(s) + H2(g)
जस्तावरून पाण्याची वाफ जाऊ दिली असता झिंक ऑक्साईड तयार होते व हायड्रोजन वायू मुक्त होतो.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
🔴धातूंची आम्लाबरोबर होणारीअभिक्रिया
धातूंची अमला बरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात व या क्रियेत हायड्रोजन वायू मुक्त होतो.
- मॅग्नेशियम धातूची हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर अभिक्रिया केली
Mg(s) + 2HCl(aq) MgCl2(aq) + H2(g)
मॅग्नेशियम धातूची हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर अभिक्रिया केली असता मॅग्नेशियम क्लोराइड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
- ॲल्युमिनियम धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली
2Al(s) + 6HCl(aq) ------ > 2AlCl3(aq) + 3H2(g)
ॲल्युमिनियम धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केलीॲल्युमिनियम धातूची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता एलुमिनियम क्लोराईड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.
•─────●────━•
- लोहाची हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर अभिक्रिया केली
लोहाची हायड्रोक्लोरिक आम्ल बरोबर अभिक्रिया केली असता आयर्न क्लोराईड तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.
●┈┉꧁●꧂┉┈●
- जस्ताची सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली
Zn(s) + 2H2SO4aq) ------ > Zn SO4(aq) + H2(g)
- जस्ताची सल्फ्युरिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली असता झिंक सल्फेट तयार होऊन हायड्रोजन वायू मुक्त होतो.
●▬▬๑۩ ۩๑▬▬●
🔴 धातूंची नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया.
- तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया केली
Cu(s) + 4 HNO3(aq) ----- > Cu(NO3)2(aq) + 2NO2(g)
+ 2H2O(l)
तांब्याची संहत नायट्रिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन कॉपर नायट्रेट तयार होते व या क्रियेत नायट्रोजन डायॉक्साईड वायू मुक्त होतो.
•─────●────━•
- तांब्याची विरल नायट्रिक अमला बरोबर अभिक्रिया केली
3Cu(s) + 8 HNO3(aq) ----- > 3Cu(NO3)2(aq) + 2NO(g) + 4H2O(l)
तांब्याची विरल नायट्रिक अमला बरोबर अभिक्रिया केली असता कोपर नायट्रेट तयार होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते.
●┈┉꧁●꧂┉┈●
Throw All Your Problems In Waste Bin
And
Enjoy Life
😊 Art of Leaving 🤔😁🤪🎷
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा